Skip to main content

संस्थळी प्रतिसाद देता

संस्थळी प्रतिसाद देता

Published on गुरुवार, 29/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म जय जय रघुवीर समर्थ च्या चालीवर - संस्थळी प्रतिसाद देता सौजन्य सांडूनच चाला महाभारत होते सौजन्य सांडता फुकाचे शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ
लेखनविषय:

याद्या 2733
प्रतिक्रिया 15
काव्यरस

धन्य... >> फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला हे भारीच ... >> जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ _/\_ जय जय....

फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ
धोतर नेसलेला गेंडा डोळ्यासमोर आला, आणि फिस् कन हसू आलं...

In reply to by राजेश घासकडवी

एरवी मीटरचे गणित करण्यास व्हर्नियर कॅलिपर्स नि स्क्रू-गेज लागतात. येथे मामला मैलामैलाचा आहे. वेSS अबाव्ह माय पेग्रेड ! ;-)

पर्‍याशी ०.१००% सहमत आहे. उदाहरणच घ्यायचे तर हे वृत्त काय फर्मास जमले आहे पहा की. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म लालालालाला लाला लालाला लाल्लालाल्ला आणि फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला ब्लाब्ला ब्लाब्ल्लाब्लाब्लाब्ला ब्लाब्ला ब्लाब्ला(ब्लाब्लाब्लाब्लाब्ला)ब्लाब्लाब्लाब्लाब्ला ब्लाब्ला ब्लाब्ला इतर ओळींतील वृत्त तर इतके सट्ली जमले आहे की ओळखताही येईना. क्या बात है! क्या बात है!

सुलघु सदनिकेला । नाव द्या भव्यतेचे । "महल"-"भवन" होते । नाव देता फुकाचे । भिउनि भिउनि सेवी । प्रेम-पक्वान्न -मद्य । उदरभरण हो ते । नाही आयुष्य भोग्य । लै लै लघुवीर निरर्थ ॥

In reply to by धनंजय

वदन जवळ घेता । नाव घ्या त्या सखीचे । सहज समर होते । नाम घेता चुकीचे । जिवलगकर हाती । घेइजे सावधान । उधळत जर त्रागा । माफि मागे गुमान ॥

In reply to by धनंजय

शेवटच्या दोन ओळींत बदल सुचवतो... वदन जवळ घेता । नाव घ्या त्या सखीचे । सहज समर होते । नाम घेता चुकीचे । जिवलगकर हाती । घे करूनी सराव । स्मरण करुनि नामा । जीभ टाळूस लाव॥