एकटेपण...!
लेखनविषय:
लेखनप्रकार
माणसाला सगळ्यात जास्त भिती कशाची वाटत असेल …..मरणाची ?? अं हं……चुकलात…. !! अहो… एकटेपणाची. बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो पण एकटं राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो. किंबहुना ह्या गोष्टीचा तो विचार करणंही टाळतो.
कधी कधी गोंधळ, गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूर पर्यंत कोणीच दिसायला नको, जवळ असायला नको. एकांत हवा. पण एकांत आणि एकटेपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत सुद्धा काही वेळापुरताच हवासा वाटतो. नंतर त्या एकांताचं रुपांतर एकटेपणात होतं आणि मग तो नकोसा होतो. लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं शिवाय आई, बाबा सुद्धा हवे असतात.
मिसळपाव
चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एका घरात पार्टी चालू असते. घरची गृहिणी झटत असते. स्वयंपाकघरातून तऱ्हतऱ्हेचे पदार्थ आणून घरातल्यांची आणि पाहुण्यांची सरबराई करत असते. हळूहळू लक्षात येतं की खुद्द तिचाच वाढदिवस साजरा करायला लोक जमले आहेत. पण तिला मात्र आराम नाही.
हि पाककृती म्हणजे एक 'classified' सिक्रेट आहे. पण आत्ता पर्यंत हे कटलेट एवढ्या लोकांनी आवडीने खाल्ले आहे कि आता ह्याचं गुपित सांगायला काहीच हरकत नाहीये. हि पाककृती म्हणजे एक saviour आहे. उ.दा. गेला पूर्ण आठवडा आमच्या कडे पाहुणे आणि रिलेटेड फिस्ट चालू आहे. रोज केलेल्या पदार्थातून काही न काही थोड्या फार प्रमाणात उरतं. आणि मग अचानक फ्रीज मधली सगळी जागा गायब होते. अश्या वेळी, हे गोलमाल कटलेट एक उत्तम ब्रेकफास्ट किंवा उपाहार ऑप्शन ठरतं.