Skip to main content

चुकीचे मोबाईल रिचार्ज

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
चुकीचे मोबाईल रिचार्ज
गट्टू अन गिट्टी जात होते एकाच कॉलेजात तेथेच जुळले त्यांचे; गुंतले दोघे एकमेकात गट्टू स्वभावाने वांड होता गावात सोडलेला सांड होता याच्याशी भांड त्याच्याशी भांड असले उद्योग करत होता गिट्टीला तो खुपच सोज्वळ भासे कच्च्या लिंबाप्रमाणे कोवळा वाटे कॉपी केल्याने कॉलेजमधून रस्टीकेट झाला अपेक्षेप्रमाणे गट्टू एस.वाय.ला फेल झाला मनापासून प्रेम होते त्याचे गिट्टीवर ती न भेटली तर जीव होई खालीवर इकडे गट्टूच्या बापाने त्याला घराबाहेर काढला काहीतरी कामधंदा कर तरच घरी ये म्हणाला काय करावे काय करा

आपले "आयडॉल्स"

लेखक मुक्तसुनीत यांनी बुधवार, 21/09/2011 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच माधुरी दीक्षितला लिहिलेलं अनावृत्त पत्र आणि त्यावरून झालेली चर्चा वाचली. काही जणांनी असा सूर लावला की माधुरी दीक्षित ही काही फार मोठी अभिनेत्री नव्हे. इतरांनी त्या विरोधात नि बाजून मतं मांडली. हे सगळं वाचताना असे विचार मनात येत होते की, माधुरी दीक्षित म्हणा किंवा अन्य अशा स्वरूपाच्या एकेकाळच्या किंवा आताच्या लोकप्रिय नटनट्यांबद्दलची चर्चा वाचताना आपण यामधे मनाने गुंतत नाही आहोत. उदाहरणार्थ या प्रकरणी ही व्यक्ती चांगली अभिनेत्री आहे की नाही हा प्रश्नच मला महत्त्वाचा वाटेनासा होता.

हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार सदाचार नाही हा तर आहे भ्रष्ट आचार भ्रष्ट आचार काम करण्यासाठी कुणी ऑफीसात येतो, ऑफिसर कारकुनाची विनवणी करतो आज ये उद्या ये म्हणून वेळ फुक्कट जातो, पैसे घेवूनच मग कामं तो करतो असल्या कामासाठी लाच खाणं झाला शिष्टाचार शिष्टाचार हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार गोरगरीबाचे कामं तुम्ही लवकर कराना, चिल्यापिल्यांचे तुम्ही आशिर्वाद घ्याना माणसातली माणूसकी आता जागवाना पैसे मागण्याचा खेळ आता संपवाना सदाचार, सुनीती, निष्ठा यांचा करा प्रचार, करा प्रचार हटव

(मालकीणोपदेश)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
(मालकीणोपदेश) संदर्भ "लिहावे की न लिहावे, उडेल की न उडेल, रुचेल की न रुचेल, संपादेल की नसंपादेल हाच मोठा प्रश्न आहे" - पाषाण भेद-फियर (करू नको) (वरील जगप्रसिद्ध वक्तव्य असणारा गहन प्रश्न आमच्याही मनात आला पण गावातील आजकालचे नवनवीन Items पाहून ती भीती कमी झाली.) काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी बृ-स्पतीवारात माझ्या क्लायंट्सना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला बृ-स्पतीवार परिसराची एक चक्कर पुरेशी असते.

प्रिय माधुरीस

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 20/09/2011 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय माधुरीस, तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र 'कह दो के तुम हो मेरे वरना...' ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते.

ग्रहण-२

लेखक स्पा यांनी मंगळवार, 20/09/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रहण-१ किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज आला. आता तर पाय लटपटायला लागले होते. आत कोणीतरी होतं, नक्कीच. "कोण आहे आत?" मी घाबरुन बरळलो. हसल्यासारखा आवाज आला. आत जाऊ नको कि नाही? असहाय झालो होतो. बाजुला उभी केलेली एक मोडकी छत्री हातात घेतली, बुडत्याला काडीचा आधार. एक एक पाऊल टाकत आत शिरलो.

काही रेखाचित्रे

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 20/09/2011 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर दुसर्‍याचे लेखन प्रकाशित करायचा प्रघात नाही हे माहिती आहे. परंतु माझ्या भावानेच काढलेली असल्यामुळे त्याची काही स्केचेस इथे डकवतो आहे. यातले एकही स्केच माझे (म्हणजे मी काढलेले ;) ) नाही. सगळी चित्रे माझ्या भावाने काढलेली आहेत. बाकी फारसे काही लिहिण्यासारखे नाही आहे. त्यामुळे चित्रेच डकवतो.

(गुरुपदेश)

लेखक daredevils99 यांनी मंगळवार, 20/09/2011 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी चांदनी बारमध्ये माझ्या गुरुंना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला चांदनी बार परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला नेहेमी पाजण्याचा शब्द देणार्‍या आणि मी टल्ली झालो तरी मला पुन्हा-पुन्हा पाजण्याचा मोठे पणा दाखवणा-या अरूणभाईला पण भेटलो. त्यांला वर लॉजवरच्या रूममध्य जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त संवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता.

गुरूपदेश

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 20/09/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी आयआयटीमध्ये माझ्या प्राध्यापकाना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दूखावला गेलो तेव्हा माझी क्षमा मागण्याचा मोठे पणा दाखवणा-या प्रा. अरूणकुमारांना पण भेटलो. त्यांना लेक्चरला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त अंवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता. तो असा... "Rajeev, what are you doing these days? "- प्रा.

मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं ४ - माफ

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 20/09/2011 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच एक कविता वाचण्यात आली, माफ नावाची. निखिलचं शाईपेन या आयडीने लिहिलेली. कविता छान आहे, तांत्रिक बाजूत सुधारणेला वाव आहे. मुक्तछंदात लिहून एक लय, एक चढत जाणारा टेंपो पाळण्याच्या बाबतीत काही दुरुस्त्या करता येतील. पण त्यापलिकडे कवितेचा आशय प्रभावी आहे. संपूर्ण कविता वाचून मला पहिल्याप्रथम जाणीव झाली ती एका एकतर्फी केविलवाण्या प्रेमभंगाची. या जळजळीत अनुभवानंतर जी एक विरक्ती येते तिचं वर्णन या कवितेत आहे. पण ही विरक्ती खरी विरक्ती नाही. वेदना भळभळत असताना तिच्याकडे बघत म्हणावं, केलं, या घाव घालणाऱ्याला मी माफ केलं.