(((निशाण)))
जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे? पराजित सारे मरून गेले जेत्यांचा भाटगण गात आहेनसे भाट ना मी द्वेष्टा केवळ भक्त व्यासमुनींचा ज्याने लिहिली समग्रगाथा स्वजन्मरहस्य नोंदले आहे ( नकोत चर्चा व्यास कोण तो तोच का ज्याने संपादले वेद की कुणी अन्यकृत लेखन व्यासशिरी खोविले आहे)
मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे? पौरुषहीन जो संन्यस्त झाला कामलालसा घेते प्राण आहेवेदवचने वा उपनिषदे असो मार्गदर्शक सदैव आहे कुणी उल्लंघता स्वैरपणे दोष कसा त्या ग्रंथास लागे?
पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे? धर्म रक्षणासाठी कवचाचे अधर्म्यांकडूनच दान आहेपहावया पंचभोक्त शय्या ती दरबारी कुत्सित चौकडी असे त्या चमुस करी जो प्रवृत्त सूर्यपुत्र कर्ण त्याचे नाव आहे मित्रद्रोह केवळ पातकासमान यास्तव रक्षि म्हणे हस्तिनापुर फसवुन द्विजास मिळवी अस्त्र वर्तन ह्याचे जाहिर आहे शटं प्रति शाट्यम हीच नीती अथवा पेरावे ते उगवे दिसे अशा मनुष्यास करण्या शासन स्वये इंद्र भुतली येत आहे
'पांडव' तो जरी इंद्रपुत्र गादीवर हक्क सांगत आहे पान्हा तोडून टाकले जिने पाचांचे जीवदान मागत आहेसत्यवचन कथसि त्वां हाच दैवाचा खेळ आहे कुंतीच्या भाळी लिहिले अक्षय दु:खाचे वरदान आहे (का हा खेळ केवळ मनाचा केल्या कृत्यास फल वांच्छे कृतप्रणाशाकृताभ्यागम हा तर इथला नियम आहे)
रजस्वलेची फेडुनी वस्त्रे अंकी बसण्या बोलवत आहे? जी राज्य स्वतःचे मिळाले असता फजिती करून हसत आहेदॄष्टीदोषे घसरुनी पडता जन हसती रित आहे परंतु केवळ याचकरिता वस्त्रे फेडणे पातक आहे (नकोच चर्चा त्या कृतींची लोककथा वर्णत आहे जाणकार म्हणती श्लोक प्रक्षिप्त त्यांना मान देत आहे)
नरो वा कुंजरो वा 'धर्मराजाचा' प्रताप आहे नि:शस्त्र वृद्ध घेरून वधला सूड पुत्राचा पाप आहे?फेअर इन लव्ह अॅन्ड वॉर ही आजची रीत नोहे अभिमन्यु ही असाच मेला रात्री घटोत्कच विक्राळ आहे
नसे धर्मवान सर्वदा कोणी लोभ कोणाला चुकला आहे? 'जया'ची बाजी ज्याने मारली तो ईश्वरपदाला पोचला आहे.लोभाने अन लालसेने मनुष्य मनुष्या मारत आहे सांगण्या मनुष्य वर्तन व्यासास गणेश सहाय्य आहे मी ना भाट पांडवाचा वा नसे मी कौरवद्वेष्टा व्यासरचित महाभारत ग्रंथ मज आवडीचा आहे जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे कुणास न झुकते माप इथे व्यास प्रतिभेचा सन्मान आहे कुणास न झुकते माप इथे व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
लेखनविषय:
याद्या
2181
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
अरे वा!
य्ये बात है!
नाना मस्तच रे धम्स अप
थोडी निराशा
मला वाटतं धर्मरक्षक,
In reply to थोडी निराशा by रन्गराव
छान तर्क
In reply to मला वाटतं धर्मरक्षक, by राघव
मस्तं रे नानूस.
कविता जबरदस्त
__/\__ सह्ही रे नानबा.
जय नावाचा इतिहास जो घडले तसेच
नाना.. तुमची प्रतिभा... !!
खुलासा