काल सकाळी घरून कामासाठी एके ठिकाणी जात असताना एक वाईट अनुभव आला.
सकाळी साधारणपणे ९ च्या सुमारास पुणे-सातारा रोड वरून माझ्या दुचाकीने जात होतो. जाताना बिबवेवाडी चौकातील सिग्नल पाशी येऊन थांबलो. सकाळी ९ ची वेळ असल्याने सिग्नलवर दाटीवाटी झालीच होती. मी झेब्रा क्रोसिंग च्या मागे गाडी बंद करून शांतपणे थांबलो. आजू बाजूला सुद्धा काही गाड्या थांबल्या. तोच मागे एक कर्णकर्कश्श हॉर्न ऐकू येऊ लागला. मागे वळून पाहतो तर एक धिप्पाड व्यक्ती मला 'पुढे हो' असे हातवारे करून सांगत होती. मी तिला व्यवस्थित सांगितले कि 'बाबा रे, हिरवा सिग्नल नाहीये आता, थोडा वेळ थांब. मग पुढे जाऊ'.