Skip to main content

आपल्या घरी गणपती किती दिवसांचे असतात? (गणपतीत साधारण काय मजा करता, ते नमूद केल्यास वाचायला अजून धमाल येईल..)

लेखक स्पा यांनी सोमवार, 06/09/2010 20:30 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1191
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

कौलाचे पर्याय गणपतींच्या संख्येचे आहेत की दिवसांचे आहेत? कौलात किती गणपती आणि किती दिवस असे विचारले आहे. असो. उत्तरे= शून्य गणपती शून्य दिवसाचे. काय मजा करता याचे पर्याय नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

उत्तर शुन्य. गणपतीत साधारण काय मजा करता? लहानपणी मजा करायचो. मूर्तिकारच कॉलनीत राहायचे. ते मूर्ती बनवत असताना बघायला मजा यायची.नंतर आरास बनवताना बघणे,आरती झाल्यानंतर आवडीचा प्रसाद खाण्यासाठी मारामारी!!विविध भागातल्या मंडळांचे गणपती बघायला मजा यायची.त्यात वडाळा,लालबाग म्हणजे स्पेशल.

In reply to by वेताळ

दीड दिवसांच्या option ला जास्त मतं मिळतील असा वाटलं होतं.. पण चक्क ११ दिवसांच्या option ला जास्त votes आहेत. वा ........ बरं वाटलं... गणपती बाप्पा मोरया....


वर सात ला मत दिले आहे. पण गौरींबरोबर विसर्जन असल्याने ते मागे-पुढे होत रहाते. हा लहानपणापासून आवडता सण आहे. घरात आणि लहानपणी घराबाहेर - सार्वजनीक ठिकाणी देखील. त्यातील सार्वजनीक ठिकाण आता भारतात बादच इतके नंतर स्वरूप बदलले... येथे (अमेरिकेत) देखील घरी गौरी-गणपती असतात. मुलीला तितकेच आवडतात. आरास वगैरे करण्यात तिला देखील मजा येते! (आत्ताच पेपर मशे/रिसायकल्ड पेपरचा) गणपती देखील तिने बनवला आहे. अनेक जण भारतात असताना देखील येयचे गृहीत धरायचे आणि येथे देखील गृहीत धरतात. बरेचसे गणपती बसण्याच्या दिवशी अथवा लगतच्या वीकएन्ड ला जेवायला येतात तर काही ठरवून गौरी आल्यावर त्या दिवशी अथवा जेवणाच्या दिवशी संध्याकाळी येतात.

आमच्या घरी ११ दिवस गणपती बप्पा असतात.. घरी गणपती बसवतो व थोडीसी आरासही करतो. घरातले सर्वच त्यात मदत करतात. वेगळाच उत्साह असतो सर्वांच्या अंगात. अगदी 'गणपती बाप्पा आले घरा, घराचे मंदीर झाले पहा' अशीच स्थिती असते आमच्या घराची.

अहो काय मजा करतो ते लिहीण्याची तर खूप इच्छा आहे पण हे संपादक लोक सगळं डिलिट करुन टाकतात हो..... :( (खुलेआम शिव्यांची लाखोली....) अवांतर : कोणी काय काय आरास केली आहे असा पण धागा काढा ना... मीच काढला असता पण तो लगेच डिलीट होउन जाईल :( म्हणुन तुम्हाला रिक्वेश्ट..