Skip to main content

पण बोलणार नाही...

बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
द.मा.मिरासदारांची एक 'कोणे एके काळी' नावाची कथा आहे. त्यात एका राजाचे मन जिच्यावर बसले आहे अशा एका सुंदर आणि चतुर स्त्रीचे हृदय जिंकण्यासाठी त्या राजाचा विदूषक त्याची मदत करतो असे कथानक आहे. श्रीमंत नगरशेठची मुलगी असलेली ती ललना राजाच्या बुद्धीची पारख करण्यासाठी जी सांकेतिक कोडी घालते आणि त्यांचा अर्थ लावून तो विदूषक तिच्याच भाषेत तिला कसे संदेश पाठवतो याचं बहारदार वर्णन कथेत आहे.
काव्यरस

(कापित केक)

बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एका शापित मेघा*ने फारच डोक्याला त्रास दिला ;-) सार्‍या रिकाम शुभेच्छा घेऊन राहिलो मी कापीत केक मात्र वाढीत चाललो मी गेले सफेद केसही, ओसाड होई टाळके झाले बधीर नयन 'उप-नयन' वापरतो मी उत्साह झडून गेला, नाही कशात लक्ष शर्करा होई कडवट शोधीत चाललो मी झाले श्रवण परके, उदास विराण गाणे यंत्र असे तारक वापरीत ऐकतो मी विस्मरण सतत सोबत, विसरलो वय वाढ संगे सोबती अन् केक कापीत चाललो मी *यात मेव्याचा काहीही संबंध नाही.
काव्यरस

भरमाध्यान्हीच्या सान्ताक्लॉजचे प्रियाराधन

लेखक शरदिनी
बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
वैशाखाच्या भग्न दुपारी वणवा भोळा ऐसा तळपे मिरची जळजळ क्लिष्ट शहारी पोहे खाऊन प्रचंड दडपे सान्ताने मग क्लॉज टाकला माझ्यावरती तुझीच माया दिव्यझिम्मडी बहरून आली शकुंतलेची काजळकाया सकल धुराडे फ़िरती गगनी तिचे विखारी लोचन झाळी आकाशरेषा जुगनू जळती गुडविलबाबा नयनी झोळी चिर्कुटढक्कन दाढीवाला प्रियानिळाली साडीवाला टोकन धरती फ़िरती वरती अजब पहाडी गाडीवाला काय कुठूनी वरती येते कालयंत्र ते अजब झपाटे अय्या सोडा लवकर बैंया गलोल सत्वर दैया दैया रेलगाडी जीवन झुकझुक आले ठेसन प्रदेश चम्बळ अल्लड सान्ता निरीच्छ जनता दुमदुम ऐके कडाड संबळ जीवी बाबू अर्जुन नागा अल्लुअल्लु डाबर अमला निशानीरोबो दुर्दै
काव्यरस

मोगरा फुलला

लेखक शुचि
बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा. बर्‍याच वर्षापूर्वी "मोगरा फुलला" या अभंगातील एका ओवीचं सुंदर विवेचन माझ्या वाचनात आलं होतं. ते इथे मांडते. "इवलेसे रोप" म्हणजे गुरुभेट झालेली आहे आणि गुरुकृपेने शिष्याला गुरुमंत्राची दीक्षा मिळाली आहे. हा मंत्र फक्त "द्रां", "र्‍हीं" किंवा "गँ" असा बीजमंत्र असू शकेल किंवा "श्रीराम जय राम जय जय राम" किंवा "नम: शिवाय" असा मोठा मंत्र देखील असू शकेल.

उडीद-मुगाचे लाडू

लेखक मितान
बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हिवाळा सुरू झाला की वेगवेगळे लाडू आठवायला लागतात. त्यातले माझे आवडते लाडू उडीद आणि मुगाच्या डाळीचा लाडू. त्याची ही पाकृ. सामग्री - १ वाटी मुगाची डाळ १ वाटी उडीद डाळ १ वाटी तूप १ वाटी पिठी साखर आवडेल तेवढी वेलची पूड, जायफळ वगैरे आवडत असल्यास आणि तब्येतीला परवडत असल्यास मूठभर बदाम, काजू वगैरे कृती - मुगाची डाळ आणि उडीद डाळ लाल गुलाबी रंगाची होईपर्यंत खमंग भाजून घ्या. थोडी गार झाली की मिक्सरवर रवाळ दळून घ्या. एका नॉनस्टिक कढईत तूप गरम करा. त्यात डाळींचे पीठ घाला. अजुन थोडा गडद रंग येईपर्यंत भाजून घ्या. खमंग भाजले की गॅस बंद करून पिठीसाखर आणि वेलची जायफळ मिसळा.

गिफ्ट ऑफ मॅगी .

लेखक तर्री
बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी साहित्याच्या रसिकांना ह्या शीर्षकाने वाटेल , तर्री "तर्र" झाला की काय ? "गिफ्ट ऑफ मॅगी " पाककृती मधे कशी ? गल्ली चुकली बहुतेक ! मी पाककृती लिहीणार म्हणजे गल्ली चुकली बहुतेक हे खरेच आहे पण मंडळी शीर्षक ही बरोबर आहे. मी देत असलेल्या दोन पाककृती नेसले च्या " मॅगी " वर " बेतलेल्या " आहेत , म्हणून शीर्षक " गिफ्ट ऑफ मॅगी ". ह्या पाककृतीचे "झुणका" तथा " पिठले " ह्या दोनही पदार्थां बरोबर आणि "गरज ही शोधाची जननी " आहे ह्या म्हणी बरोबर घनिष्ठ संबंध आहे . पाककृती १. पिठले अथवा झुणका आवडी प्रमाणे करावा .

मी परत असं वागावं का ?

लेखक जिप्सी
मंगळवार, 12/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज कधी नाही ते पी.एम.टी. नं प्रवास करायचा योग आला,नेहमी प्रमाणं गर्दी होतीच. नियमाप्रमाणं काही सीट महीलांसाठी राखीव असतात. गर्दीमुळं बरेच लोक उभेच होते,त्यात बायकाचं जास्त होत्या.एका राखीव सीटवर ३ पुरुष बसून होते.मी बसमधल्या एका बाईंना म्हणालो की त्यांना उठायला का नाही सांगत नाही? त्यावर उत्तर मिळालं की,अहो हे रोजचंच आहे. मग मी त्यां तिघांना उठायची विनंती (खरचं !) यावर त्यांनी माझ्याबरोबर बरच भांडून घेतलं,अगदी 'बा'चा'बा'ची झाली.तू उतर तुला बघून घेतो इथवर झालं. कंडक्टरसाहेब 'नरो वा कुंजरो वा' होते.पण आमच्या भांडणात बसमधली एकसुद्धा बाई मधे पडली नाही, ज्यांच्यासाठी भांडत होतो.