Skip to main content

नायकिणीचा नाच

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची. परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात.

ब्रा-ज्वलन ते मुखपुस्तकावरील उरोजकर्क स्थितीसंदेश : स्त्रीमुक्तीवादातील बंधन-दृष्टिकोन प्रवासाचा मागोवा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 19/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नगरीनिरंजन यांनी मुखपुस्तकातल्या उरोजकर्क स्थितीसंदेशांवर एक खुमासदार लेख लिहिला होता. वरवर पहाता हा लेख हलकाफुलका, वात्रट वाटतो खरा, पण त्यामध्ये गहन अर्थ दडलेला आहे. ती लिंगभूमिकांविषयी, स्त्रीमुक्ती चळवळीविषयी काळ्या विनोदातली टिप्पणीच आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. उरोजांप्रमाणेच ठसठशीत समोर दिसणाऱ्या या विषयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं हूक काढल्याशिवाय तो विषय हातात सामावून येऊच शकत नाही असं आम्हाला वाटलं. म्हणून एक स्वतंत्र लेखच लिहायचं आम्ही ठरवलं. साठ का कुठच्याशा दशकात अमेरिकेत स्त्री-मुक्तीचं वारं वाहात होतं.

लेवू दे निळाई..

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 19/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
झेपावत्या धरेला गगना कवेत घेई अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई - स्वानंद
काव्यरस

बंडूच्या स्वप्नातच येते -

लेखक विदेश यांनी शनिवार, 18/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बंडूच्या स्वप्नातच येते स्वर्गामधुनी छान परी झोपेमधला हीरो बंडू मौजमजा धम्माल करी ।१। खात ‘ बुढ्ढीका बाल ’ शंभर बंडू होतो लालीलाल चोखत लॉलीपॉप शंभर बंडू करतो पहा कमाल ।२। ट्वेंटी-ट्वेंटित बंडू ऐटित ठोकी शतके चार बळी दहाही घेऊन करतो शत्रूला बेजार ।३। खुशालचेंडू मिळवी बंडू गुण शंभरपैकी शंभर निकालात ना कधीच सोडी तो अपुला पहिला नंबर ।४। ऑलिंपीक वा एशियाड ती असो कोणतीही स्पर्धा प्रतिस्पर्ध्यांची उडवी बंडू क्षणात भलती त्रेधा ।५। बंडू वरचढ ठरतो नेहमी - खेळ असो मारामारी कुस्तीमध्ये डाव बंडुचा धोबीपछाडच भारी ।६। मारी शाळेला तो बुट्टी स्वप्नामधला बंडू देतो अभ्यासा तो सुट्टी खेळत विट्

सायबानू मीच त्यो .... अंतिम

लेखक स्पा यांनी शनिवार, 18/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ http://www.misalpav.com/node/15817 भाग २ http://www.misalpav.com/node/15840 भ्रष्टाचार करून, किसन आणी त्याच्या कुटुंबाचा जीव घेतलेल्या, शेळ्क्यांवर त्यांचाच डाव उलटलेला असतो.... हळू हळू बदल्याचा अघोरी खेळ त्या बंगल्यात सुरु झालेला असतो..

आक्रोष

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 18/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ते झाड तोडल्या पासून त्यांचा आक्रोष वाढला होता तसा आमचाही नाईलाज होता त्या झाडाखाली पार्क केलेल्या आमच्या कीमती गाड्यांवर वादळ वा-यानं फांद्या तुटून पडण्याचं भय होतं.. नुकसान झालं असतं आमच्या गाड्यांचं कधीहि भरून न येणारं..!!!!! त्यापेक्षा त्या झाडाच्या फाद्यांवर वसलेली त्यांची इवलिशी घरटी, पिलांसकट उध्वस्त झाली तरी चालतील असा व्यवहार्य विचार केला आम्ही..! आहो घरटी काय, ते पुन्हा बांधू शकतात फुकट ! पिल्ल काय ,ते पुन्हा जन्माला घालू शकतात फुकट ! पण झाडाची फांदी कोसळून मोडलेली आमची गाडी घेण्यासाठी, पैसे मोजावे लागतील आम्हाला..!! छे !
काव्यरस

नवरत्नहार

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 18/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय श्री गणनायका। रिद्धी सिद्धी प्रदायका। सकल अरिष्ट नाशका। एकदंता ॥१॥ अनन्य भावाने शरण। येता मज लीनपण। आले अहंतेसी मरण। भक्तीयोगे ॥२॥ कृष्णा तू ची भक्ताधार। विश्व रूपे तू साकार। कृपा तव अपरंपार। भक्तीगम्य ॥३॥ तव कृपा ठरे सार्थ। प्रकटला गीतेचा भावार्थ। प्रपंच आणि परमार्थ। सहज साध्य ॥४॥ मी तो अभागी अनाथ। गुरू मंत्रद्रष्टे सिद्धनाथ। दीक्षा देवोनी सनाथ। केले त्यान्नी ॥५॥ नुरले मायेचे ममत्व। चित्ती साधले समत्व। मज लाभले द्विजत्व। योग बळे ॥६॥ कधी वेदनांचा चारा। कधी भोगांचा पसारा। खेळ प्रारब्धाचा सारा। लीलामात्र ॥७॥ घेता स्वरूपाचा निदीध्यास। लोपे जगाचा आभास। चाले 'सोहम' विनायास। अखण्डत्वे
काव्यरस

व्हेजिटेबल ऑ ग्रातिन : Veg Au Gratin...अर्थात बेक्ड व्हेज

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी शनिवार, 18/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : दीड कप वाफवलेल्या भाज्या दीड कप व्हाईट सॉस ( रेसिपी पुढे देते आहे) २-३ क्युब्ज चीज बटर व्हाईट सॉस साहित्य : दीड tbsp बटर दीड tbsp मैदा दीड कप दूध चवीपुरते मीठ ताजी ताजी मीर पूड (आपल्या खलबत्त्यात जर्राशी खरबरीत बनवलेली असेल तर उत्तम) व्हाईट सॉस कृती : पॅन मध्ये बटर वितळवा..... फक्त वितळवायचे आहे... पुढे गेले तर काळे काळे होते. त्यात मैदा घाला. छान परतवा. मैद्याचा कच्चटपणा गेला पाहिजे. पण रंग बदलु देउ नका. साधारण फेस येणं (मैद्याला :) ) बंद झालं कि मग हळू हळू दूध घाला. सतत हलवत रहा. गुठळ्या होउ देउ नका.

संजयदॄष्टी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 18/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
असावी एक "संजय दृष्टी" आपल्या जवळ आपल्याच मनातले महाभारत पहाण्यासाठी. कारण, वागत असतो कधी कधी आपण धृतराष्ट्रा प्रमाणे , जन्मजात आंधळे असल्या सारखे किंवा स्वतःच बांधुन घेतो स्वत:च्याच डोळ्यांवर पट्टी गांधारी सारखी, पतिव्रतेचा आव आणून.....!!!
काव्यरस