पुनरागमन..
मायबाप मिपाकर,
नमस्कार!!
अखेर.. यक्षनगरीत परतले आहे. जवळ जवळ अडीच महिन्यांच्या सुट्टीनंतर २७ ऑगस्टला मी अमेरिकेत परत आले आहे.
काही परिहार्य कारणांमुळे, ३० जुलै ऐवजी २७ ऑगस्टला यावं लागलं.
"गंध हलके हलके..!!" प्रकाशीत झाला. प्रकाशन सोहळ्याला खूपशा माझ्या आंतरजालीय मित्र मैत्रीणींनी उपस्थिती लावली होती. माझं मन खूप भरून आलं. इतके दिवस आंतरजालावर राहून काहीतरी नक्कीच मिळवलं याचं समाधान झालं.
प्रकाशन सोहळ्याचा वृत्तांत बिपिनदाने लिहिलेला वाचला मी. पण तेव्हा वेळेआभावी सविस्तर प्रतिसाद देऊ शकले नाही.
धन्यवाद बिपिनदा!!
आता, आता पुन्हा नव्याने मिपाकरांच्या सेवेत रूजू होते आहे...
मिसळपाव