Skip to main content

अंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत

Published on शुक्रवार, 11/02/2011
आता केवळ 'अंतर्वस्त्रे' (अंडरविअर) हा शब्द या धाग्यात आहे म्हणून नाक मुरडू नका. 'अंतर्वस्त्रे' म्हणजे जे बाहेरील कपड्यांच्या आतच घालतो तशीच वस्त्र हे लक्षात घ्या अन पुढे वाचा. आता ही अंतर्वस्त्रे' किंवा अंडरविअर (उदा. बनियन) आपण शर्ट किंवा पँटच्या आत आपण घालतो. त्या अंतर्वस्त्रांवर (बनियनवर) एक लेबल त्या त्या कंपनीने लावलेले असते. ती त्यांची जाहीरात असते अन त्यावर त्या बनियन च्या मापाचा एक नंबर लिहीलेला असतो. तो साधारणता: इंचात असतो. म्हणजे ज्याची छाती २८ इंचाची असते त्याला २८ नंबरचा बनियन फिट होतो. (फिट्ट नाही तर फिट म्हणजे योग्य मापात बसतो). तर आपले लेबल.

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ३

लेखक अवलिया
Published on शुक्रवार, 11/02/2011
मागील भाग - http://misalpav.com/node/16707 *** अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय यात साम्य काय आहे आणि यावर काहीतरी लिहा असे जर सांगितले तर आपल्यापैकी किती जणांचे डोके चालेल हे मला माहित नाही. किमान मी तरी असे काही लिहू शकणार नाही हे नक्की. लिहिल्यानंतर लोकांना ते आवडेलच याची खात्री नाही. पण काही जण मात्र आरामात अशा वरवर एकमेकांशी संबंध नसलेल्या शब्दांच्या शीर्षकाचा लेख लिहितात आणि तो वाचला की आपल्याला वाटते "अरे हो यार ! आपण पण असे लिहू शकलो असतो !!

जनगणना २०११ , टप्पा दुसरा , सहकार्य करा !

Published on शुक्रवार, 11/02/2011
लोकहो, ही माझी पहिलीच वेळ आहे मिपा वर लिखाण टाकण्याची.मी नवीन सदस्य आहे. पण वाचक फार पूर्वी पासून.. माझी आई सध्या जनगणना ह्या भयंकर कामात आहे. तिच्या सोबत अख्खा मे महिना रणरणत्या उन्हात फिरून काम केलेले असल्याने ह्या कामात किती अडथळे येतात हे मी पहिले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये परत एकदा एक फेरी होत आहे ज्यात अजून २९ प्रश्न विचारले जातील. जनजागृती करूनच ह्या समस्या कमी करता येतील असे माझे मत आहे. यंदा जो फोर्म आला आहे त्यातील २९ प्रश्न मी इथे देत आहे . जेणेकरून हि माहिती लोक गोळा करून घरी राहणाऱ्या सदस्याजवळ ठेवतील. १. व्यक्तीचे नाव २. कुटुंब प्रमुखाशी नाते ३.

स्त्री बद्दल ची एक बाजु

लेखक गणेशा
Published on शुक्रवार, 11/02/2011
चर्चा सत्रावर माझा हा पहिलाच धागा.. शक्यतो माझी मते जास्त ठाम असतात . पण खाली काही मुद्दे आहेत (सत्य आहेत हे सगळे मुद्दे ) त्यांची उत्तरे अजुनही मला मिळत नाहित.. तुम्ही मला मदत केली तर आवडेल स्त्री ही माता भगिनी असते म्हणुन सर्रास त्यांच्यावर प्रशन उपस्थीत केले असेल तर क्षमस्व, परंतु असे नाहि घडले पाहिएज हे मनापासुन वाटते.. अजुनही मुद्दे आहेत पण नंतर लिहितो ..वेळ कमी आहे. --- स्त्री -पुरुष समानता विषयी खुप पोटतिडकीने बोलले जाते, वयक्तीक रीत्या माझ्या सर्व मित्र -मैत्रीणी ह्या रोखठोक आणि स्वतंत्र विचार .. घरच्यांची अवास्तव बंधने नसलेल्या आणि काही महिला मुक्ती मोर्च्यासम असलेल्या आहेत.

वंडर बॉय

Published on शुक्रवार, 11/02/2011
मी अधित..... ओळखलत का? सहा वर्षापुर्वी शाळेत तुमची भेट झाली होती. 'वंडर बॉय' चे बक्षिस तुमच्या हस्ते मिळाले होते. आज मी इंजिनियरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहे. दोन वर्षापासुन मी एमबीए ची तयारी करतोय. अहमदाबाद मधे अ‍ॅडमिशन नक्की मिळेल. तुमचे ते 'कंपार्ट्मेंट' चे वाक्य आजही आठवते. मुख्याध्यपकांनी नंबर दिला. तुमचा एक सल्ला हवा आहे. दोन वर्ष नोकरी करावी का सरळ एमबी ए ला अ‍ॅडमिशन घ्यावी. वर्क एक्सपिरियन्स चा फायदा नक्कीच आहे. पण... आई बाबा दोघेही नोकरी म्हणताहेत. ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व काही दिले, आता स्वःत चे स्वतः बघ असे म्हणताहेत. एमबीए ला लागणारे पैसे मी देणार नाही असे बाबा म्हणताहेत. दहावीत पोस

प्रतिक्रीया.. की अवांतर??

Published on शुक्रवार, 11/02/2011
आमची प्रेरणा. माझा हा मिपा वरील नेहमीचा प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकवण्याची आवश्यकता नाही.. तुम्हा टूकार लोकांकडून मार्गदर्शन मिळावे अशी तर अज्जीबात ईच्छा नाही.

कामापुरता नर

Published on शुक्रवार, 11/02/2011
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय? कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा.

आठवण...( की विसर??)

Published on शुक्रवार, 11/02/2011
माझा हा मिपा वरील पहिलाच प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकण्यास उत्सुक आहे.. तुम्हा दिगज्ज लोकांकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती निशब्द रात्री जेव्हा जागून निघतात, आणि आपण पाहिलेलीच स्वप्न जेव्हा आजूबाजूला पिंगा घालू लागतात, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... जुनेच message जेव्हा नव्याने वाचते, जुनेच क्षण आठवून जेव्हा एकटीच हरवते, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... डोळ्यांच्या कडा जेव्हा ओल्याच राहतात, अर्धवट स्वप्नातही तुलाच पहिल्याचा दावा करतात, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... आता मीही शिकणार आहे माझ्या मनाला दगड बनवायचं, तुझ्या सारखाच न बोलता