कवितेपासून कवितेपर्यंत....प्रवाह कवितेचा.
मिपावर मराठी दिनानिमित्त विविध उत्तम लेखन वाचायला मिळत आहेत तेव्हा आमचेही दोन शब्द.
मराठी कविता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आवडणा-या कवितांची आठवण होते. आपापल्या आवडत्या कवींच्या कविता डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात. काही कवितेच्या ओळी आठवतात. काही कवितेच्या शब्द, प्रतिमा आठवतात. काही कवितेचे आशय आठवतात तर कधी नुसतीच कवींची आठवण होते. कवितेचा प्रवास सुरु झाला तो ''माझा म-हाटिची बोल कौतुके । परि अमृतातेंही पैजा जिंके ॥”म्हणणा-या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरापासून. संत ज्ञानेश्वरापासून सुरु झालेला हा कवितेचा प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे.
विशेष
मिसळपाव