निदान फुकट तरी द्या..
शनिवार रविवार म्हणजे मोक्षवार. सकाळी उठून आलेयुक्त चहासोबत दोन दोन लठ्ठ पेपर समोर दिसले की ब्रम्हानंद होतो हे पेपरप्रेमींना सांगणे नलगे.
आम्ही टायगर कडक पत्ती चहा (वाघासारख्या मर्दांसाठी..) वापरत नाही तरीही चहाचा पहिला घोट कडू होतो तो पेपर बघून.
नाय नाय..
"पेपरात बघावं तर काय? रोजचे खून, राजकारण, बलात्कार, बाई बाई गं..नको वाटतं अगदी"
..असले लेख खूप जुने झाले.
तसलं काही ल्हिवायचा विचार नाही. जे काय चाललंय ते व्याडेश्वरकृपेने उत्तम चालले आहे असे म्हणू..
..माझं डोकं जातंय ते अशासाठी की पेपरात वाचायला असा कायबी "मजकूर"च नाही.
(क्वालिटी नव्हे..क्वांटिटी....!!!!)
टी.व्ही.वर ब्रेक जास्ती आणि सिर्वल कमी अशी बोंब करता करता आमच्या हक्काचा पेपरही जाहिरातीनी भरलेला असला तर काय करायचं?
भरलेला म्हणजे किती हे आपण सगळे बघतोच. पण तरी आपल्याला अंदाज येत नाही की हे प्रमाण नेमकं किती आहे.
मी पेटून उठलो कुछ करिये कुछ करिये..म्हणत काहीतरी केलं..
हातातल्या फोनवर खटाखट त्या पेपरचे नग्न फोटो काढले.
मग त्या पेपरच्या मालकांनी किंवा इतर कोणी माझ्यावर काही कंटेंट चोरीचे भलते आक्षेप घेऊन मूळ मुद्दा बाजूला पडू नये म्हणून त्यातला मजकूर धूसर केला.
त्यानंतर त्यातला जाहिरातीचा एरिया मार्क करून घेतला आणि त्याला (रं*बाज गुलाबी शेडचा) कलर फासला.
ते फासकाम खाली देतोय. आणि मग काही प्रश्न उभे करणार आहे. चीड जबरदस्त आहे कारण या सर्वात माझा चहा दोनदा थंड झाला होता.
एका (लीडींग) दैनिकाच्या एका दिवशीच्या (शनिवार) एकाच इश्यूची ही पानं आहेत. सर्व प्रमुख पानं कव्हर केली आहेत. मूळ प्रत मजजवळ आहे. निम्ननिर्दिष्ट फोटो संपतात त्याखाली अजूनही महत्त्वाचा मजकूर आहे तो पूर्ण वाचावा अशी विनंती चरणी अर्पण करतो.
..बर्याच पानांची पूर्णच्या पूर्ण आख्खी थोबाडंच लाजेने गुलाबी झालेली दिसतील..
..........
ही समोरासमोरची दोन पाने आहेत..मुख्य मुखपृष्ठ पूर्ण पान जाहिरातीचंच होतं म्हणून आता हे आतलं पेज मुखपृष्ठ बनलंय. त्यातही सगळा आनंदच आहे. डावं पान पूर्ण जाहिराती. उजवं पान, जे खरोखरचं मुख्य पान असायचं तिथे तीन स्लॉट जाहिराती. एरव्ही याहूनही खूप जास्त असतात. हे एक चांगलं उदाहरण म्हणावं लागेल.
.....................................
ही सुद्धा समोरासमोरची दोन पाने आहेत..उगीच तेवढा बिचारा छोट्टासा चौकोन कशाला बातमीसाठी वाया घालवला..? की तीही पेड न्यूज?
......................................
इथे उजवं अर्ध्याहूनही कमी पान बातमीला दिलंय ते कोणत्या लाजेखातर ठाऊक नाही.
.......................................
खालच्या फोटोत वर हेडिंगला जो काही गुलाबी नसलेला भाग दिसतोय ती बातमी वगैरे नाही बरं का. नुसतं टायटल आहे पेपरचं.
हे एक सिंगल पान आहे..एकुलता सिंगल कॉलम सोडलाय बातमीसाठी..धन्यवाद..
..................................
..चक्क अर्धे पान भरुन बातमी लेख वगैरे..हे पूर्ण पेपरातलं सर्वाधिक मजकुराचं मानाचं पान असावं..
.....................................
ही दोन समोरासमोरची पाने आहेत..
...........................................
ही सुद्धा ही दोन समोरासमोरची पाने आहेत..
..........................................
हे एक सिंगल पान आहे..यावर तर एक शब्दही मजकूर नाही.
............................................
हा सर्व गुलाबी रंग बघून दिसली ना नेमकी किती जागा जाहिरातींना आहे आणि किती मजकुराला?
आता माझे मुद्दे.
१) हे मान्य की वर्तमानपत्रांचं प्रमुख उत्पन्न "जाहिराती"च आहे, वाचक स्टॉलवर देतात ते दोन अडीच रुपये नव्हे.
२) जाहिराती वाचकालाही उपयोगी असतातच.
३) जाहिराती कमी केल्या तर पेपराची किंमत अव्वाच्या सव्वा वाढून वाचकांवरच बोजा पडेल.
तरीही
१) वाचकाला वाचण्यासारख्या अश्या बातमी/लेखरूप मजकुराला दहा-वीस टक्के सुद्धा जागा नसावी का?
(...वर पुरावा दिला आहे आणि आपण कोणीही स्वहस्ते एक लीडिंग मराठी पेपर उचलून कमीजास्त फरकाने हे सिद्ध करु शकता.)
२) समजा जाहिरातींच्या बाहुल्यामुळे इतकीच केविलवाणी जागा मजकुराला उरत असेल तर पाने वाढवत का नाही?
३) ते ही शक्य नसेल तर निदान पेपर वाचकांना फुकट का देत नाही? आम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के जाहिरातींनी भरलेला पेपर स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करुन विकत घ्यावा लागणे ही फसवणूक नाही का?
४) तुम्ही, म्हणजे हे वाचणारे.. फुल पेज जाहिरात (अगदी मुखपृष्ठाऐवजीसुद्धा) बघून वैतागत नाही का?
५) जाहिरात देणार्या कंपनीने कितीही पैसे मोजले असले तरी, पेपरचे तोंडच मुळी (हेडलाईन ऐवजी) एका भल्या मोठ्या जाहिरातीच्या स्वरुपात दिसावे ही पेपरची मुस्कटदाबी नाही का?
याद्या
6119
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
पब्लिक लई पेटलंय
मस्त लेखन. हे लेखन वाचुन
आहाहाहाहाहाआ
In reply to मस्त लेखन. हे लेखन वाचुन by परिकथेतील राजकुमार
पटतं आहे ...
आपले मुद्दे तंतोतंत पटतात ..
मी कोणत्याही पेपरचे नाव घेऊ
यासाठी एकच उपाय...
मुद्दे पटले आणि चीड पोचली.
मुद्दे पटले आणि चीड पोचली. पेपर विकत न घेणे हाच एकमेव उपाय.
In reply to मुद्दे पटले आणि चीड पोचली. by नगरीनिरंजन
मुद्दे पटले आणि चीड पोचली.
त्यांच्या जाहिरातींसाठी आपण
हम खरय चला आता त्यावीषयी फेसबूकवर आंदोलन करूया.
आत्म्शुन्य हे गम्तीत की गंभीर
In reply to हम खरय चला आता त्यावीषयी फेसबूकवर आंदोलन करूया. by आत्मशून्य
गम्तीत की गंभीर ?
In reply to आत्म्शुन्य हे गम्तीत की गंभीर by डावखुरा
आगतिक म्हण्जे गंभीर असा अर्थ
In reply to गम्तीत की गंभीर ? by आत्मशून्य
आगतीक म्हणजे होपलेस असा अर्थ घ्या इथे
In reply to आगतिक म्हण्जे गंभीर असा अर्थ by डावखुरा
यासाठी प्रयत्न होउ शकतात
In reply to आगतीक म्हणजे होपलेस असा अर्थ घ्या इथे by आत्मशून्य
माफ करा गगनविहारी मला तर
अगदी
त्यांना पाठवून काय उप्पेग?
In reply to अगदी by गुंडोपंत