Skip to main content

कापुसकोंड्याची गोष्ट....... म्हणजे नक्की कोणती गोष्ट

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी गुरुवार, 29/07/2010 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
.... लहानपणी आपल्यातल्या बहुतेक सगळ्यांनीच हि गोष्ट ऐकली असेल.... ... जेंव्हा गोष्ट ऐकायची इच्छा व्हायची आणि घरातल्या कोणत्या तरी मामा कडे (कारण असल्या गोष्टी सांगण्यात मामा लोकांचाच उत्साह जास्त असतो) गोष्टीची फर्माईश व्हायची...तेंव्हा मामा सुरू व्हायचा... ....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?.....मग ते पुढलं कधिही न संपणारं गुर्‍हाळ चालु व्हायचं... मामा : कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का?.... मी : सांग... मामा : सांग काय म्हणतीस्....कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का? मी : सांग ना रे मामा... मामा : मी : सांग ना रे मामा...काय म्हणतीस? .कापुसकोंड्याची गोष्ट सांगु का? ........... ......... ...... .. हे संपायचच नाही.... .....मला खरच जाणुन घ्यायची इच्छा आहे...कि कोण आहे हा कापुसकोंड्या...आणि...काय आहे त्याची ती गोष्ट? ......मि.पा.वर कोणाला माहिती असेल तर क्रुपा (हे कसं नीट लिहायचं ते ही सांगा) करा माझ्यावर.. .....नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही हो माझ्या.....!

वाचने 9875
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

पाध्येंना माहित आहे कापुसकोंड्या कोण ते. फक्त आता पाध्ये कोण ? हा प्रश्न विचारु नका. ;)

पिंडाला कावळा शिवणार नाही काय म्हणता ? कापुसकोंड्याची गोष्ट सांगू? =))

मि.पा.वर कोणाला माहिती असेल तर क्रुपा (हे कसं नीट लिहायचं ते ही सांगा) करा माझ्यावर.. कृपा = K +shift R + u +P +aa .....नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही हो माझ्या.....! पिंडाला चांगला आंबेमोहोराचा भात असेल तर कावळा लवकर शिवतो पिंडाला. असे समस्त अखील महाराष्ट्रा कावळेसेने ने ठरवले आहे

In reply to by Nile

...... हे उत्तर माझ्या एका आगाउ भावाने....योग्य वेळी छापुन एका आगोचर आजोबांचे तोंड मस्त बंद केले होते.... तुमच्या वेळी तसे "बांधु" म्हणुन.....! ...झकास!

In reply to by विजुभाऊ

आमच्या कडे असलेल्या अगदी शुद्ध कावळ्यांकडुन सर्वप्रकारांच्या पिंडाला स्पर्श करुन मीळेल**. **- दर हा वय, नाते व मृतकाच्या ईछा प्रमाणे लागु पडेल... जाई बाई तुमच्यासाठी कोणता राखवुन ठेऊ??? कावळा कि..... डोमकावळा...?????

प्र का टा आ

In reply to by नितिन थत्ते

म्हण्जे काय?..... खु के त ब हो... (खुलासा केला तर बरे होइल)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

म्ह ते गो सां ना आ. (म्हणजे ते गोष्ट सांगत नाही आहेत) ;) त्यांनी गोष्ट लिहली पण मग प्र(तिसाद) का(ढुन) टा(कला) आ(हे)

In reply to by नितिन थत्ते

म्हण्जे काय?..... खु के त ब हो... (खुलासा केला तर बरे होइल)

एक होता कापुसकोंड्या... तो......,......,...,..... . . . जाउद्या हो खुप कंटाळा आला आहे...नंतर कधी तरी..... चा.प्र.शु. (चांगल्या प्रतिक्रियांसाठी शुभेच्छा)

=)) =)) आमचा एक परममित्र MCK याहु ग्रुप वर 'कापूसकोंड्या' ह्या नावाने कथा लिहायचा त्याची आठवण झाली. =)) =))

In reply to by परिकथेतील राजकुमार

आमचा एक परममित्र MCK याहु ग्रुप वर 'कापूसकोंड्या' ह्या नावाने कथा लिहायचा त्याची आठवण झाली. >>>>>.. पर्‍या ह्यो कोन्ता गुरुप हे.

हि फक्त काल्पनिक कथा आहे विदर्भ मधिल शेतकर्यना विचारा तेच छान उत्तर देतिल

हा कापूसकोंड्या सेल्फ आयटरेटीव्ह, सेल्फ अडाप्टीव्ह अल्गॉरीदम मधे फसलेला, युगानुयुगे जन्म घेत फिरणारा अतृप्त (AT+shift RUPT) जीवात्मा आहे. याला मुक्तीसाठी कोण्यातरी जबर्‍या गुरुची गरज आहे.

In reply to by शुचि

बिच्चारा! याची कहाणी संपत तर नाहीच, पण सुरूसुद्धा होत नाही. आणि तरीही मस्तपैकी लूपमध्ये अडकवतो - ऐकणार्‍यालाही, आणि सांगणार्‍यालाही.

In reply to by शुचि

स्वतः कापूसकोंड्याच जर कापूस कोंड्याची गोष्ट सांगत असेल, तर ती रिकर्सिव्ह होईल, आयटरेटिव्ह नाही. सेल्फ आयटरेटिव्ह अशी कोणतीही संकल्पना नाही. तसेच सेल्फ अडाप्टिव्ह देखील नाही. अल्गॉरिदम अडाप्टिव्ह नसतात. ह्यूरिस्टिक असतात. बाकी चालू द्या.

कापुसकोंड्या .. फक्त कोल्हापुरात होता काय? आम्हाला नाही बॉ भेटला कोणी कापुसकोंड्या ..

In reply to by भारतीय

....... मी सांगू का तुम्हाला? .... कापूसकोंड्याची गोष्ट?...मला गोस्ट म्हायती ऐ ..ती बी आरधी....... त्यो कोन हाये.....कुटं र्‍हातु...काय खातू...पोटापान्याचा उद्येग काय.....तेचा पत्त्या काय्....त्यो फकस्त कोलापुरातच का आला होता....तुमानी का न्हाय भेटला..... हे का...य बी ठावं न्हाय.....! ...... पाध्ये काकांना माहिती आहे... ते व्यक्तिगत रित्या ओळखतात म्हणे त्याला! (असे एका मुरलेल्या मि.पा.करानी सांगितले आहे). पाध्ये काका कोण? हे विचारू नका असाही मौलिक सल्ला दिला आहे. ...तुम्हाला पाध्येकाका महिती आहेत का हो? ...असेल तर सांगा..! (नवख्या व्यक्तिंना वाटाड्या मिळतो का हो या मि.पा.राज्यात?)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

पाध्येकाका फक्त मुरलेल्या मिपाकरांनाच दर्शन देतात म्हणे.. मी काय अजून मुरलो नाय ईथे.. माझ्या आधी तुम्हीच मुराल, तेंव्हा पाध्येकाका भेटल्यास मलाही सांगा.. कसे दिसतात, काय घालतात, काय खातात वगैरे... कापुसकोंड्या त्यांना कुठे भेटला.. त्यांनी त्याला कोल्हापुरातच का नेले, बाकी महाराष्ट्रावर अन्याय का केला असे खुप प्रश्न विचारा त्यांना..

अगदी खात्रीने नाही.. पण मला असं वाटतं..की.... कापुसकोंड्या म्हणजे पिंजारी तो कापुस पिंजुन धागा धागा मोकळा करतो.. तशी शब्द आणि शब्द पिंजून काढणारी / काढणार्‍याची गोष्ट, म्हणजे कापुसकोंड्याची गोष्ट.