आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची.
परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्या नायकिणी आल्यात.