उपमा
शाळेत सर्वात प्रथम शिकवला जाणारा अर्थालंकार म्हणजे उपमा. कळावयाला व ओळखावयाला, उपयोगात आणावयाला सोपा.वाघासारखा शूर सैनिक. वाघ शूर.. माहित आहे; सैनिक वाघासारखा आहे .. सांगितले, सैनिक शूर आहे कळले; एकदम सोपे ! उदाहरण द्या. लांडग्यासारखे क्रूर मास्त.... चुकलो, चुकलो... गायीसम गरीब आई ! लक्षात ठेवावयाचे चार घटक :
[१] ज्या पदार्थाचे वर्णन करावयाचे त्याला प्रस्तुत किंवा उपमेय म्हणतात ... येथे सैनिक / आई.
[२] ज्याची उपमा दिलेली असते त्याला अप्रस्तुत किंवा उपमान म्हणतात....