मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अबोला गाजला होता.....

मयुरेश साने ·
लेखनविषय:
तुला पाहून माझा शब्द - तेव्हा लाजला होता मुका राहुनही मझा - अबोला गाजला होता तुझा तो स्पर्श चंदेरी - तुझा तो हात पुनवेचा उन्हाचा हात ही माझा - अचानक भाजला होता जरी बेताल मी आहे - नव्हे हा कैफ मदिरेचा तिने सौंदर्य वर्खाचाच - प्याला पाजला होता तुझा मुखचंद्रमा पाहून- मुखडा गाइला होता चेहरा रोजचा दु:खी - सुखाने माजला होता असे स्वप्नात ही व्हावे ? तुला मी फूल देताना घड्याळातून काटेरी -गजर ही वाजला होता मला पाहून आताशा - म्हणे हा आरसा मजला असा मयुरेश नाही पाहिला - जो आजला होता. मयुरेश साने...दि...२९-डिसेंबर-१०

नूतन वर्षाच्या शुभेच्छांसाठी

भाववेडा ·
लेखनविषय:
थिजलेला पारा, निजलेला वारा, गुलाबी पहाटे, भिजलेल्या तारा, धरतीवर दाट, धुके पहुडले, त्यात गुपित, नव्या वर्षाचे दडले, उगवेल दिनकर, धुके विरेल, उघडेल गुपित, जादू घडेल, हीच जादू आपल्या, आयुष्यात घडावी, आमच्या शुभेच्छांची लहर, त्या सोबत जडावी || हे मिपावरील माझे पहिले लेखन आहे, तेव्हा काही चुकले असल्यास माफी असावी. ख्रिस्ती नूतन वर्षाच्या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक शुभेच्छा।

चॉकलेट सॅन्ड्वीच

खादाड अमिता ·
नव वर्षाच्या शुभेछा! आज सुरुवात गोड चॉकोलेटी सॅन्ड्वीच ने करुया! एकदम झटपट 'नो फस' रेसिपी. जेव्हा भूख लागलेली असते आणि चॉकलेट ही खावेसे वाटत असते- त्या वेळी.. किंबहुना केव्हाही खायला मस्त snack. सामग्री: १ चमचा किंवा हव्या तेवढ्या चॉकलेट चिप्स चोकॉचीप्स नसल्यास- कुठल्याही चॉकलेट चे तुकडे ते हि नसल्यास चॉकलेट सॉस किंवा सिरप ते सुद्धा नसल्यास.... तुम्हाला चॉकलेट sandwich घरी करता येणार नाही. दुसर काही तरी करून खा!

नुतनवर्षास....

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
.. रे नववर्षा रे नववर्षा ये नेमाने वल्हवित अंकुर नवजोमाने एक कवडसा चैतन्याचा जा फुलवीत ही उदास राने ....! ना अस्त्राने वा शस्त्राने उकलन व्हावी सद्भभावाने मत्सर-हेका ना गर्जन-केका बाहुबलीचे नको भूजाने .....! दानवाने ना देवाने राज्य करावे बळीराजाने आत्मग्लानी क्लेश त्यजुनी जगावा पोशिंदा सन्मानाने ...! रे नववर्षा दे अभयाने दे भरुनी दुरडी भगोणे वित्तपातल्या लक्तरांना भरव मुक्तीचे चार दाणे ...! ..

एक सकाळ निसर्गाच्या सान्निध्यात

सर्वसाक्षी ·
लेखनप्रकार
येऊरच्या पलिकडे डोंगराच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रिय उद्यानाचे एक प्रवेशद्वार आहे. या द्वारातुन आत शिरले की ३-४ तास मनमुराद भटकता येते. यावेळी काही पाने व फुले टिपायचा प्रयत्न केला आहे.

आरती गुरूदत्ताची

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
मंडळी, शब्दगारवा २०१० मध्ये गुरूदत्ताची आरती गेल्या दत्तजयंतीला प्रकाशीत झालीय. ती येथे देतोय. शब्दगारवा २०१० त आणखीही लेख अन कविता आहेत. त्या आपण नजरेखालून घालाव्यात. (कवितेत सार्थ बदल प्रकाशकाकांनी केले आहेत.

प्रत्येक दिवस नूतन आहे...

ज्ञानराम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सिंहावलोकन करावं , भूतकाळाचं प्रतिबिंब पहावं पदरची घालून माती , आठवणींच रोप लावाव.. सांगा किती प्रयत्न केले , आणि किती निसटल्या संधी ? किती जगलो झूरत झूरत , आणि जगलो किती स्वच्छंदी किती दिले घाव शब्दांचे , किती भरल्या जखमा नंतर, किती वाटा चूकल्या धावताना , आणि चाललो किती अतंर किती बहरला गुलमोहोर प्रेमाचा , आणि किती निवडूंग झालो कितीदा पेटून उठलो हक्काने , आणि कितीदा लाचार झालो सारं इथेच सूटत जाईल , वेळ आणखी संपत जाईल पूसट होतील पाऊलखूणा , शेवटी फक्त आठवण राहील दिवस येईल नव्याने , पण तो ही नंतर सरुन जाईल, नविन इथे काहिच नाहि, आठव फक्त स्मरुन राहिल उगाच नको गोंधळ शब्दाचा , सारं क

चारोळी : नव्या वर्षाचा नवा थाट!!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
काव्यरस
"नव्या वर्षाची सोनेरी पहाट मनामनांत आशेचे ढग दाट घेवूनी अंगावर चैतन्याची लाट चालावी आयुष्याची सुंदर वाट" आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!! -निमिष न. सोनार, पुणे

अपेक्षा २०११ कडून

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२०११ कडून माफक अपेक्षा
  • कांदे तोळ्यावर विकत घेण्याची वेळ येऊ नये. अगदी तशीच वेळ आल्यास कांद्यांचा तोळ्याचा भाव सोन्याच्या भावापेक्षा कमी असावा.
  • पेट्रोल रु. ११२/लीटर होऊ नये. तशीच वेळ आल्यास 'वर्क फ्रॉम होम' चा फतवा सरकारने जारी करावा. सगळ्यांनी घरूनच काम करावे, अगदी चितळे बंधूंनी सुद्धा!
  • डाळी, धान्ये विकत घेण्यासाठी बँकेचे कर्ज घेण्याची वेळ येऊ नये.
  • सुरेश कलमाडींचे राजकीय पुनर्वसन होऊ नये. त्यांचे राजकीय पुनर्वसन करायचेच असल्यास त्यांना 'एनएसयुआय' च्या श्रमदान समितीमध्ये सदस्य म्हणून घ्यावे.

हैप्पी ३१ स्ट

विनायक बेलापुरे ·
दारु की खुश्बू गुटके की मिठास गांजे की महेक और चरस का स्वाद भांग के पकोडे और विल्स का प्यार मुबारक हो आपको बेवडों का त्योहार हैप्पी ३१ स्ट (एका समस वरुन साभार)