Skip to main content

आठवण...( की विसर??)

लेखक हरिप्रिया_ यांनी शुक्रवार, 11/02/2011 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा मिपा वरील पहिलाच प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकण्यास उत्सुक आहे.. तुम्हा दिगज्ज लोकांकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती निशब्द रात्री जेव्हा जागून निघतात, आणि आपण पाहिलेलीच स्वप्न जेव्हा आजूबाजूला पिंगा घालू लागतात, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... जुनेच message जेव्हा नव्याने वाचते, जुनेच क्षण आठवून जेव्हा एकटीच हरवते, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... डोळ्यांच्या कडा जेव्हा ओल्याच राहतात, अर्धवट स्वप्नातही तुलाच पहिल्याचा दावा करतात, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... आता मीही शिकणार आहे माझ्या मनाला दगड बनवायचं, तुझ्या सारखाच न बोलता सार विसरून जायचं, पण कस सांगू तुला , तेव्हा पण तुझीच आठवण अनावर असते.. एकच सांग नि एकदाच सांग, तुला आशी अनावर आठवण कधी येतच नाही का रे??
लेखनविषय:

वाचने 1722
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आपल्यात उत्तम कविता करण्याची ताकद दिसली. - (दिग्गज ) प्रियागोल्ड इंजमाम-उल- हक से मांगो !

कविता छान जमली आहे, त्यातील भाव खोल आहेत.. असेच लिहित रहा .. अवांतर : दिग्गज वगैरे कोणी नसते, अनुभवाने प्रत्येक जण स्वताच्या आयुष्यात स्वतापुरता दिग्गज होत असतो...

गणेशा यांच्याशी पूर्णपणे सहमत .तुमच्या अजुन कविता वाचण्यासाठी उत्सुक !