लेखकप्राजक्ता पवारयांनी गुरुवार, 02/09/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य : अळुची पाने ५ - ६
डाळीचे पीठ - २ वाट्या
तांदळाचे पीठ - २ चमचे
हिरव्या मिरचीचे वाटण
लाल तिखट
तीळ - २ चमचे
मीठ
चिंचेचा कोळ - २-३ चमचे
गुळ
अळुच्या पानांची देठे आणी जाड शीरा कापुन घ्याव्यात.
डाळीचे पीठ , तांदळाचे पीठ , मिरचीचे वाटण , लाल तिखट , मीठ ,तीळ , गुळ व चिंचेचा कोळ एकत्र करावे. त्यात थोडे पाणी घालुन जाडसर असे पीठ भिजवावे.
अळुच्या पानाला मागच्या बाजुने हे पीठ लावावे. त्यावर दुसरे पान ठेवुन पुन्हा पीठ लावावे.
लेखकयशवंतकुलकर्णीयांनी गुरुवार, 02/09/2010 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
यूजिनी आणि माझी सर्वात पहिली भेट कुठं झाली हे मला आता आठवत नाही. ते तेवढं महत्वाचंही नाही. पण ह्या माणसात काहीतरी वेगळं, काहीतरी ठोस, काहीतरी चमकणारं आहे - ते आमच्या मित्रांच्या ग्रुपलाच काय पण त्याला एकदाच रस्त्यावरुन चालता-चालता ओझरतं पाहाणार्यालाही जाणवून जातं. ते काय आहे ते मात्र अजून कुणाला नक्की सांगता आलेलं नाहीय. म्हटला तर तो तसा हॅंडसम कॅटॅगिरीत मोडतो. पण त्याच्यापेक्षाही दिसायला गोरेगोमटे, जिम-फिम मारल्यानं चारचौघात उठून दिसणारे, महिन्यातून तीन-तीन,चार-चार नव्या पोरींना पाठीवर घेऊन गाड्या उडवणारे बहाद्दर आमच्या ग्रुपमध्ये आहेत.
लेखकहेमयांनी बुधवार, 01/09/2010 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
'सकाळी सहाऐवजी साडेसहाला हुतात्मा स्मारकाबाहेर जमायचे आहे' राहुलचा रात्री मेसेज मिळाल्यावर सुट्टीची साखरझोप अजून अर्ध्या तासाने वाढली. पहाटे खुडबुडत सॅक भरून अशोकस्तंभावर गाडी लावली. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, २६ जाने. यादिवशींच्या पहाटवेळांत खूप वेगळं चैतन्य असतं, त्यापैकीच एक १५ ऑगस्टचीही असते. एरवी दिसतात ते पोटार्थी (म्हणजे पोटासाठी कामाला लागलेले आणि पोट कमी करण्यासाठी नाईलाजाने चालणारे/ धावणारे). लहान मुलांची झेंडावंदनासाठी कडक कपड्यांत शाळेत जाण्याची लगबग सुरू होती.
लेखकमिसळभोक्तायांनी बुधवार, 01/09/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
बीजिंग / हाँगकाँगमध्ये शाकाहारी व्यक्ती साठी जेवणाचे काय पर्याय आहेत ?
दहा दिवस फक्त कोर्या नूडल्स खाऊन जगणे मला तरी अशक्य आहे.
भारतीय (उत्तर / दक्षिण) जेवण मिळाले तर उत्तम ! (त्यासाठी रोज १०-१२ मैल टॅक्सीने जाण्याची देखील तयारी आहे; पैसे मला भरावे लागणार नाहीत, त्यामुळे :-))
कृपया, माहिती असल्यास तातडीने सुचवा.
धन्यवाद.
लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी बुधवार, 01/09/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
बालकेच ती, खेळणारच. जन्मजात स्वभावच त्यांचा, इकडे तिकडे हुंदडण्याचा. त्यामुळे त्यांनी पोटभर खाल्ले नाही की आईच्या पोटात कालवाकालव होते. मुळात बालकांचे वयच खाण्यापेक्षा खेळण्याकडे ओढा असणारे. त्यांनी पुरेसे म्हणजे एक चपाती, थोडी भाजी, वाटीभर वरणभात वगैरे खाल्लं नाही म्हणजे ती मुलं अर्धपोटी खेळत आहेत हा समजच चुकीचा!
खरे तर तासाभराने घासभर 'चरण्याची' बालकांची मूळ वृत्ती असते. परंतु आपण मोठी माणसं उगाचच त्यांचे खाणे वेळेत अन् वजनमापात तोलत बसतो. त्यांना वेळेनुसार खायला देण्याऐवजी वेळोवेळी द्यावे लागते तरच ते पचते, अंगी लागते.
लेखकस्वानंद मारुलकरयांनी बुधवार, 01/09/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
व्याकूळसे उसासे टाकीत चाललो मी
आवेग आसवांनी झाकीत चाललो मी
माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे
हा भार सोसवेना वाकीत चाललो मी
हा देह दग्ध होतो वणव्यात अंतरीच्या
वाटेवरी निखारे फेकीत चललो मी
मद्यास पूर येतो डोळ्यात आज माझ्या
प्याले उदासवाणे झोकीत चाललो मी
नाही कुणीच आले वाटेवरी पुसाया
का कोरडे खुलासे ऐकीत चाललो मी ?
हा क्रूर जीवघेणा रस्ता मला हवासा
होऊन पूर्ण त्याच्या अंकीत चाललो मी
-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/
लेखकजागुयांनी बुधवार, 01/09/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
पावसांच्या सरी चालू झाल्या की निसर्ग आपली ही संपत्ती उधळायला सुरुवात करतो. त्या संपत्तीपैकीच ही काही रान फुले व झाडे. निसर्गाकडू आपल्याला ही संपत्ती विनामुल्य, विनाकष्ट मिळत असते. ही छोटी मोठी रानफुले, झाडे आपल्या नजरेला, मनाला अगदी गारवा देउन जातात. मनाचा, शरीराचा थकवा ह्यांच्या सहवासाने कुठे दुर पळतो त्याचा पत्ता लागत नाही. फक्त आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहील पाहीजे. निसर्गाने दिलेल्या ह्या संपत्तीची नजरेने लूट करुन पहा.