Skip to main content

आंब्याचे फळ

लेखक सदानंद ठाकूर यांनी रविवार, 20/11/2011 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच माझा एक म्युच्युअल फंडाचा ग्राहक ऑफिसमध्ये भेटयला आला होता, तुम्ही ती आंब्याची गोष्ट मागे सांगीतलीत म्हणून मी म्युच्युअल फंडात एसआपी सुरू केली व ती अजून चालू आहे व आता मला तिचा चांगलाच फायदा झाला आहे, धन्यवाद. मग मला ती मी त्याला सांगीतलेली गोष्ट आठवली. ७/८ वर्षापुर्वी तो ग्राहक माझ्याकडे गुंतवणूकीचा सल्ला मागायला आला होता, तेव्हा त्याने विचारले कि मला म्युच्युअल फंडात थोडी गुंतवणूक करावयाची आहे कसे काय करु ते सांगा तेव्हा मी त्याला प्रथमत: म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे सगळे फायदे व तोटे सांगीतले व जर तुला यात गुंतवणूक करावयाची असेल तर मी तुला एक माझ्याबाबतीत घडलेली गोष्ट सांगतो.

मी कागदावर सांडत गेलो

लेखक अविनाश खेडकर यांनी रविवार, 20/11/2011 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
कवित्व नाही माझा बाणा मी नच असे थोर कवी तो लिहिले ज्यांनी काव्यग्रंथ अन् समाज ज्यांना थोर मानतो कधी न केली कसली ईर्षा कुणी लिहिलेल्या काव्यत्वाची तुम्ही नभीचे सुर्य तळपते ना मज क्षमता काजव्याची आवडले जे जेंव्हा जेंव्हा शब्द सुमने उधळीत गेलो काळोखाच्या साम्राज्यावर मी शब्दाचा प्रकाश झालो मनात ऊठले वादळ तेंव्हा विचार माझे लिहिते झाले ना मात्रांशी सोयर माझे वृतांनी मज दूर लोटले अनुभवले जगण्यातून जे जे मनात सगळे मांडून घेतो कधी मनाला भरती येते अन् मी कागदावर सांडत जातो.

एक प्रेमकहाणी, अशीही !

लेखक चाफा यांनी शनिवार, 19/11/2011 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
स्मिताली, कालची तुझी भेट आठवली की अजुनही नजरेसमोर तो प्रसंग उभा रहातो. तुफानी पाउस.. आगदी एखाद्या गुन्हेगाराला पोलीसांनी झोडपुन काढावा तसा, आख्या शहराला झोडपत सुटलेला पाउस, त्यात कार्पोरेशनच्या कृपेमुळे तृप्त होऊन तुडुंब भरुन वहाणारी गटारं. मला आठवतयं तु माझ्या या उपमांमुळे खळाळुन हसली होतीस, पण मला दुसरी उपमा वेळेवर सुचलीच नाही त्याला मी काय करणार ? माझी जगाकडे पहाण्याची नजरच जरा उपहासपुर्ण आहे हे खरं. असो, त्या साठलेल्या गुढघाभर पाण्यात तु बंद पडलेली स्कुटी घेउन उभी, तुझा भांबावलेला चेहरा अजुनही मला आठवतोय.

सावरकर आणि क्रांती

लेखक अभिषेक९ यांनी शनिवार, 19/11/2011 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
pic
देशावर उत्कट प्रेम, इंग्रजांविषयी चीड आणि बलिदानाची तयारी ह्या तीन गोष्टींपलीकडे बघण्याची आवश्यकता होती. संह्याद्रीच्या कुशीतील चार-दोन किल्ले जिंकून स्वातंत्र्याची ज्योत फुंकणे ह्यात व्यवहार्यता होती पण ती मोगलांविरुद्ध! हाच मार्ग इंग्रजांच्या विरोधात केवळ अव्यवहार्यचं नाही तर भाबडेपणाचा होता.

|| सासूच्या नानाची टांग ||

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 19/11/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहॊ आज जागतिक पुरूष हक्क दिन आहे, त्याबद्दल समस्त मिपाकर पुरूषवर्गाचे अभिनंदन! आजच्या सकाळच्या मुख्य आवृत्तीमध्ये पान ८ वर सन २००७ पासून्ची एक आकडेवारी सकाळ ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. . यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घावा...पुरूषांच्या छळाला कायद्याचा प्रतिबंध नाही एवढेच त्यातून सिद्ध होते. नेत्रेश यांनी काढलेला धागा पण महत्त्वाचा आहे.

ऊर्ध्वरेता

लेखक शरद यांनी शनिवार, 19/11/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऊर्ध्वरेता एकदा श्रीकृष्णाला भेटावयाला दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणासकट आले. यमुनेच्या पलिकडे वनांत त्यांनी मुक्काम ठोकला. श्रीकृष्णाची शिवाचे अंश असलेल्या दुर्वास ऋषींवर अनन्य भक्ती होती. तेव्हा दुर्वासांच्या भोजनाकरिता श्रीकृष्णाच्या सर्व स्त्रीया भोजना़ची ताटे घेऊन निघाल्या. नदीपाशी येतात तो त्यांनी पाहिले की यमुना दुथडी भरून वहात आहे. आता काय करावयाचे? पलीकडे कसे जावयाचे ? त्या परत कृष्णाकडे आल्या व त्यांनी आपली अडचण त्याला सांगितली. तो म्हणाला " जा, यमुनेला सांगा की श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे ". स्त्रीया नदीपाशी आल्या व त्यांनी श्रीकृष्णाचा निरोप सांगितला.

झाडे वाट बघत बसतात ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 19/11/2011 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी बघतोय ह्या देशातील सूर्य बर्फात गुंडाळून ठेवलेला शुभ्र वाटतोय खुपसा पण तोंडावर बोट गप्प गप्प मुकामुकासा जीव गुदमरून जातोय त्याचा बर्फाच्या अटकेतून सुटण्याची त्याची धडपड चिंब थंड होऊन निसटतात त्याची किरणे बाहेर निसटले की तेही गारठून जातात लंगडत लंगडत खुरडत हलकेच झाडावर रेंगाळत बसतात शुभ्र बर्फ झाडांच्या काष्ठ शिल्पावर पिवळ्या उन्हाचा तुकडा हलकासा स्पर्श नुसता कोरडा निर्जीव केविलवाणा...!!
काव्यरस

(हल्ली मी घेतच नाही ...(؟)... )

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 18/11/2011 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच. हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)... भांजाळला गाल एकदा पाठीवर उमटले वळ ... आणि निघाली कमरेतुनी कळ त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... घेण्याची कारणे होती हजार चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ... विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा ..... कळी माझी खुलतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... नाही नाही म्हणत परत बळेच भरला ग्लास ... पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट यांची सांगड घालणे मला जमलेच नाही .... पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...

आम्ही ट्रेकींग करतो ( म्हणे ) !

लेखक चाफा यांनी शुक्रवार, 18/11/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
" मी या दगडांवरुन आजीबात येणार नाही आधीच सांगुन ठेवतो" आपल्या चिरकलेल्या आवाजात संज्याने डरकाळी फ़ोडली. " तु पक्का डरपोक रे लेकाचा, इथे काय हिमालय चढतोय का आपण?" रव्याने त्याच्या काळी पाच मधल्या आवाजात संज्याला सुनावले. " नालायका, हलकटा झालच तर मेंदुलेस माणसा या निसरड्या दगडावरुन डोंगर चढण्याला तु ट्रेकींग म्हणतोस?" संज्या बिथरला. " मग काय मुंबई पुणे रेल्वेट्रॅकवरुन चालण्याला ट्रेकिंग म्हणतात?" "ए, बास करा यार! आपण इथे ट्रेकींगला आलोय की भांडायला? तु गप रे संज्या.