Skip to main content

I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ५

गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा तो फोटो कदाचित आपण पाहीला असावा,'धुर' असेल अस वाटत खरं,पण नाही तो धुर नव्हता.उत्तर मजेशीर आहे,उत्कंठा व ज्ञान वाढवणारे,पण जाउ दे तुम्हाला नाही ऐकायच तर आम्ही का बोटांना त्रास द्यावा? असो,तर आज हे गणपती बघा,साध्या पीओपीने बनवले आहेत्,मग एवढे चमकतायत का?? (obviously फ्लॅश कींवा लाईट मारली नव्हती,नाही तर त्यात खास काय राहील? पण तुम्हाला जे खरे वाटेल ते मत बनवुन घ्या)

कोजागिरी पौर्णिमा

गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कितीही रात्री जागल्या तरी पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्याला तर कोजागिरीची बासुंदीही गोड नाही
काव्यरस

जादु कि आणखी काय?

गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली काही दिवसातला माझा अनुभव असा कि ज्यांच्या खिजगणतितही मी नव्हते त्यांना मी हल्ली आवडायला लागलेय. हे लोक शाळा, कॉलेजात व शेजारी होते व आहेत. एक वर्गातली मुलगी आता समोर आली तरी बोलेल का अशि शंका होती तिने मला चक्क फेस्बुकवर अ‍ॅडलेय, वर मेसजेस व्र मेस्जेस. एकाने तर मुम्बइला आलिस कि लगेच भेट खुप गप्पा मारायच्यात म्हणुन निमंत्रण दिलेय. एका खडुस शेजार्याने पण कशी आहेस काय म्हणतेस म्हणुन मेसेज पाठवलाय. हि ३ उदाहरणे पण प्रत्य्क्शात खुप . आता ही फेसबुकची जादु कि आणखी कसली? हा मला प्रश्न पडलाय. तुम्ही जरा प्रश्न सोडवायला मदत कराल का?

चकलीची भाजणी

लेखक जागु
गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: १ किलो तांदुळ अर्धा किलो चणा डाळ पाव किलो उडीदडाळ २०० ग्रॅम मुगडाळ दोन मुठ पोहे १०० ग्रॅम जिर क्रमवार पाककृती: तांदुळ स्वच्छ धुवुन वाळवुन घ्या. डाळी कडक उन्हात २-३ दिवस तापवुन घ्या म्हणजे लवकर भाजल्या जातात. जिर निवडून घ्या. वरील सर्व जिन्नस एक एक करुन मध्यम आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजावे व दळून आणावे. दळून आणल्यावर. हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत सिल करुन ठेवावे म्हणजे वास उडत नाही. अधिक टिप : आवडत असल्यास थोडे धणेही घालावेत.

मी पाहिलेला गणेशोत्सव

लेखक पारा
गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी गणेशोत्सव निमित्त, मी आमच्या गोव्याच्या घरी गेलो होतो. आणि अनुभवाने मनाला आलेल्या उन्मनी अवस्थेचं वर्णन कोणीही आपल्या मातृभाषेतूनच सर्वाधिक सक्षमपणे करू शकतो असं माझं मत आहे. ह्या पूर्वी मी तिथे गेलो होतो त्याला आता सहा वर्ष उलटून गेली, त्यामुळे धूसर आठवणींखेरीज माझ्या गाठीला त्यातलं फारसं काही उरलेलं नव्हतं. ह्या आठवड्यात मी एक अत्यंत वेगळा गणेशोत्सव पाहिला. कोकणात गणपती हा अतिशय मानाचा उत्सव, तसं पाहता, दिवाळी, दसऱ्यापेक्षाही हा सण जास्त उल्ल्हासाने, सुंदरतेने साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी तर कोण गजहब. चतुर्थीला गणेशाची सजवलेल्या मखरात प्रतिष्ठापना केली जाते.

फ्लावरच्या देठचि भा़जि

लेखक Shubhangi Pingale
गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
first time देत आहे काहि चु़कलल्यास शमा करा आपण फ्लावरचि भाजि करतो आणी त्याचा देठ फेकुन देतो पण तस न करता तो बारिक चिरुन घ्यावा एका टोपात पाणि आणि मिठ टाकुन थोडावेळ तसच ठेवावे. आता फोडणी टोपात तेल घालावे राई, जीर, हळ्द, हिग घालावे कादा घालावा तो बदामि झाला कि त्यात आवडी नुसार मिरचि पावडर आणि त्यानुसार साखर घालावि न॑तर भाजि निथळून घालावि टोपावर झाकण घालुन त्यात थोड पाणी घालावे (ताटात). थोडावेळाने टोप ऊचलुन कु़कर मध्ये ठेवावे चार ते पाच शिट्टया घेवून ब॑द करावा (देठ थोडा शिजायला ‍वेळ लागतो.

कोजागिरी

गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सोसयटी मध्ये कोजागिरी साजरी करणार आहे. गाण्याच्या भेन्ड्या नेहमी खेळ्तोच. काही नविन खेळ ,कार्यक्रम कुणाला माहित असतिल तर कळवा.