शाही अंडा बिर्याणीचा यथेच्छ आस्वाद घेता घेता दिनेश आणि केसुने टूटीफ्रूटी केक हवा आहे असे जाहीर केले, त्या दोघांना कामाला लावून हा केक बनवला.
साहित्य- २५० ग्राम बटर/लोणी/मार्गारीन, २०० ग्राम साखर, ५ अंडी, २५० ग्राम मैदा,२ चहाचे चमचे बेकिंग पावडर, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी टूटीफ्रूटीचे तुकडे, पाव कप दूध, १ चिमूट मीठ
कृती- बटर भरपूर फेटून घेणे, साखर घालून फेटणे, अंडी घालून फेटणे, वॅनिला अर्क, लिंबाचा रस घालून फेटणे.
मैदा+ बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करुन वरील मिश्रणात घालणे व फेटणे.