Skip to main content

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

Published on 30/09/2025 - 10:15 प्रकाशित मुखपृष्ठ
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 21253

व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचन‌ प्रयोग

Published on 29/09/2025 - 14:06 प्रकाशित मुखपृष्ठ
व्हिन्सेंट व्हान गॉग (१८५३-१८९०) १ उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2045

जाडजूड ग्रंथांद्वारा विषबाधा !

Published on 29/09/2025 - 08:41 प्रकाशित मुखपृष्ठ
पंधराव्या शतकात कागदावरील छपाईचा महत्त्वपूर्ण शोध लागला. त्यानंतर कालौघात छापील पुस्तके बाजारात अवतरली. खूप मोठ्या आकाराची पुस्तके तयार करताना त्यांची बांधणी करण्याची विविध तंत्रे विकसित झाली. सुरुवातीला त्यासाठी जनावरांचे चामडे वापरले जायचे परंतु कालांतराने त्याच्या जागी जाडपुठ्ठा वापरात आला. सन 1840 मध्ये अशा बांधणी केलेल्या पुस्तकांचा कणा आकर्षक व चकाकता दिसण्यासाठी बांधणीदरम्यान त्यात पॅरिस ग्रीन या रंगद्रव्याचा देखील वापर होऊ लागला. पुस्तकांच्या सौंदर्यवर्धनाबरोबरच या रंगद्रव्याचा अजूनही एक लाभ होता तो म्हणजे, पुस्तकांचे कृमी व कीटकांपासून संरक्षण.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2174

शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- चौथी माळ-पिवळे पक्षी

Published on 28/09/2025 - 17:15 प्रकाशित मुखपृष्ठ
n0 या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ --------- शारदीय नवरात्रितील देवीचे विविध रंग- पहिली माळ - पांढरे पक्षी दुसरी माळ - लाल तिसरी माळ - निळा चौथी माळ- पिवळा

याद्या 2594

ये दिल मांगे मोर!

Published on 28/09/2025 - 07:35 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो याचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी (सर्व खेळ धरून) हा एक. इन्स्टाग्रामवर याचे सर्वाधिक अनुयायी आहेत. अर्थातच सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी सुद्धा आहेच. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातली एक गोष्ट सांगितली. काही वर्षांपासून त्याला एक छान जेट विमान घ्यायची ईच्छा होती. आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत वाटेल तिथे खाजगी प्रवास करता येण्यासाठी. प्रसिद्ध व्यक्तींना लोक कुठेही एकटे सोडत नाहीत. ते दिसले की त्यांचे फोटो व्हिडिओ काढतात, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1090

दशावतार - आठवणींची साठवण

Published on 25/09/2025 - 23:14 प्रकाशित मुखपृष्ठ
||श्री कातळोबा प्रसन्न|| ढिशक्लेमर – हा दशावतारचा review नाही. फक्त काही आठवणींची साठवण. शनिवारी दुपारी घरातली सगळी कामं आवरली आणि बहिणीला call केला - ‘ए वैदू, उद्या दशावतार बघायला जायचं का?’ “हो चल ना, जाऊ की, मी येऊ शकते.” आमच्या बहिणाबाई काहीही आढेवेढे न घेता, अगदी पहिल्या झटक्यात सिनेमा बघायला यायला तयार झाल्या हा माझ्यासाठी अगदी सुखद धक्का होता. म्हणलं मॅडमचा मूड बदलण्याआधी पटकन तिकीट काढून घेऊ. तिकीट book केले आणि facebook उघडले. एव्हाना दशावतारचे reviews यायला लागले होते. एक-एक review वाचून मला अगदी तळ्यात – मळ्यात होत होतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2453

गूगल फोटोजमधून मिपावर फोटो शेअर करणे. २०२५_०९_२५

Published on 25/09/2025 - 14:12 प्रकाशित मुखपृष्ठ
गूगल फोटोजमधून मिपावर फोटो शेअर करणे. २०२५_०९_२५ google photos वर 'shared album ' कसा तयार करावा आणि का करावा.

google photos वर आपण फोटो अपलोड करतो किंवा backup करतो.
मिपावर फोटो देण्यासाठी एक वेगळा shared album तयार करून त्यास खास नाव दिले ( उदाहरणार्थ = माथेरान मिपा २०२५_०९_१२ किंवा Goa mipa 2024_11_08 ) तर आपल्याला लक्षात येते की हा अल्बम त्या ठिकाणचे त्या तारखेचे फोटो मिपावर लेखात देण्यासाठी आहे आणि तो आपल्याकडून चुकून डिलीट केला जात नाही. हे झाले नाव देण्याबाबत organiser.

shared album 'मध्ये फोटो ठेवल्याने ते वेगवेगळे share करण्याची खटपट वाचते.

याद्या 4324

विषारी (टॉक्सिक) माणसे

Published on 25/09/2025 - 12:12 प्रकाशित मुखपृष्ठ
आयुष्य शांततेत घालवायचे असेल तर आयुष्यात दुष्ट आणि विषारी लोकांना खड्यासारखे बाजूला करता आले तर आयुष्य प्रवाही बनते. ही माणसे सहसा कोडगी असतात आणि परत-परत आपले विषारी अस्तित्व प्रकट करत राहतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवताना चडफडतात आणि उघडी पडतात आणि मग जिवाच्या आकांताने अनैतिक मार्गाचा अवलंब करतात. आपण सावध राहिलो तर एक वेळ अशी येते की मग ती उघडी पडतात. काही वर्षापूर्वी एका मानसोपचार तज्ञाने मला फेबुवर फ्रेण्ड-रिक्वेस्ट पाठवली आणि मी ती स्वीकारली. मी तेव्हा फोटोग्राफी करत असे. ही व्यक्ती पण थोडी फोटोग्राफी करायची पण त्यात वैविध्य किंवा प्रयोग नव्हते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2135

नवरात्री निमित्ताने

Published on 24/09/2025 - 17:07 प्रकाशित मुखपृष्ठ
#नवरात्री निमित्ताने परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बद‌लले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1869

यांत्रिक घड्याळे

Published on 24/09/2025 - 05:21 प्रकाशित मुखपृष्ठ
यांत्रिक घड्याळे माझा घड्याळांशी संबंध आला तो १९८० मध्ये. काहितरी छंद या दृष्टीने एक जुने मनगटी घड्याळ उघडून ,त्याचे भाग सुटे करून जोडले. मग या घड्याळ रिपेंरिंगची हत्यारे, नवीन सुटे भाग कुठे मिळतील याचा शोध घेतल्यावर मुंबईत जे.जे. हॉस्पिटल आणि भुलेश्वर दरम्यान ही दुकाने सापडली. मग याच घड्याळाबरोबर एक गजराचे घड्याळ आणि भिंतीवरचे टोले देणारे घड्याळही उघडले. तर ही सर्व घड्याळे तांत्रिक पद्धतीची होती. डिजिटल जमाना आला १९९५ मध्ये आणि काम बंद झालं. २००५ नंतर मोबाईल येऊ लागले आणि त्यांनी तर बऱ्याच गोष्टींना बाद केलं.

याद्या 4947