मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही नाती .......

संजयशिवाजीरावगडगे ·
लेखनविषय:
काव्यरस
काही नाती मिरवायची असतात; मेडलसारखी काही दाखवायची असतात; दातांसारखी काही नाती भोगायची असतात; सम्राटासारखी काही नाती वाहायची असतात; ओझ्यांसारखी काही नाती ओळखायची असतात; गुपितांसारखी काही समजून घ्यायची असतात; प्रेमासारखी काही नाती जोडायची असतात; धाग्यांसारखी काही पेलायची असतात; गोवर्धनासारखी नातीगोती हातात नसतात; नशिबासारखी म्हणूनच काही नाती विसरायची असतात; दुःखासारखी . ( संग्रहीत)

आंब्याची चव चाखून बघा

पाषाणभेद ·
लेखनविषय:
आंब्याची चव चाखून बघा
आबं माझ्या पाटीतलं पिकल्यात सारं चवीला ते लागत्यात न्यारं पिकलेला आंबा हाती घेवून बघा एकदा त्याची चव चाखून बघा ||धृ|| कालपर्यंत कैरी होती पाडाची फांदीनंफांदी लगडली झाडाची आता दुसरीकडं नजर मारू नका एकदा त्याची चव चाखून बघा ||१|| आंबेबन आहे लई मोठं माझं गावामध्ये नाव आहे त्याचं वाडीत कधी येता ते सांगून टाका एकदा त्याची चव चाखून बघा ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/११/२०१०

नवा "Axis of Evil"?

सुधीर काळे ·
रेगन जेंव्हां अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेंव्हां त्यांच्या रशियाच्या भेटीत त्यांनी रशियन जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सोवियेत राजवटीचा "Evil Empire" असा उल्लेख केला होता.

मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी

देवदत्त ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण २००६ पासून ऐकण्यात असलेली ’मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी’ सुविधा अखेर २५ नोव्हें २०१० पासून हरियाणामध्ये सुरू झाली. इतर भागांत ती २० जाने २०११ पासून सुरू होईल अशा बातम्या आहेत. मी ह्या ४ वर्षांत ३ क्रमांक बदलले. पण ह्या सुविधेचा मला फायदा झाला नसता, कारण माझे शहर आणि मोबाईलचे क्षेत्र ह्यांतच बदल होत गेला. आणि सध्यातरी ह्या सेवादात्याकडून एकदम बदलूनच टाकावे अशी काही वाईट सेवा नाही. तरीही ही सुविधा नेमकी कशाप्रकारे वापरता येईल हे पहायचा प्रयत्न केला.

विमानतळावर सुरक्षा सुची

रणजित चितळे ·
आपण जेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा कक्षेत (सिक्युरीटी साठी) जातो तेव्हा आपल्याला एक सुची लावलेली दिसते. त्यात अशा व्यक्तींची नावे असतात ज्यांना सिक्युरीटी तून सूट दिले गेली आहे सरकारने. साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत. त्या पदावर जर कोणी असेल तर त्या इसमाला सूट. शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा नामक ईसमाचे आहे. आता हा रॉबर्ट वाडरा कोण. त्याने असे काय केले की त्याला सूट आहे. भारतात जर अजुन कोणी त्याच नावाची असतील त्या सगळ्यांना सूट आहे का. अजुन कोण कोण पात्र होतील त्या सुचीत नाव सापडण्या योग्य. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर इत्त्यादीं चे नाव येऊ शकते का.

पातंजल योगदर्शन

शरद ·
पातंजल योगदर्शन योग ह्या विषयावर आलेल्या लेखाला चांगला वाचकवर्ग व प्रतिसाद मिळाला. खरे म्हणजे मागेच योगदर्शन या दर्शनाबद्दल लिहावयाचा विचार होता. पण त्यावेळी या विषय इतका आवडीचा असेल असे वाटले नव्हते म्हणून राहिले. असो. प्रथम त्या लेखावरील विषयांची काही माहिती घेऊन आपण योगदर्शनाकडे येऊ. (१) योगासने : पाश्चात्य देशात "योग म्हणजे योगासने व काही प्रमाणात प्राणायाम" अशी समजुत झाली आहे असे वाटते. मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. भारतातील योगाचे साध्य वेगळे आहे व त्या मार्गात आसने व प्राणायाम ही साधने मानली गेली आहेत.

पाकिस्तानी व्रुत्तपत्रांची मान खाली

शेखर काळे ·
ही पहा आजची बातमी - http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-how-pak-media-used-wikileaks-for-india-bashing/20101210.htm पाकिस्तानी वृत्त संस्था कधी अशी दिलगिरी व्यक्त करत नाहीत. आताच हे असे कसे झाले ?

माणुसकीचा झरा ..!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
माणुसकीचा झरा तो शोधात असतो माणसातल्या माणुसकीचा झरा त्याला भेटतात छान अशी माणसे प्रेमाने पाठीवरून हात फिरवणारी माणसे कारण तो एकटा आहे ह्या जगात एखादा भेटतो कपटी नाही असे नाही स्वार्थी .! मतलबी ..!! पण तो माफ करतो नि शोधत बसतो त्यांच्यातील चांगुलपणाला त्यांना पण देतो आपल्या मैत्रीचा सुगंध नि माफ करतो मनापासून त्यांच्यातील स्वार्थीपणाला कुणास ठाऊक कोठून आला हा त्याच्यात गुण कसा फुटला त्याच्या मनात ह्या माणुसकीचा झरा अशे त्याला खूप झरे सापडले डाक्टरच्या रूपाने मैत्रीच्या रूपाने ज्यांनी महारोग्यांना सुद्धा जवळ केले लाखो अंधासाठी आपले कसब लावले नि दिले दृष्टी हिरवी हिरवी