Skip to main content

आपण मुर्खात मोडतो का शहाण्यात ?

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने मला हा लेख परत एकदा प्रकाशीत करावा लागत आहे. म्ह्नजे तो आत्त मिपा वर आहे असे नाही कारण मी तो काढला होता पण तो एवढ्या लवकर परत टाकावा लागेल असे वाटले नव्हते. त्याच बरोबर दुसरा पण टाकत आहे. " "जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.

नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता
सोडा हातातल्या हाता नाथा आता हातातल्या हाता अहो सोडा हातातल्या हाता नाथा हातातल्या हाता ||धृ|| मनाचीये गुंत्यामधे होssओssहोssओ मनाचीये गुंत्यामधे नका अडकू आता नाथा सोडा हातातल्या हाता ||१|| आले जरी दुरवरूनी आssआssआssआss आले जरी मोहीम करूनी का बळेची ओढता नाथा आता सोडा हातातल्या हाता ||२|| सासू सासरे दिर जावा हंssअंssअंssअंss सासू सासरे दिर जावा बोल बोलतील असे एकांती पाहता नाथा आता नका....नका सोडा हातातल्या ह
काव्यरस

ढबू मिरचीची पीठ पेरून भाजी

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरी बसूनच काम केलं... संध्याकाळी बराच कंटाळा आला होता.... त्यात बेसन पेरून सिमला मिरची खायची इच्छा झाली. फ्रीज उघडून बघितला तर मिरच्या होत्या.. मस्तपैकी पीठ पेरून भाजी केली. ही घ्या कृती. साहित्यः १. ३-४ मोठे चमचे तेल २. १-२ हिरव्या मिरच्या तुकडे करून ३. २-३ सिमला मिरच्या चिरून ४. ३-४ मोठे चमचे चण्याचे पीठ ५. बरेच जण ह्यात कांदा घालत नाहीत. पण मला आवडतो म्हणून मी वापरला..त्यामुळे हवा असल्यास १ मोठा कांदा चिरून ६. फोडणीसाठी हिंग, मोहरी. जिरे, कडिपत्ता ७. अर्धा चमचा हळद ८.

माझं काय चुकलं?

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. सगळ अगदीच सामान्य. अशाच घरात माझा जन्म झाला.. लहानपणाचं आयुष्य आजुबाजुचं जग बघत बघत मोठं झालं, कधी गरीबी कधी श्रीमंती, म्हणजे कधी साधी भाजी पोळी तर कधी पुरणपोळी अशा अर्थाने. भारतात जन्म घेतलास म्हणजे मार्बल्स्,विटी-दांडू, क्रिकेट आवडायलाच हवे असा मनावर एक कोरला गेलेला ईतिहास, मला बास्केटबॉल आवडायचं. आयुष्य म्हणजे जे आपले आई-बाबा, शेजारी जगताहेत तेच असतं असा परिस्थितीचा आग्रह. पण मला हे कधीच पटत नव्हतं, हे असं नको- असं असायला हवं अशी माझी जिज्ञासा आणि अपेक्षा. त्यामुळे घरात आणि घरा बाहेर मी नेहमीच एक रेबल (ईंग्रजी).

स्वप्न : दुरुपयोग धर्माचा आणि गणिताचा

लेखक रन्गराव यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पितृ पक्षाच्या नावखाली धर्म आणि गणित ह्यांचा उपयोग करून कुरघोडी करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. त्यावर चिकित्सा करण्याचा हा एक उद्धट प्रयत्न. नुकताच कोणी तरि कौल घेवून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला हि अमूक महिन्यातील स्वप्ने एक योगायोग असतो. आणि कोणितरि ब्राह्मणास दक्षिणा देवून पितरांचे ऋण फेडले. तर दुसर्या कुणी ब्राह्मणाने इतर ब्राह्मणांनी कसे आपले हितसंबंध सांभळले ह्यावर लेख लिहिला. . ज्याने दक्षिणा घेतली त्याच ब्राह्मणाने लेख लिहिला नसला म्हणजे मिळवली. ;) धर्माचा दुरुपयोग ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. गणिताचा दुरूपयोग हा तसा नवीन भाग आहे. पाहूयात कसे ते.

शेवटी लागला एकदाचा फैसला ! ! ! आयोध्येचा निकाल लागला.

लेखक गांधीवादी यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गेली 60 वर्षे अडकून पडलेला हा आयोध्येचा फैसला आज दिनांक ३०/९/१० रोजी दुपारी अलाहाबादच्या उच्च न्यायालयात सुनावण्यात आला. ज्या निकालावर केवळ भारतीय जनताच काय, संपूर्ण जगभरातले लोक डोळे लाऊन बसली आहेत, असा हा निकाल लागला. तर बघूया काय निकाल लागला ते . रामलल्ला जिथे आहेत तिथेच राहतील, आयोध्या हे रामजन्म स्थान आहे. पण जागेची वाटणी करून हिंदू (एक त्रीतीयांश) आणि मुसलमान (एक त्रीतीयांश) यांना दिली जाईल. ज्यांचं बाजूने निकाल लागलेला नाही त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालय अपील करण्याचा अधिकार आहेच. अलाहाबादच्या न्यायालयाने अपील करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली.

कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, कव्वालीचा 'लुत्फ' लुटा!
कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो
"भेटूया पुन्हा कधीतरी", का बोलूनी गेलो? आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||धृ|| अवखळ नजरेला नजर भेटे वरचेवरी गाली हसतांना पडे त्यावर खळी होतसे काय काळजात कुणाला ठावे लक्कन हाले ते एवढेच मला जाणवे नकळत तुझ्या पाशात का गेलो ओढलो आता कोठे, मी कोठे तू?
काव्यरस

एका कारसेवकाचं मनोगत !!

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आधी हि लिंक वाचा !! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms आज अठरा वर्षांनी आलेल मनोगत मला पुर्ण पटले वा पटले नाही असे नाही...मी औ.बादला असताना बरेचशे पाकधार्जीणे मुस्लीम पाहिलेत.भर चौकात टीव्ही लावुन पाकिस्तान संघाची मॅच काय बघतात,त्यांच्यासारखी केशभुषा काय करतात. ईकडे नागपुरचाळीत असताना एकदा एका मुस्लीम दुकानदाराने,ईंडिया मॅच हारल्यावर ' अरे तुम्हारी ईंडिया हार गयी ' असं एकवले होते.ईतकी धर्माधंता ?

(चौकट)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 30/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबकांच्या भाऊगर्दीतून मी जातो कुणालाही न दिसणार्‍या कवितेकडे काथ्याकुटाखाली, कौलाखाली लपलेल्या शाब्दिक चित्राकडे तिथे असतो नवख्या कवीच्या शब्दकुंचल्यातले रंग सांडलेला भाष्यतुकडा. मला ते चित्र सुखदायी वाटतं वाटतं करावंसं थट्टाबध्द मी विडंबन टाकतो त्या चित्राभोवती. आता माझी शाब्दिक चौकट, त्यात रगडलेले भाव, कल्पना अन् त्याखालची प्रतिसादांची जागा - इतकेच ...
काव्यरस