Skip to main content

माझं काय चुकलं?

Published on गुरुवार, 30/09/2010
एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. सगळ अगदीच सामान्य. अशाच घरात माझा जन्म झाला.. लहानपणाचं आयुष्य आजुबाजुचं जग बघत बघत मोठं झालं, कधी गरीबी कधी श्रीमंती, म्हणजे कधी साधी भाजी पोळी तर कधी पुरणपोळी अशा अर्थाने. भारतात जन्म घेतलास म्हणजे मार्बल्स्,विटी-दांडू, क्रिकेट आवडायलाच हवे असा मनावर एक कोरला गेलेला ईतिहास, मला बास्केटबॉल आवडायचं. आयुष्य म्हणजे जे आपले आई-बाबा, शेजारी जगताहेत तेच असतं असा परिस्थितीचा आग्रह. पण मला हे कधीच पटत नव्हतं, हे असं नको- असं असायला हवं अशी माझी जिज्ञासा आणि अपेक्षा. त्यामुळे घरात आणि घरा बाहेर मी नेहमीच एक रेबल (ईंग्रजी). शाळेत कायम पहिला कारण दबाव, पण अभ्यासात मन रमत नाही. अभ्यास सोपा आहे, मला काहीतरी वेगळं करायचंय, बघायचय... ही मनोमन ईच्छा. चांगला अभ्यास कर, मग तुला आयुष्यात पाहिजे ते मिळेल असं कुणीतरी सांगुन गेलं. खुप अभ्यास केला, फक्त मार्कस मिळाले, बाकी काहीच नाही, पुढे काय? मी विचारलं तेव्हा अजुन अभ्यास कर असं उत्तर मिळालं आणि अभ्यास एक फॉर्मॅलिटी म्हणुन करत गेलो. कायम बॅकबेंचर म्हणुन ख्याती. पण मार्क्स नेहमीच चांगले मिळाले, कॉलेजातुन मला माझ्या प्रोजेक्टसाठी बक्षिसं मिळाली. मध्यंतरी वडीलांना बिझीनेस मधे खुपच लॉस झाला. कॉलेजची फी भरण्यासाठी रात्रपाळीची, कधी कॉलेज न करता दिवसाची नोकरी करायचो, १५-२० किमी उन्हात पायी फिरायचो, तुटलेला बुट आणि त्यामुळे तळव्यात साकळलेलं रक्त, आजही ओठांवर एक हसु आणतयं. शेवटच्या वर्षाची फी भरण्यासाठी महिनो अन महिने एक वेळ जेवण आणि चार तासाची झोप घेतलेली आठवतेय. तोपर्यंत दु:ख म्हणून काहीच नव्हतं. उलट आनंद होता. हळू हळू दिवस पालटले, स्वत:च्या ईच्छेविरुद्ध आणि आई-वडीलांच्या ईच्छेसाठी आयटीत नोकरी मिळवली. बघ्याच्या दृष्टीने - "काय मजा आहे ब्वॉ, सगळं कसं मजेत चाल्लयं" :) खरच सगळी एक मजा आहे. अनेक पैलु आहेत नशीब कुठे कसे व का घेऊन जाईल कुणालाच माहित नसते. पण आपले कर्म आणि कर्तव्य करत रहाणे हेच योग्य. अशांपैकीच एक म्हणुन आई वडीलच काय, तर मावशी, आजी-आजोबांना विमानाने फिरवलं. लहान भावाला पुढे शिकवलं. घर बदललं, सगळ्या सुखसुविधा परत आणल्या. आईच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि अभिमान मला आजही प्रोत्साहित करतो. आज देशाबाहेर आलो, इथे हेड ऑफिसला कायमची ट्रान्स्फर झाली, आता आई-वडीलांना फिरायला घेऊन येईन. पण आजही माझे काही चांगले मित्र, नातेवाईक जेलसीमुळे वाईट गुण गातात. मी त्यांना आजही मदत करायच्या प्रयत्नात आहे आणि हे लोकं जळतायत? का? हो, आता तो बाहेर गेला, बिघड्णारचं, बिघडला असेलच. उगाचच पैसे मिळतात ह्या आयटीवाल्यांना. संस्कृती बिघडवतात. आई-वडीलांना अक्कल नको... पोराला सोडलं उनाड बाहेर वळुसारखा..... वगैरे वगैरे.. कै च्या कैच. आणि ज्यांना गरज आहे (ज्यांची मुले शिकत आहेत) ते मात्र काहीच बोलत नाहीत. कारण एकच, आम्हाला गरज पडेल........ अर्थात मला ह्या सर्व प्रकारांशी कर्तव्य नाही. पण मग मी कुठे चुकलो? माझं काय चुकलं? हा समाज/आपलेच लोक असे का वागतात? असा प्रश्न कधी कधी भिरभिरतो.. आपलाच, (प्रामाणिक) मराठमोळा. (मी आयटीत आहे आणि देशाबाहेर आहे हे सांगण्याचा अजिबात उद्देश नाही ;) )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 4163
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

मिम्या च्यायला ह्या असल्या विषयात आपण तर काय बोलत नाही बॉ ! आपला उसुल एकच.. हाथी चले बाझार. अवांतर :- बाकी साल्या ते लेखाचे शिर्षक वाचुन 'एका अंधार्‍या कोपर्‍यात गुढघ्यात मान खाली घालुन बसलेला ममो आणि बाजुला चुरगाळलेली फुले' असे दृष्य डोळ्यासमोर आले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कोपर्‍यात गुढघ्यात मान खाली घालुन बसलेला ममो आणि बाजुला चुरगाळलेली फुले' असे दृष्य डोळ्यासमोर आले. आणि त्यापुढचे डाऑयलॉग " अरे नीचा...अरे चांडाळा कुठे फेडशील ही पापे. शेवटी तू तुझा कार्यभाग साधून घेतलासच ना" वगैरे वगैरे

आपण जे काय करतो ते बरोबर आहे ह्यावर एकदा विश्वास बसला की कोण काय म्हणतं ह्या किमत रहात नाहि. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्याला आवडणार काम करत असलो की त्याचा आनंद इतका मोठा असतो की त्यापूढे दुसर्या तक्रारी मोठ्या दिसत नाहित. पण काहि वेळा आपण कूटूंब किंवा पैसा यासाठी एखादा compramise मनावर दगड ठेवून केल असेल तर मात्र लोकांची बोलणी आपल्याला दुखावतात. आपल्याला आयुष्यात काय हव एकदा विचार करून बघा. लोक बोलत रहाणार आणि स्वार्थी हि असणार. कोण स्वार्थी नसत आज? आणि सर्वांना खूश करन सोपा नसत. तुम्हला महत्वाचा कोन आहे ते ठरवा आणि त्याना सुखि ठेवल की झाल.

मार्बल्(गोट्या), आणि विटी आणि दांडू न खेळण्याचा परिणाम

योग्य ठिकाणी फाट्यावर मारायला शिका. मिपावर भरपुर अनुभवी मंडळी आहेत त्यांचा सल्ला घ्या... ;-)

पण आजही माझे काही चांगले मित्र, नातेवाईक जेलसीमुळे वाईट गुण गातात. मी त्यांना आजही मदत करायच्या प्रयत्नात आहे आणि हे लोकं जळतायत? का? याच प्रश्नात उत्तर आहे. जेलसी (जळणे) हेच एक कारण. बाकी काही नाही. कोणाचे चांगले चालले असेल तर सगळ्यांना बघवतेच असे नाही. हे अनुभव थोड्याफार प्रमाण प्रत्येकाला येतातच..तुम्ही सुद्धा तुमच्या पडत्या काळात कोणावर तरी जळला असाल..(वाईट वाटून घेऊ नका..मनुष्यस्वभाव आहे तो) नावातकायआहे यांनी सांगितल्याप्रमाणे "योग्य ठिकाणी फाट्यावर मारायला शिका"..असेच म्हणीन..किंवा याही पुढे जाऊन असे म्हणेन की कोणाचीही पर्वा करू नका..तुम्ही कोणासाठी जगता? लोकांसाठी? की स्वतःसाठी.. (अहो लोकं बोलणारच..) पण एक गोष्ट मनात ठेवा..तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुमचे चांगले(?) मित्र किंवा नातेवाईक जेलसी करतात. जर ही मंडळी तुमचा विचार करतात म्हणजेच तुम्ही कोठेतरी त्यांच्या मनात तुमच्या अस्तित्वाची जाणीव सोडून गेला आहात. ह्या गोष्टीमुळे तुमचा आत्मविश्वास खरे तर वाढला पाहिजे. तुम्ही असा विचार किती जणांच्या बाबतीत करता? हो, आता तो बाहेर गेला, बिघड्णारचं, बिघडला असेलच. उगाचच पैसे मिळतात ह्या आयटीवाल्यांना. संस्कृती बिघडवतात. आई-वडीलांना अक्कल नको... पोराला सोडलं उनाड बाहेर वळुसारखा..... वगैरे वगैरे.. कै च्या कैच. तुम्ही बिघडला आहात की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवा..असे काय तुम्ही वागला की लोकं असा विचार करत आहेत? कधी परदेशातून परत जाऊन परदेशात राहील्याचा माज केला आहात का? तसे नसेल तर जास्त विचार नका करू..

Animation हे आय टी मध्ये येत का? कारण मी animation क्षेत्रात आहे ........ कोणाला या क्षेत्रा बद्दल माहिती हवी असल्यास संपर्क करणे....... :)

आपन आयटि वाल्यांना शिव्या ...............:bigsmile: आमि परतेकाच्या आनंदावर विरजन घाल्तो......:bigsmile:...... घाला घाला तुमाला हेच काम हाय :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

प्रतिकूल परिस्थितीशी न थकता झगडत राहून प्रगती केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

एक नियम लक्षात ठेवा. ज्या माणसांच्या आपल्याबद्दल्च्या मतांमुळे आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडणार नाही /काहीही..अगदी यत्किंचितही उलथापालथ होणार नाही अशा मतांचा विचारच करायचा नाही. just feel like they dont exist ! "तुम्हाला असे वाटते ना..ok...तुम्ही बरोबर्...!ठँक्यु! "ही reaction पाठ करुन ठेवा. आपणच म्हणायचे "होय ओ...फार फार बिघडलो मी!...दुसरं काय कामच नाही करत्.अजुन काय वाटत तुम्हाला?" नातेवाईक ही जातच अशी आहे. (फार थोडे अपवाद असतात...आणि ते नेमके दुसर्‍यांचे नातेवाईक अस्तात. :) ) तुमचे आयुष्य दुसर्‍यांसाठी करण्यात गेले आहे.बरीच धड्पड करुन सन्मानाने उभे आहात्.मग तुमच्या वाट्याला जे सुखाचे क्षण आले आहेत ते मनमुरा.....द "जगा" आपले आई-वडील्,जोव्हाळ्याचे चार लोक यांच्या मताची,सुखाची कदर करा. thats it!

साधी गोष्ट आहे...तुमच्यावर कोणी जळत असेल तर समजा कि तुमची प्रगती होत आहे... नातेवाईकांपेक्षा मित्रमंडळी (मोजकेच) जवळचे असतात.. काय कुणाला महत्त्व देताय उगाच...तुम्हाला जमत असेल तर सरळ संबंध तोड किंवा जितक्यास तितकेच ठेवा... जर कोणी जास्त शहाणपणा करत असेल तर जिथल्यातिथे त्यांना उत्तर द्या...भांडण झाले तर होऊ द्या पण त्यांना समजेल कि उगाच नसती लुडबुड हा माणूस खपवून घेत नाही. हे घरातल्या लोकांसाठी...बाहेरच्यांना काय किंमत?

आपण आराम खुर्चीत बसला आहात. आपण यात डोलतो, काहितरी करतो, पण कुठेच जात नाही. हे विचार आपण करतो पण आपल्याला ते कुठेच घेऊन जात नाहीत. एक लक्षात ठेवा, ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत आणि तुम्ही आपल्या. ते चुक आहेत हे सिध्द करायला जाऊ नका. आपल्यालाच त्रास होतो. उत्तम उपाय : आराम खुर्चीतून उठून उभे रहाणे आणि आपल्या ठरवलेल्या मार्गाने चालत रहाणे. ते येतील तुमच्या मागे फरफटत. खात्री बाळगा.

ये जीवन है, इस जीवन का यही है रंग रूप ! तुमचा जर कोणी दुस्वास करत असेल किंवा तुमचे जर कोणी अनुकरण करत असेल तर याचा अर्थ तुम्ही प्रगती केलेली आहे. वागण्यातले नमुने या पुढे देखील भेटत राहणार आहेत .............याची पक्की खुणगाठ मनाशी बांधा.

माझं काय चुकलं?? असा विचार करनच चुकत आहे, काम करताना कंपनीत किंवा वैयक्तिक पातळीवर लहानपणी एकलेली एक गोष्ट बर्‍याच वेळी आठवतो तुम्ही पण ऐकली असेल "बाप-लेक आणी त्यांच्या गाढवाची". तुम्ही काही हि म्हणजे काही हि करा, पण तुम्ही सर्व लोकांना एकाच वेळी खुष नाही ठेवु शकत, आणी अजुन पर्यंत हे कुणालाच जमलेल नाही. तुमच्या साठी ज्या व्यक्ती महत्वाच्या आहेत, त्यांचाच विचार करा आणी मागच्याला पुढे खेचण्यासाठी आधी स्वःताला पुढे जाव लागत. --टुकुल

राक्या !! तु पुण्यात कधी येतोयस सुट्टीला ? तुला मी आणी पर्‍या कोपच्यातच घेतो पुनममध्ये ...

एकदम हळवा वगैरे कसला होतोस रे? एक शिवास रीगलची बाटली फोड अन होऊन जाऊ दे पुन्हा एकदा ``काठोकाठ भरु द्या प्याला...'' सुरेख लेख. समोरासमोर बसुन रंगवलेली सगळी गप्पाष्टकं आठवुन देणारा. अंतर्मुख करणारं सुरेख लिहितोस कधीतरी अचानक! सगळा लेखच उत्तम पण खरच सगळी एक मजा आहे. अनेक पैलु आहेत नशीब कुठे कसे व का घेऊन जाईल कुणालाच माहित नसते. पण आपले कर्म आणि कर्तव्य करत रहाणे हेच योग्य. अशांपैकीच एक म्हणुन आई वडीलच काय, तर मावशी, आजी-आजोबांना विमानाने फिरवलं. लहान भावाला पुढे शिकवलं. घर बदललं, सगळ्या सुखसुविधा परत आणल्या. आईच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि अभिमान मला आजही प्रोत्साहित करतो. आज देशाबाहेर आलो, इथे हेड ऑफिसला कायमची ट्रान्स्फर झाली, आता आई-वडीलांना फिरायला घेऊन येईन. हा भाग विषेश आवडला.

नातेवाईक तुमच्यावर जळतात ,म्हणजे एका अर्थाने तुमचा हेवाच करतात. हे त्यांना बोलता येत नाही म्हणून ते तुम्हाला नाव ठेवतात . त्यांनी अजून हेवा करावा म्हणून तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करताच राहा. हितचिंतक तुमच्या पाठीशी आहेत.

सगळी दुनिया साली जाऊ देत तिकडे गच्यागात. अ‍ॅडीजोशीचा सल्ला ऐक.. मॅटर खल्लास!! कसं? (हाडाचा निर्लज्ज) राघव