शोधायला गेले एक, अन......
अनेक मानवी आजारांचा मुकाबला आपण औषधांच्या मदतीने करतो. आजच्या घडीला आधुनिक वैद्यकात हजारो औषधे वापरली जातात. एखाद्या आजारावर गुणकारी औषध शोधणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी संशोधकांना जिवाचे रान करावे लागते; प्रसंगी तहानभूक विसरून अशा कामात झोकून द्यावे लागते. मात्र काही मोजक्या औषधांचे शोध ह्या अनुभवापासून काहीसे वेगळे पडतात. त्यापैकी काहींच्या बाबतीत त्यांचे शोध ध्यानीमनी नसताना किंवा अगदी योगायोगाने लागून गेलेत.
२ प्रेमी प्रेमाचे..!
२ प्रेमी प्रेमाचे
इसवी सन २०१५
यश = स्वप्नील जोशी
प्रिया = गिरीजा ओक
यशचा बाप =अरुण बक्षी
पहिल्या सीनमध्ये प्रिया तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते, तेव्हा तो दुसऱ्याच एका मुलीशी प्रेमालाप करत असतो.
प्रिया हळवी आहे, मृदू आहे. हे दृश्य पाहून तिचा दिल दुखतो. ती तडकाफडकी बॅग भरून ते शहर सोडते आणि खुशी नावाच्या मैत्रीणीकडे रहायला जाते.
कारण शेवटी असं आहे की तुम्ही तुमच्या इंपल्सेसवर जगता ना! तुमच्या मनात आलं की बॅगा भरता आणि शहरं सोडता..! जॉबचा किंवा पोटापाण्याचा वगैरे प्रश्नच कुठे उपस्थित होतो !
का संपली पुण्याई.....
कोकिळा गप्प झाली का
माहीत नाही का रुसून गेली
कोण गाईल आता अंगाई
का संपली पुण्याई
कोण रिझवेल आता
कोण निजवेल आता
ऐकता भजन, भूपाळी
दिस उगवेल का नाही
गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.
काव्यरस
सिर्फ त्रिवेदी बचेगा।
पहिली,दुसरीला बसवलं
होतं फाट्यावर
तीसरीने केली कुरघोडी
आणून बसवलं खाटेवर
कधी आली,कशी आली
माहीत नाही कुठं गाठ पडली
अतीरेक्या सारखी घुसली
पहिल्या फळीची दाणादाण उडली
लढवत होती पंजा
आजमावत होती जोर
पण मजबूत ज्याचा माजां
तोच कापणार होता दोर
लढवत होती पेच
टाकत होती डाव
घालत होती सह्याद्रीच्या उरावर
टिकावा चा घाव
तीन दिवस तीन रात्री
घमासान लढाई केली
खूप काढला घाम
आणी खूप दमणूक झाली
शिजत नाही डाळ बघून
मागे परत फिरली
टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे
ती बिचारी हारली
ती बिचारी हारली.......
सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे.
(शोध)
प्रेर्ना :)
बाटलीतुन वाहणारे
ओतताना लहरणारे
सोड्यातून उमलणारे
बर्फाशी झुंजणारे
चषकाच्या पृष्ठभागी
बुडबुडे साकारणारे
ढोसतो मी अल्प काही
जाणिवेला छेडणारे
नेणिवा थिजवणारे
मेंदूस व्यापणारे
तनूस डुलवणारे
ओठांच्या फटीतून
अशाश्वत भासणारे
बोलतो मी मूढ काही
काव्यरस
मुराकामी
हारुकी मुराकामी हा सांप्रतकाळातला एक जिनीयस लेखक. त्याचा वाचकवर्ग जगभर पसरलेला. म्हणजे उदाहरणार्थ मुराकामीच्या एखाद्या कादंबरीत टोक्योमधल्या कुठल्यातरी खरोखरच्या ब्रिजचं, लायब्ररीचं किंवा अशाच कुठल्याशा स्थळाचं वर्णन असतं. आणि ते एवढं प्रत्ययकारी असतं की त्याचे वाचक नेटवर त्या स्थळासंबंधी व्हिडिओ किंवा फोटोज् शोधत राहतात..!
त्याच्या कादंबऱ्यातली माणसं काही हिरो-बिरो नसतात. पण अशा सिंपलशॉट माणसांनाही मुराकामी फारच ताकदीने आपल्यापुढे पेश करतो.. कल्पनेच्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर तो पात्रांना मनसोक्त खेळवतो. पात्रांसोबतच आपल्यालाही खेळवतो, जोखतो..!
परदेशवारी १
अमरनाथ ते रामेश्वर , उनाकोटी (आगरतल्ला, त्रिपुरा) ते गंगानगर -बहावलपूर पर्यंत उभा आडवा संपन्न देश बघितला.कधी वाटले नव्हते की साता समुद्रापार परदेशवारी पण नशिबी आहे.आदर्श आईबापां प्रमाणेच आमचा आग्रह की मुलांनी डाँक्टर, इंजिनियर व्हावे पण धाकटी बंडखोर तीने शुद्ध शास्त्र विषय(Pure Science) घेऊन सरळ संशोधना करता विदेशी प्रस्थान केले. आम्हाला परदेश वारीची संधी मिळाली.
करोना जगभर धुमाकूळ घालत होता. सर्व जगाला त्याने गुडघे टेकायला लावले होते.
रानवट
वार्याची लहर
फडफडणारा पदर
उधळले रंग विभोर
चालत होते रानवट||
उषेचे स्मित ओठांवर
दवांची माळली धार
अणू रेणूचे नुपूर
चालत होते रानवट||
कोमल स्पर्श अवनी
विखुरलेल्या दिशा वेचुनी
लाटांचे नीरज तोडूनी
चालत होते रानवट||
डोहाच्या तळाशी आठवणी
सुरूंग त्यावर पेरुनी
राखेचा घट उचलूनी
चालत होते रानवट||
अज्ञानाचे सुख त्यागुनी
ज्ञानाची ठेच लागली
ठसे उमटली आरसपानी
चालले ....रानवट||
-भक्ती
आणखी एक किस्सा
आणखी एक किस्सा
काल माझ्याकडे एक सद्गृहस्थ आले होते. वय वर्षे ४३ हे एका प्रथितयश आय टी कंपनीत सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काम करत असतात. त्यांना आम्लपित्त होत होतं त्यासाठी.
व्यायाम शून्य, एका जागी बसून सकाळी ९ ते रात्री ९ काम, वेळी अवेळी जेवण, मसालेदार तेलकट जेवण रोजचंच.
(आय टी मध्ये भरपूर पगार मिळणाऱ्या टिपिकल माणसाची कथा)
सोनोग्राफी केली. बाहेर खाल्ल्यामुळे पोट बिघडून आतड्याला सूज आलेली होती.
आणि यकृतात चरबी ठासुन भरलेली दिसत होती.
मी त्यांना विचारलं, वजन किती आहे? त्यावर ते म्हणाले ९८ किलो.
त्यांची उंची ५ फूट ७ इंच आहे. त्यांना विचारलं घरी कुणाला मधुमेह आहे का?
मिसळपाव