खुबड्या समुद्रातील खडपांवर ओहोटीच्या दिवसांत मिळतात. ह्या पकडण्यासाठी रात्री कंदील घेउन जावे लागते. अंधारात ह्या खुबड्या कडकांवर येतात त्या ओंजळीने गोळा करतात. सकाळी किंवा दिवसा ह्या खुबड्या तुरळक दिसतात दगडा खाली लपलेल्याही असतात.
खुबड्या हे शेलफुड असल्याने त्यात भरपुर कॅल्शियम असते. ह्या खुबड्या लहान मुलांच्या चिंबोर्याप्रमाणे आवडीच्या असतात. सुईने गोळे काढतानाच लहान मुले अर्ध्या फस्त करतात.
खुबड्या चांगल्या ४-५ पाण्यात धुवुन घ्यावात व त्या बुडतील इतके पाणी आणि थोडे मिठ टाकुन उकडून घ्याव्यात.
उकडलेल्या खुबड्या थंड झाल्या की उकडलेले पाणी एका भांड्यात काढून घ्यावे कढीसाठी. खुबड्यांच्या पाण्याच्या कढीला एलवण्याची कढी म्हणतात.
सुई घेउन खुबडीच्या वरील कच सुईचे टोक खुपसुन काढावी.
ह्या कचेला चिकटूनच खुबडीचा गर (गोळा) बाहेर येतो.
कच टाकून देउन गोळा घ्यावा. हा गोळा पुढे क्रिम कलर, राखाडी कलर आणी शेवटी काळा कुळकुळीत गोळा असतो. काही काही खुबड्यांचा काळा गोळा खुबडीतच अडकुन बसतो. आम्ही लहान असताना आईच्या सगळ्या खुबड्या काढून झाल्या की हा गोळा काढण्यासाठी दगड घेउन खुबडी फोडून हा गोळा काढून खायचो. काय आनंद असायचा त्यात ? मग टाकलेल्या रिकाम्या खुबड्या आम्ही कवडी कवडी म्हणून खेळायला घ्यायचो.
सगळ्या खुबड्या काढताना चुकुन एखादी कच जाण्याची शक्यता असते. पण ही कच आढळल्यास लगेच काढून टाका. कारण ह्या कचेला धार असते. ह्या खुबड्या एक एक काढायला भरपुर वेळ लागतो. साधारण एक तास तरी लागतो ४ ते ५ वाट्यांना. ज्यांना पेशन्स आहेत अशेच खवय्ये हे काम करतात.
सुक्यासाठी लागणारे साहित्य:
खुबड्यांचे ४ ते ५ वाटे
२ कांदे
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
२ चमचे मसाला
सिमला मिरची १ कापुन
मिठ
चिरलेली कोथिंबीर अर्धी मुठ
१ हिरवी मिरची
तेल
अर्धा चमचा गरम मसाला
टोमॅटो किंवा आमसुल
खुबड्यांचे सुके ची पाककृती:
तेलावर लसूणाची फोडणी देउन त्यावर कांदा बदामी रंगावर परतवा. हिंग, हळद, मसाला घालुन परतवुन त्यात खुबड्या घाला. सिमला मिरचिच्या फोडी घाला. झाकण ठेउन त्यावर पाणी ठेउन एक वाफ आणा. खुबड्या शिजवण्याची गरज नसते कारण त्या उकडल्यामुळे आधीच शिजलेल्या असततात. आता त्यावर चिरलेला टोमॅटो किंवा आमसुल घाला. टोमॅटो घातल्यास वाढणीसाठी भर पडते. मिठ, गरम मसाला, हिरवी मिरची मोडून, चिरलेली कोथिंबीर घालुन परतवा व २ ते ३ मिनीटे शिजवुन गॅस बंद करा.
एलवण्याच्या कढीचे साहित्य
खुबड्या उकडल्याचे पाणी
१ कांदा बारीक चिरुन
५-६ लसुण पाकळ्या चिरुन
१ ते २ मिरच्या बारीक चिरुन
थोडी कोथिंबिर बारीक चिरुन
हिंग, हळद
मिठ
थोडा चिंचेचा कोळ
एलवण्याची कढीची पाककृती
तेलावर लसुण, हिंग, हळद, टाकुन जास्त न परतवता (लसुण शिजवायचा नाही पटापट सगळ टाकायच) खुबड्यांचे पाणी व चिंचेचा कोळ टाकुन चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर टाकावी. मिठ टाकावे ही कढी उकळवायची नाही. चव जाते. गरम झाली की बंद करायची. अगदी बेस्ट लागते. साधारण चिंचेच्या कढी सारखीच.
एलवण्याच्या कढी करण्यामागचे रहस्य खुबड्यांचे व्हिटॅमिन्स पुर्ण मिळणे हेच असेल.
वाचने
12546
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा..
जागू, तू ग्रेट आहेस. मी हे
जबर्याच दिसतोय हा प्रकार.
+१
In reply to जबर्याच दिसतोय हा प्रकार. by परिकथेतील राजकुमार
गगनविहारी धन्स. स्वाती अग
मला फोटो दिसत नाहीत
मस्तच......
ज ब र द स्त!!!
जागू, नेहमी प्रमाणे छान
जागू ताई
हो.. रत्नांग्रीस असताना ते
In reply to जागू ताई by गोगोल
गोगोल, आहो सगळेच मासे आधी
थोडे
In reply to गोगोल, आहो सगळेच मासे आधी by जागु
गगनविहारी ह्यांची चव
धन्यवाद. म्हणजे मिळाले नाहीत
In reply to गगनविहारी ह्यांची चव by जागु
अच्छा कच म्हणजे एक छोटासा
हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही.
याच कारणाने बिरड्याची उसळ,
In reply to हॉटेलात कधी मेनूत वाचलं नाही. by जागु
नविनच
पहिल्यांदाच पाहिले आणि ऐकले
@तुझ्याकडेच येईन मी. चालेल
जागुताई तुझ्यामुळे हे सगळे