>> तुरुंगातील जगण्यापेक्षा समाजाने बहिष्कृत केलेले जगणे अधिक कठीण असावे का?
शेवटी काय आपल्याच कर्माची शिक्षा.. शेवटी ती भोगलीच पाहिजे.
>>> बेल वाजवायला फार मोठं धाडस लागत नाही पण त्यातून एखादा गुन्हा थांबण्याची शक्यता फार मोठी असते. 'हे असे तर नेहमीच वर्तमानपत्रांतून पाहायला मिळते, आमच्या पाहण्यातील कुटुंबातही असे घडले आहे' असे म्हणणारे खूप दिसतात पण "मी बेल वाजवली आहे" असे म्हणणारे आजही थोडकेच असतात.
थोडकेच काय तर दुर्मिळ म्हणा. आजपण जर मी अशा गोष्टीला विरोध करायला गेलो, तर पुन्हा घरचे आणि इतरेजन बोलायला मोकळेच की तुला त्या गोष्टीत नाक खुपसायची गरज काय आहे. पण त्याचवेळेस कोणी हे बघत नाही की त्याजागी आपली कोणी सख्खी बहीण जर असती तर..
- पिंगू
काही प्रश्न पडतात.
त्या नाथकाकाने स्वतःच्या उपभोगासाठी हे केलं पण घरातल्या बाकीच्यांनी त्याला का मान्यता दिली? वंशाला दिवा हवा म्हणून? समाजरीतीप्रमाणे सुखी कुटुंबाचं चित्र बाहेरच्यांसमोर उभं करून त्या नवर्याचे लैंगिक प्रश्न झाकण्यासाठी? त्यांनी अगदी खुशीने हे केलं असेल? अशी काय अगतिकता होती की त्यांनी या प्रकाराला मान्यता दिली? ती अगतिक अवस्था व्हायला कारण कोण? केवळ नाथाचं भय? बेल वाजवण्याबरोबरच असं काही लपवण्यासाठी काही करण्याची वेळ लोकांवर येऊ नये म्हणून काय करता येईल?
अरुंधतीचा जो "वापर" केला गेला, आणि तिला जी जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली गेली ती अत्यंत नीच दर्जाची आहेच. अशा प्रसंगातून सावरणे तेदेखील माहेरच्या आधाराशिवाय हे कोणाही व्यक्तीला जडच जाईल. तेव्हा ती मनाने कोलमडली हे स्वाभाविकच वाटते.
________________________________________
>> तुरुंगातील जगण्यापेक्षा समाजाने बहिष्कृत केलेले जगणे अधिक कठीण असावे का? >>
काही जण म्हणतीलही की इतकी शिक्षा पुरेशी आहे पण मला एवढी शिक्षा पुरेशी वाटत नाही. आणि मग आपण काहीही करु शकत नसल्याने आपण म्हणतो - "कुठे फेडतील ही पापं ही लोकं?" . शेवटी अशा हतबलतेतूनच स्वर्ग-नरक कल्पनांचा जन्म होतो आणि मनाची समजूत घालत म्हणावेसे वाटते "असले" लोक नरकात खितपत पडतील.
__________________________
>> बेल वाजवायला फार मोठं धाडस लागत नाही पण त्यातून एखादा गुन्हा थांबण्याची शक्यता फार मोठी असते. >>
खूप चांगला संदेश दिला आहे.
प्रियाली च्या म्हणण्याशी सहमत.
बेल वाजवायला फार मोठं धाडस लागत नाही हे खरं पण बहुतेक वेळा शोषितां चा येणारा प्रतिसाद/प्रतिक्रिया मदतीचा हात नाकारते ....थांबवते. हा अनुभव अगदी १००% लोकांकडे दिसत नाही पण अगदीच दुर्मिळही नाही.
पुढे जाउन मदत करायची म्हंटली तरी कायद्याचं अपुरं ज्ञान्, पोलिसांची भीती, समाजाची भीती
ह्यामुळे अडथळे आणि निराशा ह्या चक्रा मध्येच अडकलेले अनेक पाहिले आहेत.
//घरगुती गुन्ह्यांच्या प्रकरणात शोषित ऐनवेळेस माघार घेतो असं इन्स्पेक्टर सावंत म्हणाले होते. अशावेळी शोषितावर अत्यंत दबाव टाकलेला असतो, त्यामुळे डोमेस्टीक वायोलेंसचे गुन्हे शाबित होत नाहीत. अरुंधतीला लोक पाठींबा द्यायला तयार होते पण तिच्यावरचा नेमका दबाव कसा होता ते माहित नाही. इथे तिच्या आईवडिलांनी थोडीशी जरी साथ दिली असती तर ती सावरली असती असं वाटत//..
अगदी खरं!
माझ्या नात्यामधलं एक उदाहरण... मुलगा पोलिस...बहुतेक हवालदार पासुन सुरुवात करुन सबईंस्पेक्टर, ईंस्पेक्टर ह्या पदांपर्यंत "पोहोचलेला" ,घरी कसलीच कमतरता नव्हती.धन,धान्यानी भरलेलं घर. पण बायको गरिब गाई सारखी राहाणारी, मुलं झाली..एक मुलगा आणि एक मुलगी..पुढे घटस्फोट झाला. का तर म्हणे पोलिसाचं आधिपासुनच बाहेरख्याली संबंध होते....मुलाची कस्टडी वडिलांकडे आणि मुलगी आईकडे......त्यांच्या घरच्यांनी कसलाच विरोध केला नाही ही गोष्ट आमच्यासाठी अनाकलनीय होती. माझ्या आईने मुलीला मदत हवी का विचारलेलं..पण पुढे मुलीकडुन कसलाचं रिस्पोंस नाही. मदतकार्य ठप्प..नशिबाने तिच्या माहेरच्यांनी योग्य वेळी योग्य साथ दिली. आता ती मुलगी स्वःतापुरता कमावते आणि छोटीला वाढवते.
---मयुरा.
प्रत्येकाच्या पाहण्यात एकतरी असे उदाहरण आहे हेच वाईट आहे.
यातल्या कितीजणांनी बेल वाजवली आहे? (मी नाही वाजवली! लहान होते बरीच्....पण काय चाललय समजत होतं)
आईवडीलांकडे परत जाण्याचा मार्ग खुला हवा.
तो तसा बर्याच आईवडीलांना नको असण्याची शक्यता आहे (समाज काय म्हणेल?).
तरीही खमकेपणानं आपला हक्क घेण्याची समज स्वत:लाच हवी.
कथा प्रेडीक्टेबल होती पण तशीच ती असायला हवी होती.
नंतर अन्नान्न दशा झालेली वाईटच पण दुसर्या बुवाच्या तावडीतून सुटली.
तिथे बळजबरी, मार, पुन्हा हाल होतेच. त्यामानानं बरं!
ही हॅलोविनची कथा म्हणूनही शोभेल.:(
जिथे मुली झालेल्याच नको असतात तिथे सासरी गेलेल्या मुलीला घरी आणुन परत सन्मानाने जगायला मदत करणे अवघडच आहे.
दोन दुर्दैवी जीव. एक भरपूर पगार कमावणारी तर दुसरी लहान शहरातील किंवा मोठे खेडे म्हणा हवं तर.
शहरातील आई वडिलांकडेच राहत होती पण ते गेल्यावर भावाकडे आली. दुसरी जागा किंवा आधार नाही. भाऊ अन वाहिनी मारहाण करायचे. तिचे दागिने अगदी मंगळसूत्रसुद्धा काढून घेतले. आता ते तर तिचेच होते. यांना काय हक्क होता. पण नाही. एकदा रात्री आमचे दार वाजवत होती अन मी उघडल्यावर म्हणाली मला दादाने मारलं अन मंगळसूत्र काढून घेतलं. मी नेहमीप्रमाणे मध्ये पडणार होते पण मला काही कळेना कि हि बाई अगदी काहीच प्रतिकार कसा करत नाही. कमावतेय तर एकटी किंवा रुममेट वगैरे घेऊन राहायचे. मुंबईत आहोत आपण. समाज असाही जीवावर उठलेलाच आहे. डोळ्याभोवती काळी वर्तुळे, चेहरा कायम सुकलेला. मला तर बघवायचेच नाही तिच्याकडे. आणि मी शाळकरी पोर तिला नेमकी काय मदत करणार होते? :(
दुसरी छोट्या शहरातली. आयुष्यभर आई बाबाच्या घरात " grounded " अशी राहिलेली. आम्ही त्यांच्या घरी गेलो तरी कधीही तिच्या रूममधून बाहेर आली नाही किंवा मिसळली नाही. कदाचित लोकांनी किंव घरच्यांनी बोलून तिला अगदी नक्को जीव केला असेल. तिचेही मानसिक संतुलन बिघडले आणि तिला येरवड्याला ठेवली होती. तिची वाहिनी अशीच कजाग. काय बोलणार. तिला घरच्यांनी थोडेतरी समजून घेऊन स्वतःच्या पायावर उभे करायला हवे होते हे मला मी ७-८ वर्ष्यांची असतानाही समजत होते. वडील तर प्रचंड मोठ्या ओळखी असलेले अन मुंबईत सहजच तिला नोकरी मिळवून देऊन मदत करू शकले असते असे. पण...
हल्लीची गोष्ट. मित्राच्या घरी नाईटआऊटला जमलो होतो. समोरच्या विंग मधे तळमजल्यावरच्या घरातून एका स्त्रीचे किंचाळण्याचे आवाज.... आम्ही मित्र हबकलो.. तिथे रहाणारा मित्र बोलला
"अरे हे नेहमीच आहे.."...
"सुनेचा छळ का?"
"नाही मुलीचा"
"!!!!!! मुलीचा!?!?!?"
"होय, लग्न झाल्यावर नवरा यथेच्छ पिणारा निघाला.. अगदी दारूचं पिंप.. मग मारझोड,.. नशिबाने नोकरी होती.. तिथे कोणाच्या तरी प्रेमात पडली.. त्याच्यापासून मुल होणार आहे.. सासरच्यांनी हाकलली.. आता माहेरी असते.. माहेरचे थारा देऊ इच्छित नाहित.. ती नेटाने किल्ला लढवतेय.. ठाण मांडून आहे.. तर असा छळ.. माहेरच्यांकडूनच"
"तुम्ही काहि नाहि करत?"
"काय करणार मधे कशाला पडा?"
"मधे पडायची गरज नाही.. फक्त बेल वाजवूया" (धन्यवाद वसुलि)
आणि आम्ही तिघे खरोखर गेलो.. बेल वाजवली.. आवाज बंद झाले...
दार उघडले.. "काय?"
"ती लाल सँट्रो तुमची आहे का?"
"हो का?"
"नाहि लहान पोरं हवा काढत होती.. उद्या जायच्या आधी चेक करून घ्या.. " जे सुचलं ते बोललो
"ओके" दार बंद
निदान त्या रात्री पुन्हा ओरडण्याचे आवाज आले नाहित..
उपसंहारः तीने गेल्या महिन्यात लहान मुलीला जन्म दिला व नंतर माहेरी मुलीला सोडून 'त्या' ऑफीसवाल्याबरोबर पळून गेली आहे. :(
आता आम्ही वाजवलेली बेल 'योग्य जागी' होती का? हेच कळत नाहिये :(
"आमच्या पाहण्यातील कुटुंबातही
>> तुरुंगातील जगण्यापेक्षा
काही प्रश्न पडतात. त्या
अरुंधतीचा जो "वापर" केला
बेल वाजवायला....
प्रत्येकाच्या पाहण्यात एकतरी
जिथे मुली झालेल्याच नको असतात
In reply to प्रत्येकाच्या पाहण्यात एकतरी by रेवती
जाम संताप झाला वाचुन. पण
बेल