Skip to main content

आनंद मेळावा

Published on शुक्रवार, 29/10/2010
दिवाळीत अनेक ठिकाणी आनंद मेळावे भरत असतात.. मिसळ पाव समुहातिल सदस्यांचा आनंद मेळावा भरवावा काय़? याची चाचपणी करण्या साठी धागा गुंफला आहे सन्माननीय सभासदां कडुन मत प्रदर्शन/सुचना/मार्ग दर्शना/कार्यक्रम रुपरेशा आदी बाबत ची अपेक्षा आहे..

फुल्ल टू दबंग

Published on शुक्रवार, 29/10/2010
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.

चकली भाजणी---

Published on शुक्रवार, 29/10/2010
साहित्य-- एक किलो तांदूळ, अर्धा किलो चना डाळ, पाव किलो उडीद डाळ, वाटीभर पोहे, एक डाव धने, एक डाव जिरे. कॄती----- तांदूळ व चना डाळ धुवून पसरुन ठेवावी, जरा वाळत आली की भाजायला घ्यावी, मुठ शेकी ( म्हणजे भाजणी खमंग न भाजता त्यातून चांगल्या गरम वाफ़ा येउ लागल्या की भाजणे बंद करावे.) , भाजणी नेहमी मंद आचेवर भाजावी,उडीद डाळ धुवु नये, तशीच भाजावी, धने - जिरे भाजावेत.पोहे भाजावेत. गार झाल्यावर बारीक दळून आणावी.

रामदासांचे लेखन लोकप्रभेत

लेखक अवलिया
Published on शुक्रवार, 29/10/2010
आपले सर्वांचे लाडके श्री रामदास यांचा रत्नांवरील सुरेख लेख यंदाच्या लोकप्रभेत आला आहे. तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती :) http://www.loksatta.com/lokprabha/diwali2010/diwali09.htm रामदासांचे असेच लेख नियमित वेगवेगळ्या मासिकात येत राहो तसेच लवकरात लवकर त्यांच्या लेखांचा संग्रह किंवा कादंबरी कागदावर प्रकाशित होऊन आम्हाला वाचायचा योग येवो अशी प्रार्थना !! जियो रामदास !! जियो !!

सावध रहा नकली खवा बाजारात आला आहे.

लेखक आप्पा
Published on शुक्रवार, 29/10/2010
मुळ बातमी : दिवाळीच्या तोंडावरच औरंगाबादसह लातूर, बीड, उस्मानाबाद, पुणे, धुळे येथून हजारो किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा बनावट खवा 'मेड इन गुजरात' असून देशभरात तो पोहोचवला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईनंतर उघड झाले असून गुजरातच्या आणंद येथील 'ऑनेस्ट डेअरी प्रॉडक्ट'ने हा खवा बनवला होता. आणंदहून खासगी ट्रॅव्हेलने दररोज नकली खवा येत असल्याची खबर मिळाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी जालना रस्त्यावरील ट्रॅव्हल कंपनीवर छापा घालून १२४० किलो 'मिठास' खवा पकडला.

भाषाविज्ञान परिचय

Published on शुक्रवार, 29/10/2010
महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांमधे बी.ए.च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात 'आधुनिक भाषा विज्ञानाचा' अंतर्भाव केलेला दिसतो. भाषा म्हणजे काय, भाषेचे स्वरुप, कार्य वगैरे यावर प्राथमिक स्वरुपात जसा अभ्यास असतो त्या प्रमाणे भाषाविज्ञानाचाही अभ्यासही असतो. पारंपरिक भाषाभ्यासाबरोबर आज आधुनिक भाषाविज्ञानाचा अभ्यास आता महत्त्वाचा मानला जात आहे. भाषाविज्ञान म्हणजे केवळ व्याकरण नसते तर, मुखावाटे कोणते अवयव ध्वनी निर्माण करतात कोणते ध्वनी भाषेमधे वापरले जातात. ध्वनीच्या रचना कशा होतात त्यांना अर्थ कसे प्राप्त होतात.

लोक्सत्त्तेची निस्प्रुह पत्रकारिता

Published on शुक्रवार, 29/10/2010
लोकसत्तेमध्ये मागील ३/४ दिवसात फारच सुंदर अग्रलेख आले आहेत. जगातून जातीयवादी शक्तींना नाहीसे करण्याचा लोकसत्तेने जो विडा उचलला आहे तो खरोखर स्पृहणीय आहे. जगात घडत असणाऱ्या सर्व वाईट गोष्टीना सर्वस्वी संघपरिवार उत्तरदायी आहे यात काहीही दुमत असण्याचे कारणच नाही. लोकसत्तेचा २५ ऑक्टोबरचा भगवे दहशतवादी हा अग्रलेख हा याच मालिकेतील एक दुवा आहे. संघाचे कोणालाही माहित नसलेल्या छुपे अतिरेकी मनसुब्यांचा लोकसत्ताने या अग्रलेखात पडदाफाश केला आहे. गुजरात मध्ये विकासाचे ढोंग करणाऱ्या नरेंद्र मोदींना यात चांगलेच झोडपले आहे.

अभ्यंग स्नान..

लेखक डावखुरा
Published on शुक्रवार, 29/10/2010
तीळीचे तेल..आणि वनौषधिंनी युक्त होममेड (आईने बनवलेलं) असे त्यात थोडे बेसन पीठ मिसळुन ते दुधात भिजवुन त्यात थोडेसे मध कालवुन या पद्धतीचा उट्ण..

तुमची खादाडी- कर्करोगाचा उपास

लेखक रन्गराव
Published on गुरुवार, 28/10/2010
डॉक्टर विल्याम ली ह्याचं हे भाषण- कर्करोग कसा होतो आणि त्याला आहाराच्या माध्यमातून कसं दूर ठेवता येईल ह्याची शास्र्तोक्त माहीती देणारी ही चित्रफित. http://www.ted.com/talks/william_li.html अवांतर- सबटायटल्स उपलब्ध आहेत!

आई.. मिटलेला श्वास ... ४

लेखक गणेशा
Published on गुरुवार, 28/10/2010
आई.. मिटलेला श्वास ३ - http://www.misalpav.com/node/15127 पार्श्वभुमी : दारातील रांगोळी ही काही तरी स्मरणांचे टीपके बोलते आहे, आणी संध्या समयी जीवन सूर्य क्षितिजापल्याड गेलेला पाहुन स्वताचे वलयांकीत जीवन ही व्यर्थ वाटणारा हा नायक .. उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त --------- शब्दमेघ
काव्यरस