Skip to main content

कोणीच ना पहाते...

लेखक स्वानंद मारुलकर यांनी सोमवार, 06/09/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा नजरेत काय माझ्या दिसते अता निराशा ? ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो गेली उडून माझ्या ओठावरील भाषा माझे अबोलणेही भासे मला विषारी कारण ठरे विखारी माझ्याच ते विनाशा आनंद वा सुखांचे नसती प्रदेश ज्याला माझा अनाम साथी असला सुना नकाशा तू आंधळा प्रवासी तुज भूल मृगजळाची तोडून चल पुढे तू भोगा, विलास, पाशा -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/
काव्यरस

काळ नावाचं औषध......

लेखक सविता यांनी सोमवार, 06/09/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
लेख पुर्वी अन्यत्र प्रकाशित ----------------------- लोक म्हणतात काळ हे सगळ्यात प्रभावी औषध आहे. जात्या काळाबरोबर सगळ्याच जखमा हळूहळू भरून येतात म्हणे. होतं का बुवा खरंच असं? ११-१२ वर्षापुर्वीची गोष्ट, माझी एक मैत्रिण होती आणि ते म्हणतात ना कोणाच्या तरी प्रभावाखाली येणं तसं माझं झालं होतं. I was much too impressed with her!...तशा बाकीच्या पण मैत्रिणी झाल्या होत्या पण ही माझी खूपच आवडती मैत्रिण होती. आणि ती माझ्या बाकीच्या कुठल्याच मैत्रिणींना आवडायची नाही.

मी पुरुष बिच्चारा

लेखक गणेशा यांनी सोमवार, 06/09/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
समान संधी मध्ये आजच्या मी पुरुष बिच्चारा बस मध्ये चढलो, अन रीकामी लेडिज सीट दिसली तरी लोंबकळत तेथेच मी रहातो वाटल्यास कंडक्टरला विच्चारा ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो धक्का तीचा लागतो, पण विनाकारण ' लाईनमन' होऊन मार मला खावा लागतो काय करणार मी पुरुष बिच्चारा वाटत अस्स उठाव अन निवडून याव आपण नियम समान करावेत स्त्री पुरुषांसाठीचे, पण नेमके तेंव्हा तिथले सीट स्त्री साठी राखीव असते काय करणार मी पुरुष बिच्चारा नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले फ़ॉर्म ही भरला, पण नियमानेच गळा कापला ३० % लेडिज reserved म्हणून आमचा नंबर waiting list ला गेला काय करणार मी पुरुष बिच्चारा त
काव्यरस

स्वप्नांचे पान मुंबई . . .

लेखक गणेशा यांनी सोमवार, 06/09/2010 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे

एक जुनी कविता

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 06/09/2010 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम धर्म वाढवावा मैत्री धर्म वाढवावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा गोमट्यास शिरि घ्यावे, अभद्रास पायी तुडवावे निर्भय प्रतिसाद द्यावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा नवीन विचार आणावेत, जुने विचार तपासावे, विज्ञानाचा ध्यास घ्यावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा कला दालने समृद्ध असावीत कवितेंचि रेलचेल असावि काथ्या कुट कुट कुटावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा मस्तवालावर चालुन जावे, सताधुंदांना जेरीस आणावे, लेखणीची समशेर करावि, उत्तमाचा ध्यास घ्यावा मिपा धर्म जागवावा मिपा धर्म वाढवावा अविनाश

भर पावसात खंडाळ्याच्या घाटात...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 06/09/2010 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्रीपासुन पावसाने धुमाकुळ घातलेला. खरेतर कालच म्हणजे शनीवारीच कुठेतरी छान कोकणसाईडला बाईक काढायची आणि मनसोक्त भटकायचे असा आमचा बेत होता. पण अस्मादिक नुकतेच मलेरियाच्या भेटीला जावुन आल्याने सौभाग्यवती भर पावसात बाहेर पडायला तयार नव्हत्या. शनिवारची संध्याकाळ त्या वादावादीतच गेली आणि रवीवारी सकाळी ... "ठिक आहे, चल जावूया कुठेतरी! पण पावसात फार भिजायचे नाही, रेनकोट घालूनच निघायचे!" अशा सशर्त सहमतीनंतर रवीवारी दुपारी ११.३० च्या दरम्यान आम्ही घर सोडले. पाऊस जवळ जवळ नव्हताच, त्यामुळे रेनकोट (विंडशिटर) बॅगेतच होते. बाईक काढली आणि पनवेलच्या मार्गाला लागलो.

म्हणी..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 06/09/2010 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
  • भाई लोकांच्या सडक छाप म्हणी....
  • ................................................
  • लेट जावे पण थेट जावे.
  • कुटाने केल्याशिवाय फुटाने मिळत नाही.
  • जजमेंट फेल तर येरवडा जेल.
  • एक फाईट, ससून साईट.
  • ज्याला व्हायचंय भाई, त्याला वर जायची घाई.
  • जय महाराष्ट्र, बोला स्पष्ट, करा नष्ट
  • नडला कि तोडला, आजपर्यंत कुणालाच नाही सोडला.
  • दोन पंच आणि एक लंच झाले की भरला दिवस
  • मजबूरी का नाम महात्मा गांधी.
  • फुकटच घावाल आणि बाप लेक धावलं
  • भिकारीकी शादी...लंडनमे खरेदी.