साहित्य चिकन मसाला:
५०० ग्राम साफ करून ठेवलेले चिकनचे तुकडे
२ मोठे कांदे चिरलेले
२ टोमॅटो चिरलेले
२ टेस्पून आलं+लसूण+कोथिंबीर वाटून
२ चमचे खसखस भिजवून वाटणे
३ मोठे चमचे दही
१ चमचा हळद
२ चमचे लाल तिखट
१ १/२ चमचे गरम मसाला
मीठ चवीनुसार
पाव वाटी तेल+ २ चमचे तुप
२-३ तमालपत्र
२-३ दालचिनी
१ छोटा चमचा शहाजिरे
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
पाकृ:
साफ करून ठेवलेले चिकनचे तुकड्याना दही , आलं+लसूण+कोथिंबीर च्या वाटणमधील थोडे वाटण, थोडी हळद लावून एक तास झाकून ठेवणे.
प्रेशर कुकरमध्ये तेल+तुप गरम करून त्यात तमालपत्र , दालचिनी व शहाजिरे घालणे.
चिरलेले कांदे घालून ते लालसर परतणे.
त्यात आलं+लसूण+कोथिंबीर वाटण, चिरलेले टोमॅटो घालून तेल सूटेपर्यत परतणे.
वाटलेली खसखस आणी वरील सर्व मसाले घालून खमंग परतणे.
दही लावून ठेवलेले चिकन घालून गुलाबी होईपर्यत परतावे.
दीड ते दोन वाट्या पाणी घालावे
( रस्सा अंगासरशी असावा)
पुर्ण प्रेशर आले की गॅस बारीक करून ३-४ मिनिटे शिजवावे.
चिरलेली कोथिंबीर घालून सजवावे.
साहित्य बटर रोटी:
३ कप चाळून घेतलेला मैदा
३/४ कप कोमट पाणी
३/४ टेस्पून ड्राईड यीस्ट
२ टीस्पून साखर
मीठ चवीनुसार
१ टेस्पून ऑलिव्ह ऑइल
पाकृ:
कोमट पाण्यात साखर्+यीस्ट घालून विरघळून घेणे.
मैद्यात मीठ व यीस्ट चे मिश्रण घालून खूप मळावे.
ऑलिव्ह ऑइलचा हात लावून मऊसर कणीक मळणे.
तेल लावलेल्या भांड्यात भिजवलेली कणीक ठेवून ,वरून ओल्या फडक्याने झाकून उबेच्या ठिकाणी एक तास ठेवणे.
एका तासाने कणीक फुगून दुप्पट झालेले असेल.
मुक्के मारून कणीक खुप मळून घेणे.
सारखे गोळे करून रोटी लाटणे.
नोन-स्टीक तव्यावर दोन्ही बाजूने तुप लावून शेकून घेणे.
खाली उतरवून पण तुप लावणे.
गरम-गरम चिकन मसालाबरोबर खायला देणे :)
प्रतिक्रिया
खुप छान. तोंडाला पाणी सुटले.
लय बेस्ट आहे रेशिपि पन यीस्ट
In reply to खुप छान. तोंडाला पाणी सुटले. by Mrunalini
गावठी तेज्यायला!! इंटरनेट
In reply to लय बेस्ट आहे रेशिपि पन यीस्ट by पियुशा
चालेल गावठी तर गावठी;) शेवटी
In reply to गावठी तेज्यायला!! इंटरनेट by शिल्पा ब
म्हणुनच म्हणते सगळीकडं आपली
In reply to चालेल गावठी तर गावठी;) शेवटी by पियुशा
बेकरीत विचारलात कि मिळेल
In reply to लय बेस्ट आहे रेशिपि पन यीस्ट by पियुशा
तोंडाला पाणी सुटले.
मस्त ग चिकन तर खात नाही रोटी
खा बटर रोट्या अन वाढवा वजनं
In reply to मस्त ग चिकन तर खात नाही रोटी by मुलूखावेगळी
मस्तच एकदम भन्नाट दिसतय
मस्त !
झक्कासच्,उद्याचा मेनू
मस्त! रोटीची पाकृ आवडली.
मस्त पाकृ आणि भन्नाट
मस्त मस्त.
"३ कप चाळून घेतलेला मैदा"
आजच हा मेनु केला आणि रविवार
सुन्दर रेसिपि......
रोटीबद्दल....
आभार
बटर रोटी मस्तच दिसते आहे.