Skip to main content

पुन्हा एकदा पाऊस ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 29/08/2011 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... वाटले मारावी उडी त्या चिखलात अन बरबटून घ्यावे सगळे पाय अन हात ... मन तर कधीच बरबटले आहे .... कुठेतरी खोल आत ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिरकावून द्यावी ती हातातली छत्री भरून घ्यावा हा निसर्ग आपल्या गात्री ... नंतर पुन्हा आहेतच न ओल्या न कोरड्या अश्या कुबट रात्री ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिजतानही आतून मी कितीतरी वेळ जळत होतो डोळ्यातले पाणी त्या पावसात मिसळत होतो आज पुन्हा एकदा पाऊस मला अन मी पावसाला छळत होतो ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... - विश्वेश
काव्यरस

उपोशण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 28/08/2011 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिवुन उपोशण करुन जनतेस हवे ते मिळवुन दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म रुणी आहे यात शंकाच नाहि.. मराठे लढाया जिंकतात पण तहात हरतात असा आपला ईतिहास आहे.. पण ह्या राळेगणच्या पठ्ठ्याने लढाई तर जिंकलीच पण तह हि मनासाराखा घडवुन आणला. पण १२ दिवस माणुस नुसत्या पाण्यावर राहु शकतो का?

अतिशय गाजलेला भंपक लेख

लेखक सोत्रि यांनी रविवार, 28/08/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच (कोणॆ एके काळी) बहुचर्चित झालेला मी मतदान का करावे? हा लेख वाचला. चेतन सुभाष गुगळे (जगभर प्रसिद्ध असलेले चिंतनशील लेखक) यांच्या लेखाचे जगभरात(?) प्रचंड कौतुक झालेलं असून त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली व जगभरांतुन प्रतिसादांचा पाउस पडला (अशी माहिती सदर लेखाच्या शेवटी होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की असे लेख लिहीले जातात. याचं देखील आश्चर्य नाही की असे लेख प्रसिद्धही केले जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक असे लेख मुल्यवान असा वेळ खर्चून का वाचतात?

मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 28/08/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली. आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर आहे. घरात सर्व सोईसुविधा आहेत. अगदी वॉशींग मशीन पासून ते डिशवॉशरपासून ते अगदी ईलेक्ट्रॉनीक टूथब्रशपर्यंत सार्‍या सुविधा घरात आहेत. लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत.
काव्यरस

मी मतदान का करावे?

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 28/08/2011 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : सदर लेख मी दोन वर्षांपूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री लिहून माझ्या सर्व परिचितांना इमेल ने पाठविला. तेव्हा मी मिसळपावचा सदस्य असूनही काही कारणास्तव या संकेतस्थळापासून दूरच होतो, त्यामुळे तेव्हा हा लेख इथे प्रकाशित केला नव्हता. आता बराच काळ लोटला असला तरीही हा विषय आउटडेटेड झालाय असे मला वाटत नाही. या विषयावर इथल्या मान्यवर सदस्यांचे अभिप्राय जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल म्हणून हा लेख आता इथे प्रकाशित करीत आहे. दुसरे असे की, तेव्हा मी हा लेख किरण फॉन्ट मध्ये टंकलिखीत करून त्याची पीडी फाईल बनविली होती.

मेणबत्त्यां​चा उजेड

लेखक चारुवाक यांनी रविवार, 28/08/2011 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
लता आणि आशाचे गाणे, गुलझारच्या कविता, कलमाडींचे निर्दोष असणे , मेधा पाटकरांचे एखाद्या विषयावरील वक्तव्य अश्या विषयांवर रूढ मतांपेक्षा वेगळे मत व्यक्त करताना मी नेहेमी दहा वेळा विचार करतो. आजकाल या यादीमध्ये अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाची भर पडली आहे. आजकाल IAC आणि मेणबत्ती मोर्चे ही 'in' आहे ...म्हणजे सध्याचा ट्रेंड आहे. कार्यालयात मला एकाने विचारले की तुमच्या इथे candle march झालं का? मी हो म्हणालो. आजकाल रोज कुणी ना कुणी मार्च काढते आहे. मग तू गेला होतास का? माझ्या 'नाही' या उत्तरावर एक उपेक्षित कटाक्ष टाकून तो निघून गेला.

ती आणि ते

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 28/08/2011 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या घराघरातून ती नांदते आणि प्रत्येक माणसात उगम पावून खळाळत्या नदीसारखी गल्लीबोळातून वाहते बैलाचा बळी देऊन मांस खाणारा कंटाळून सोवळ्यात जातो तेव्हा ती थोडी बदलते कमरेला झाडू लावणारा चिडून पुस्तक हाती धरतो तेव्हा ती थोडी वळते उमटत असतात लाटा तिच्यात तिच्यावर विहार करणार्‍यांच्या क्रीडेने घुसळली जाते तिच्या तळाशी गुदमरून बुडणार्‍यांच्या आकांताने जिवंत असतो गाव रसरशीतपणे तिच्यातल्या लाटा-भोवर्‍यांमुळे नि:स्तब्ध गावतटावर फक्त ते तिच्या रक्षणासाठी बसलेल्यांचे सांगाडे....

अ‍ॅड्. दत्ता पाटील यांचं निधन.

लेखक नरेश_ यांनी शनिवार, 27/08/2011 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते, प्रख्यात कायदेपंडित, शिक्षणमहर्षी अ‍ॅडव्होकेट दतात्रय ना.पाटील ( दादा ) यांचे वयाच्या ८६व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...!

...

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 27/08/2011 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
.