Skip to main content

|| सासूच्या नानाची टांग ||

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 19/11/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहॊ आज जागतिक पुरूष हक्क दिन आहे, त्याबद्दल समस्त मिपाकर पुरूषवर्गाचे अभिनंदन! आजच्या सकाळच्या मुख्य आवृत्तीमध्ये पान ८ वर सन २००७ पासून्ची एक आकडेवारी सकाळ ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. . यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घावा...पुरूषांच्या छळाला कायद्याचा प्रतिबंध नाही एवढेच त्यातून सिद्ध होते. नेत्रेश यांनी काढलेला धागा पण महत्त्वाचा आहे. संपत्तीच्या लोभाने लग्न करणार्‍या स्त्रीयांपासून संपत्ती कशी वाचवायची, हा प्रश्न कायद्याने कसा हाताळणार हे एक कोडेच आहे. जाताजाता: सध्या झीमराठीवर एका येऊ घातलेल्या मालिकेची (दिल्या घरी तू सुखी रहा) जाहिरात जोरदार चालू आहे. त्यात एक आई तिच्या मुलीची वेणी घालताना तिला विचारते, "लग्न झाल्यावर सासू तुझे लाड करणार आहे का गं?" त्यावर मुलीने दिलेले उत्तर ऐकून मी थंडगारच पडलो. मुलगी उत्तरते, "सासूच्या नानाची टांग!". माझी आठवीतली मुलगी मला "सासूच्या नानाची टांग" म्हणजे काय असे रोज विचारून भंडावून सोडते. सध्यातरी तिच्या प्रश्नाचे उत्तर मी देउ शकलो नाही. पण महाराष्ट्रातल्या बर्‍याच मुलीना "सासूच्या नानाची टांग".म्हणजे काय याचे उत्तर नक्की माहिती असेल. कंचुकीदहन आणि स्लट मार्चनंतर स्त्रीमुक्तीचा नवीन अध्याय महाराष्ट्रात "सासूच्या नानाची टांग" या संदेशामुळे उघडेल हे मात्र नक्की!

वाचने 22523
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

आणी पुरुषांना कशाला पाहिजे.....जागतिक पुरूष हक्क दिन...... इथे भारतात आणी जवळ जवळ सगळीकडे पुरुषप्रधान संस्कॄती असताना ह्या हक्क दिनाची गरजच काय?????

In reply to by निवेदिता-ताई

स्त्रियांचा असतो मग आपला का नको? हम भी किसीसे कम नाही वैगरे दाखवायला त्यांनी हा दिवस काढलाय हो! बाकी दिवस कोणताही असला तरी आई,बहिण,बाईको,बॉस ह्यांच्या हाताच्या लाटण्याचा मार दिवसातुन एकदा तरी गोड मानून खावाच लागतो!

आजच्या सकाळच्या मुख्य आवृत्तीमध्ये पान ८ वर सन २००७ पासून्ची एक आकडेवारी सकाळ ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. . यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घावा
ही आकडेवारी वैवाहिक कारणांमुळे आत्महत्या केलेल्या विवाहित स्त्री-पुरुषांची आहे का ? तशी मी ही बातमी वाचली होती सकाळी पण विसरलो हे..

आजच्या सकाळच्या मुख्य आवृत्तीमध्ये पान ८ वर सन २००७ पासून्ची एक आकडेवारी सकाळ ने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुष जास्त आत्महत्या करतात हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. . यातून ज्याला जो अर्थ घ्यायचा तो त्याने घावा
ही आकडेवारी वैवाहिक कारणांमुळे आत्महत्या केलेल्या विवाहित स्त्री-पुरुषांची आहे का ? तशी मी ही बातमी वाचली होती सकाळी पण विसरलो हे..

In reply to by शाहरुख

पुरुषांचा कर्तूत्वाचा आवाका फार मोठा असल्याने लहान सहान कारणाने ते आत्महत्या करणार नाहीतच. तसच जर हे विधान मान्य नसेल, तरीही जोडीदाराचे वागणे हा मूख्य फॅक्टर डावलता येणार नाहीच.

धन्यवाद यूयूत्सू, आपल्यालाही जागतिक पुरूष हक्क दिनाच्या मनःपूर्वक शूभेछ्चा. एक स्त्रि शिकली तर भारतासारख्या देशात एक कूटूंब भिकेला लागू शकते, तेच जर एक पूरूष शिकला तर भारतासारख्या देशात एक कूटूंब भिकेला लागण्यापासून वाचू शकते. होय सूशीक्षित थरामधील कूटूंबात बायको नोकरी करते म्हणून नवरा घरात बसत नाही तर तो ही कमावता असतो. परीणामी दूसर्‍या कूटूंबातील कर्त्या पूरूषाचा नोकरीचा हक्क डावलला जातो. भारतात स्त्रियांना नोकरी करण्यावर कायद्याने बंदी आणली पाहीजे. स्त्रियांनी शिक्षण घेऊन संस्थळांवर धागे काढावेत, फेस्बूकवर बेगडी स्त्रिमूक्ती आंदोलन चालवावे, अथवा सरळ व्यवसाय टाकून अब्जाधीश व्हावे,राजकारन करावे, मनोरंजन क्षेत्रात जावे, भारताला प्रगतीपथावर न्यावे किव्हां घरात बसावे असेच पर्याय कायद्याने खूले ठेवले पाहिजेत. तसेच त्या सर्वप्रकारच्या नोकर्‍या करायलाही हरकत नाही जे काम करणे पूरूषांना शक्य नाही. मी अर्थातच एकतर्फी बन नाहीये, कारण हीच गोश्ट वाइस वर्सा पूरूषांनाही लागू होते. स्त्रियांनी त्या स्त्रिया आहेत याचा विषेश फायदा समाजाला/देशाला करून दीला पाहीजे. जि गोश्ट पूरूष आधीपासूनच करत आहेत/ करू शकतात तेच करत बसून सॅचूरेशन वाढवून स्त्रिया जगाचे पोटेन्शीअली फार मोठे नूकसान करत आहेत ही फार खेदजनक बाब होय.

In reply to by आत्मशून्य

होय सूशीक्षित थरामधील कूटूंबात बायको नोकरी करते म्हणून नवरा घरात बसत नाही तर तो ही कमावता असतो. परीणामी दूसर्‍या कूटूंबातील कर्त्या पूरूषाचा नोकरीचा हक्क डावलला जातो. अफलातून मुद्दा मांडल्याबद्दल अभिनंदन! तुम्हाला देशात नामी वकील म्हणून नाव कमावण्याची संधी आहे हे नक्की. ;)

In reply to by आत्मशून्य

धन्यवाद यूयूत्सू, आपल्यालाही जागतिक पुरूष हक्क दिनाच्या मनःपूर्वक शूभेछ्चा. एक स्त्रि शिकली तर भारतासारख्या देशात एक कूटूंब भिकेला लागू शकते, तेच जर एक पूरूष शिकला तर भारतासारख्या देशात एक कूटूंब भिकेला लागण्यापासून वाचू शकते. होय सूशीक्षित थरामधील कूटूंबात बायको नोकरी करते म्हणून नवरा घरात बसत नाही तर तो ही कमावता असतो. परीणामी दूसर्‍या कूटूंबातील कर्त्या पूरूषाचा नोकरीचा हक्क डावलला जातो. भारतात स्त्रियांना नोकरी करण्यावर कायद्याने बंदी आणली पाहीजे. स्त्रियांनी शिक्षण घेऊन संस्थळांवर धागे काढावेत, फेस्बूकवर बेगडी स्त्रिमूक्ती आंदोलन चालवावे, अथवा सरळ व्यवसाय टाकून अब्जाधीश व्हावे,राजकारन करावे, मनोरंजन क्षेत्रात जावे, भारताला प्रगतीपथावर न्यावे किव्हां घरात बसावे असेच पर्याय कायद्याने खूले ठेवले पाहिजेत. तसेच त्या सर्वप्रकारच्या नोकर्‍या करायलाही हरकत नाही जे काम करणे पूरूषांना शक्य नाही. मी अर्थातच एकतर्फी बन नाहीये, कारण हीच गोश्ट वाइस वर्सा पूरूषांनाही लागू होते. स्त्रियांनी त्या स्त्रिया आहेत याचा विषेश फायदा समाजाला/देशाला करून दीला पाहीजे. जि गोश्ट पूरूष आधीपासूनच करत आहेत/ करू शकतात तेच करत बसून सॅचूरेशन वाढवून स्त्रिया जगाचे पोटेन्शीअली फार मोठे नूकसान करत आहेत ही फार खेदजनक बाब होय. खलास! शब्द संपले! जय मराठी!

In reply to by आत्मशून्य

धन्यवाद यूयूत्सू, Submitted by आत्मशून्य on Sat, 19/11/2011 - 15:27.
तुमच्या पदकमलांचा फोटू मिळेल काय? रोज दर्शन घ्यावे अशी इच्छा आहे! अहह! काय ते विचार! काय ति बुद्धीमत्तेची झळाळी साक्षात मनू तुमच्या जिभेवर कॅब्रे डान्स आय मीन नृत्य करीत आहे असे वाटले.

+१००००० टु आत्मशुन्य, अगदी व्यवस्थित मुद्दा मांडला आहेस, हे नोकरीलाच काय पण शिक्षणाला देखील लागु होते. विशेषतः इंजिनियरिंगला, किती इंजिनियर झालेल्या मुली आपल्या शिक्षणाशी इमान ठेवुन नोकरी / व्यवसाय करतात. 'स्त्रियांनी त्या स्त्रिया आहेत याचा विषेश फायदा समाजाला/देशाला करून दीला पाहीजे. जि गोश्ट पूरूष आधीपासूनच करत आहेत/ करू शकतात तेच करत बसून सॅचूरेशन वाढवून स्त्रिया जगाचे पोटेन्शीअली फार मोठे नूकसान करत आहेत ही फार खेदजनक बाब होय.'' - १०० % आणि हाच मुळ मुद्दा आहे या सगळ्या वादांचा. आपण काहीतरी करुन दाखवु शकतो यापेक्षा जे करत आलेलो आहोत ते जास्त चांगलं कसं करु शकतो यात अक्कल लावली पाहिजे. ना धड नोकरी सांभाळता येते ना घर सांभाळता येतं, आणि मग ऑफिसातली कामं होत नाहीत कारण घरचे व्याप आहेत आणि घरी नीट काही करायला नको कारण ऑफिसचं टेन्शन आहे असं होउन जातं.

In reply to by ५० फक्त

१००% सहमत! (मी मुलगी आणि इंजिनियर असले तरी देखील) कॉम्पुटर सोडलं तर इतर क्षेत्रातील इंजिनियर मुली ह्या टोटली मुलांवर अवलंबून असतात.स्वतःच्या हाताला ओईल,ग्रीस लागू नये म्हणून किती कित्ती प्रयत्न करतात! एप्रन घालायची हि लाज वाटते ह्यांना.आणि जड जोब उचलत नाहीत,हाताला बर लागली आणि ठेम्भर रक्त आला तरी ह्या तसं तसं रडत बसतात.काम टेबलवर आणून दिलात तरच करील नाहीतर नाही! अस वागण असत ह्याचं!

In reply to by किचेन

उगच काही माहीती नसताना कशाला लोक बोल्तात हेच मला कळत नाही.... अशा किती जणी पाहिल्या हो तुम्ही?? की नुसतच ऐकलय?? .......
कॉम्पुटर सोडलं तर इतर क्षेत्रातील इंजिनियर मुली ह्या टोटली मुलांवर अवलंबून असतात.स्वतःच्या हाताला ओईल,ग्रीस लागू नये म्हणून किती कित्ती प्रयत्न करतात! एप्रन घालायची हि लाज वाटते ह्यांना.आणि जड जोब उचलत नाहीत,हाताला बर लागली आणि ठेम्भर रक्त आला तरी ह्या तसं तसं रडत बसतात.काम टेबलवर आणून दिलात तरच करील नाहीतर नाही! अस वागण असत ह्याचं!
"अभ्यास वाढ्वा....." शॉप फ्लोअर वर भरपुर काम करुन ग्रीस मध्ये हात घालयला आवडणारी.....

In reply to by किचेन

स्त्रिहीच स्त्रिचि वैरी असते हे फक्त ऐकल होत. 'मी सिंधुताई सपकाळ' हा चित्रपट पाहीला आहे का?? you must watch it.

In reply to by किचेन

@ किचेन : गप् ग, काहीतरी बोलायचे ! कित्ती मुली अश्या तुमच्या पहाण्यात आहेत ? (आता किचेन हा आयडी स्त्रीचा आहे हे गृहीत धरुन ) या अश्या स्रीयांमुळेच स्त्री चळवळीला ठेच लागते पण त्याने जास्त काही फरक पडत नाही याची नोंद घ्यावी.

In reply to by किचेन

@ किचेन अन ५० फक्त तुमच्या मताशी असहमत ! कीचेन ताइ इंजिनियर मुली ह्या टोटली मुलांवर अवलंबून असतात.स्वतःच्या हाताला ओईल,ग्रीस लागू नये म्हणून किती कित्ती प्रयत्न करतात! एप्रन घालायची हि लाज वाटते ह्यांना.आणि जड जोब उचलत नाहीत,हाताला बर लागली आणि ठेम्भर रक्त आला तरी ह्या तसं तसं रडत बसतात.काम टेबलवर आणून दिलात तरच करील नाहीतर नाही! अस वागण असत ह्याचं! अत्यन्त चुकिच विधान , आमचे हात दिवसभर काळेच असत्तात ,अन बर लागन्याच काय घेउन बसलात इथे कित्ति वेळा बोट देखिल कापतात ,अडी-नडीला तर हातात फाइल घेउन बर सुध्धा मारावी लागते . काही जणाना कॉतुक असते ,पण त्या ही पेक्षा " एखादी चुक झाली तर तुम्ही चुकिच्या फिल्ड्मध्ये आहात हे तुम्हाला मुद्दाम सान्गनारे महाभागही असत्तात :) @ ५० फक्त किती मुली इमाने-इतबारे काम करत्तात? मला तर वाट्ते मुलीच सिरियसली काम करत्तात ,चुकु नये काही म्हनौन मुल आपल १०० तला एखादा जॉब चेक करतिल randmaly अन म्हनतिल झाल ब्वा चेकिन्ग एकदाच ;) ( शॉप फ्लोअरला बोट कापुन घेनारी पियु :) )

In reply to by पियुशा

पहिल्यांदा हॅटस ऑफ टु पियुषा अँड पि.रा., पण सामान्य नियम अपवादानेच सिद्ध होतात हे खरं असावं. असो, पियुषा, माझं स्टेटमेंट पहा ' किती इंजिनियर झालेल्या मुली आपल्या शिक्षणाशी इमान ठेवुन नोकरी / व्यवसाय करतात.' करत असलेल्या नोकरी / व्यवसायात इमानदारी ही मुलीच जास्त दाखवतात हे १००% सत्य आहे पण वर जे बोल्ड केलंय त्याबद्दल काय. वर किचेननं तिचंच उदाहरण दिलंय. इंजिनियरिंग करुन जर घरी बसायचं असेल किंवा नंतर एम्बिए करुन ओफिस जॉब करायचा असेल तर मग कशाला एका मुलाची इंजिनियरिंगची सीट घालवता, घरी बसणं किंवा एम्बिए करणं हे बाकीच्या पदवी अभ्यासानंतर सुद्धा करता आलं असतं ना.

In reply to by ५० फक्त

किती इंजिनियर झालेल्या मुली आपल्या शिक्षणाशी इमान ठेवुन नोकरी / व्यवसाय करतात.'
या बाबतीत आपल्याकडे काही विदा असल्यास आधी तो प्रकाशित करावा अशी मी फक्त ५० यांना विनंती करतो.

In reply to by ५० फक्त

इंजिनियरिंग करुन जर घरी बसायचं असेल किंवा नंतर एम्बिए करुन ओफिस जॉब करायचा असेल तर मग कशाला एका मुलाची इंजिनियरिंगची सीट घालवता, विधानात एका मुलाची हे शब्द खटकले. या ऐवजी मग कशाला एका विद्यार्थ्याची / विद्यार्थीनीची सीट घालवता असेही लिहीता येईल . मला इंजिनियरिंग करुन इतर व्यवसायात (कि ज्याचा इंजिनीअरिंगशी काडिचाही संदर्भ नाही) शिरलेले मुले ही माहीत आहेत.

In reply to by ५० फक्त

इंजिनियरिंग करुन जर घरी बसायचं असेल किंवा नंतर एम्बिए करुन ओफिस जॉब करायचा असेल तर मग कशाला एका मुलाची इंजिनियरिंगची सीट घालवता, घरी बसणं किंवा एम्बिए करणं हे बाकीच्या पदवी अभ्यासानंतर सुद्धा करता आलं असतं ना.
पण अस फक्त मुलीच करतात का?? मग तुम्ही एम.बी.ए च्या अनेक कॉलेज मध्ये इन्जीनिअरिन्ग करुन आलेली मुलं पाहिली नाही का?? आणि घरी बसायचं म्हणाल तर.. माझ्या इन्जीनिअरिन्ग च्या इतक्या मैत्रीणी मध्ये फक्त २ घरी आहेत... ज्यातल्या १ कीच लग्न शेवटच्या वर्‍शात लग्न लावुन दिलं तरी ती नेटान अभ्यास करुन मस्त % नी पास झाली..पण सासरी नोकरीला विरोध झाला... घरी बसवलं... २ री अचानक लग्न झालं न अमेरिकेला गेली..तिकडे नोकरी मिळत नाहीये... मुली मुद्दाम असं वागतात ..... स्त्रियांना अगदी पुरुषां एवढी मोकळिक आहे हवं ते निवडण्याची... मुलं, लग्न, सासरी जाणं हे मुळिच आड येत नाही त्याच्या नोकरीच्या... असं जर का तुला वाट्त असेल तर मात्र तुला आमचं म्हणणं पटणं अवघड आहे... बर मग ह्या अडचणी आहेत म्हणुन आम्ही घरी बसावं का?? म्हणजे जी मुलगी थोड्या सवलती दिल्यास (बाळंतपणात ३ महिने रजा, मुल लहान असताना work from home, घरुन कामात मदत) मुला एवढी उत्तम , उलट त्या पेक्षा जास्त चांगलं काम करू शकते तिनी घरी बसावं?? आणि लहान मुलांच्या आबाळ होण्या बद्दल बोलाल तर माझी आइ माझ्या जन्माच्या आधी पासुन काम करत होती, थोडी गैरसोय झाली , पण उलट मी व माझी बहीण independent झालो.. आईची कदर खूप आहे आणि इतर घरी जसं घरत असणर्या आयांना हुकुम सोडणे, ग्रुहीत धरणे, "तुला काय कळ्तय??" असली भाषा वापरणे..असं आमच्या घरात कधीही झालं नाही... आमची आबाळ तर दूर उलट आई सर्व बाबतीत घरत बसणार्या बाइ पेक्षा जास्त efficient होती...ती उत्तम संस्क्रुत शिकवते आणि लोकांना त्यामुळे आई बद्दल आदर वाटतो... माझी आई काम करते ह्याचा मला अभिमान आहे...आणि माझ्या मुलांनाही माझा असेल...!

In reply to by पिलीयन रायडर

माझी आई हाऊस-वाइफ होती/आहे ह्याचा मला जास्त अभिमान आहे... आणि माझ्या पत्नीचा तो स्वेछ्चेने घेतलेला निर्णय असेल तर माझ्या मुलिंनाही त्याचा अभिमान असेल. मूळातच बर्‍याच स्त्रिया काम ह्या पूरूषांपेक्षा वरचढ आहोत हे सिध्द करायच्या सूप्त इर्षा मनात ठेऊन करत असतात. त्यामूळे त्या जे करतात ती कामातील सफाइ न्हवे. तसच सन्माननीय अपवादही असतातच, कधी कधी केनया वेस्टींडीज ला हरवते, बाग्लादेश पाकिस्तानला हरवतो याचा अर्थ त्या बलाढ्य टीम्स आहेत असा न्हवे. मूळात स्त्रियांनी त्या स्त्रिया आहेत याचा समाजाला विषेश फायदा करून दिला पाहीजे. त्या लायबलेटीज न्हवे तर अ‍ॅस्सेट्स म्हणून सिध्द झाल्या पाहीजेत. किचेन यांच्या कामाचे स्वरूप बघता त्यांचा समाजातील सर्व स्तरातीलच बर्‍याच लोकांशी, विवीध प्रवृत्तींशी त्यांचा संपर्क येतोच हे सहज कळते. म्हणून त्यांची जाणीव व अभ्यास व्यापक आहे व निरीक्षण सखोल यावर दूमत नाही. त्या सदरील मूद्याकडे वैयक्तीक इगो न्हवे तर सामाजीक प्रवृत्तीच्या अभ्यासाचा चश्मा घालून बघत आहेत. तर त्यांना विरोध दर्शवणारे मात्र अहंकार व स्वतःची प्रवृत्ती इतक्याच तूटपूंज्या शिदोरीवर आपलं मत रेटत आहेत. समाजातील व्यवहारांचे व्यावहरीक पातळीवर असे ज्ञान जोपासणार्‍या व्यक्तीच्या (स्त्रिच्या) निसंदीग्ध मताला बेगडी विरोध करणारेच आज स्त्रि सबलीकरणाचे खरे विरोधक होय. हे बरं न्हवे.

In reply to by पैसा

फक्त ५० यांनी विदा पुरवल्यावर उत्तर देण्यात येईल. आत्मशुन्य वा दादा कोंडके या दोघां पैकी कुणी एकाने दिला तरी हरकत नाही.

In reply to by गणपा

पण आमच्या वर्गातल्यांचं उदाहरण देतो. माझ्या माहिती प्रमाणे, साधारणः १. १००% मुलं नोकरी/व्यवसाय करत आहेत २. ७०% मुली नोकरी करत आहेत ३. लग्न झालेल्या ५०% मुलांच्या बायका नोकरी करत नाहीत ४. १००% मुलींचे नवरे नोकरी/व्यवसाय करत आहेत आता ह्यावरून मी सहमती दाखवली. आणि अशाप्रकारे युयुस्तुंचा धागा शतकी वाटचाल करत आहे! :)

In reply to by दादा कोंडके

४. १००% मुलींचे नवरे नोकरी/व्यवसाय करत आहेत
म्हणजे या मूलीना पोटापाण्यासाठी न्हवे तर चैन व हौस्मौज करायची म्हणून नोकरी हवी. ती सूध्दा समोरच्याच्या पोटावर पाय देऊन. पण यासाठी नोकरी का ? व्यवसाय केला तर समाजाला जास्त हातभार लागणार नाही काय ? उदा. जसा माझा भाउ वकील आहे तसचं आत्याही वकील आहे, बरेच गृहकलह ती सोडवते (हेच ते जिथे स्त्रियांवर (जास्त करून घरच्यांकडूनच) अन्याय केले जातात चूकीची वागणूक दीली जाते त्यावर कायदेशीर मदत करते/मिळवून देते वगैरे वगैरे व दोषींना गून्हेगार सिध्द करते) ज्याचा मला अत्यंत अभिमानही आहे. ज्याना फक्त मूलीच आहेत, अथवा दूर्दैवाने परीस्थीती वाइट आहे अशा वेळी स्त्रियांनी नोकरीही जरूर करावी. पण केवळ जास्त मजा करता यावी म्हणून हे वागण योग्य आहे काय ? डॉलरमाज वा कम्यूनीस्ट प्रव्रुत्ती असणार्‍यांच मत काहीही असो भारतात हे वागणं प्रॅक्टीकल आहे काय ? आपण समाजासाठी काही देणं लागत नाही काय ? नैतीकतेचा मूद्दा पैसा मिळवत असल्याच्या गूर्मीत सहज दूर्लक्षीला जाइल म्हणूनच यावर कायदेशीर उपायच योजला जावा असं म्हणालो तर मनूचा कॅब्रे काय अंडवेअरच ज्वलन काय... काहीही भंपक विचार केला जातोय. पण आपण भारतीयांच काय , आपण दगड बनलो आहोत काय ? आपली मने इतकी निष्ठूर झाली आहेत काय ? की साधीसंवेदन शीलता, माणूसकी आपण विसरून भौतीकतेपायी एकमेकांच्या पोटावर असा पाय द्यावा ?

In reply to by आत्मशून्य

म्हणजे या मूलीना पोटापाण्यासाठी न्हवे तर चैन व हौस्मौज करायची म्हणून नोकरी हवी.
हे तुम्ही कसे काय ठरवलेत? ज्या ७०% मुली नोकर्‍या करीत आहेत त्यांच्या नवर्‍यांबद्दल पण हेच मत आहे का आपलं? बाकी आपले या धाग्यावरचे ईतर प्रतिसाद पहाता, मी ईथेच थांबतो. कुणी मुद्दाम घडे पालथे ठेवले असतील तर त्यात पाणी भरण्याचा प्रयत्न करणाराच मुर्ख ठरणार नाही का. :)

In reply to by गणपा

प्रॅक्टीकल असेल तर माझा विचार वाइस वर्सा अप्लाय करायला माझी हरकत नाही असं आधीच म्हटलं आहे. तसचं मी कूठेही स्त्रियांवर बंधने घालावीत त्यांनी शिकू सवरू नये,उद्योग चालवू नयेत, घराची जबाबदारी उचलू नये, अथवा केवळ घरकामच करत रहावे, चूल्मूलच सांभाळावे, राजकारण करू नये, कर्तूत्वाला बासनात गूंडाळून बसावे असं म्हटलं नाहीये. मला होत असलेला विरोध हा एक तर माझा मूद्दा न समजल्याने, अशूध्द लेखनाने अथवा करायचा म्हणून करायचा याच कारणाने होतोय असचं दीसतयं. जे चूक आहे. मि फक्त भारतातील पूरूषांच्या पोटावर जी विनाकारण गदा येते आहे त्या विरोधात आवाज उठवत आहे. काही चांगल करायला गेलं तर इथं अण्णा हजारेंना विरोध केला जातो तर माझ्या सारख्या फालतू माणसाची काय कथा ? असो,
ज्या ७०% मुली नोकर्‍या करीत आहेत त्यांच्या नवर्‍यांबद्दल पण हेच मत आहे का आपलं?
माझं लिखाण फार अशूध्द असत म्हणून समजलं नसेल तर वर लिहलेलं निसंधीग्ध करतो की ज्या नोकरी करणार्‍या मूलीचे नवरे नोकरी करत आहेत त्यांच्यामूळे इतर अशा मूलांच्या पोटावर पाय येत आहे ज्यांची कूटूंम्बे ही केवळ मूलांवरच अवलंबून आहेत म्हणजे थोडक्यात नोकरी करणार्‍या मूली केवळ ७०% गरजू मूलांच्या नोकर्‍या खात नसून त्यांच्या ३०% मैत्रीणी ज्यांना करीअरचा माज्/सोस/ आवड अथवा इछ्चा नाही त्यांच्याही (व त्यांच्या फ्यामीलीच्याही) पोटावर पाय देत आहेत, त्यांना अबावश्यक कमीपणा देत आहेत, आयूष्य जगण्यास अडचणी निर्माण करत आहेत. या परीस्थीतीत कायद्याने स्त्रियांना नोकरी करण्यास मनाइ केलीच पाहीजे, कारण पैसा कमावते या गर्वाखाली या मूली नैतीकता म्हणून राजीनामा देणार नाहीत/जॉब सोडणार नाहीत, मग कायद्यानेच हा पेच सोडवावा अशी मागणी करून या असंवेदनशील अन्यायाला वाचा फोडली तर काही चूकतय का ? बर यांचा गर्वही असा की कोयते घेऊन आंदोलन होइल की काय अशी यांची दडपशाही चालू आहे, मग आता या मग्रूरी व विषमतेबद्दल विरूध्द आजच आवाज उठवायला नको काय ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य, मला तरी सांगा अशी एखादी नोकरी जी हौसमौजेसाठी करतात, मी पण करेन म्हणते. दुसरी गोष्ट अशी कि मूली त्याच नोकर्‍या करतात ज्या पुरुष करतात.

In reply to by दादा कोंडके

लग्न झालेल्या ५०% मुलांच्या बायका नोकरी करत नाहीत
याच कारण विचारलत? घरची सुबत्ता? सासरच्या लोकांचा नोकरी न करण्याचा 'प्रेमळ' आग्रह वगैरे?
१. १००% मुलं नोकरी/व्यवसाय करत आहेत
१००% मधली किती टक्के व्यवसाय करीत आहेत?
२. ७०% मुली नोकरी करत आहेत
७०%. बघा, आकडाच बोलतोय. उरलेल्या ३०% मधल्या किती लग्न न झालेल्या आहेत? हे विचारायच कारण असं की हल्ली शिकल्या सवरलेल्या मुली लग्नाआधी स्वतःहुन नोकर्‍या धरतातच. तीच नोकरी करण वा नकरण हे लग्न झाल्यावर तिचे सासरची मंडळी ठरवतात.
१००% मुलींचे नवरे नोकरी/व्यवसाय करत आहेत
यात नवल ते काय? अरे आपली पुरुषप्रधान संकृती नाही का?

In reply to by गणपा

पुरुषप्रधान संकृती न्हवे तर स्त्रियांचा भारतीय समाजाला आर्थीक उपद्रव व पर्यायाने पूरूषांना त्याचे भोगावे लागणारे "क्वान्सिक्वेन्सेस" हा मूद्दा आहे. आणी जो फक्त भारतातील परीस्थीतीशी निगडीत आहे. तेव्हां (बेगड्या) अमेरीकी स्त्रिमूक्तीवादाच्या नजरेतून अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे वैयक्तीक उपभोगाच्या विषयाच्या नजरेतून देशावरील संकटाकडे पाहण्यात येऊ नये/मत किमान यापूढे तरी मांडू नये अशी नंम्र विनंती.

In reply to by दादा कोंडके

अरेरे बिच्चारे "सासूचे नाना" कसल्या वयात त्याना कायकाय भोगावे लागतय. सासूची नानी असा शब्द असता तर जरा जास्त सयुक्तिक ठरले असते. तो काव्यगत न्याय ही झाला असता. सासूच्या नानाला बोलावणे हा काव्यगत अन्याय आहे

In reply to by पिलीयन रायडर

Generalize करता येईल इतका विदा नाहीये पियुषा / पि. रा. आणि गणपा. पण अनेक उदाहरणं आहेत आजू बाजूला -- माझ्या बरोबर शिकलेल्या किमान ७-८ तरी मुली ज्या हुशार होत्या (टक्केवारी, एकूण समज, बुद्धिमत्ता) ज्यांनी इंजिनिअरिंग किंवा इतर वैद्यकीय (आयुर्वेदिक / होमिओपॅथी) वगैरे शिक्षण चांगल्या कॉलेजेस मधून घेतलं. आणि नंतर कुठलेही विशेष प्रयत्न न करता उसगावात मुले वाढवत आहेत. हेही महत्त्वाचेच काम आहे आणि त्यात गौण काहि नाही. पण हे कितपत योग्य आहे? ११- १२वी मध्ये एक ऐच्छिक विषय होता ज्यात वेल्डिंग / फायलिंग / टू व्हीलर मेंटेनन्स करायला लागायचा. काही मुली फक्त मार्क मिळतात सहज आणि हे सगळं काम मास्तर लोक करून देतात म्हणून आल्या होत्या. आणि त्यांनी त्या चतुराईने मार्कही मिळवले जास्त कष्ट न करता - एकही जॉब पूर्णपणे एकट्याने न करता आणि मग राजरोसपणे aggregate वाढवून electronics किंवा तत्सम विषय घेतले इंजिनिअरिंगला. त्यातही निम्म्या मुलि अमेरिका / इंग्लंड इथे सेटल्ड आहेत नोकरी न करता... पियुषा -- आता ३३% आरक्षणातून ज्या मुली प्रॉडक्शन / मेकॅनिकल मध्ये येतात त्यातला १०-१५% तरी त्याच्याशी प्रामाणिक असतात का? वर इतर कोणी म्हटल्या प्रमाणे तुमच्या अपवादातूनच हा नियम सिद्ध होतो आहे... वस्तुस्थिती नाकारता येत नाही की अजूनही खुप स्वातंत्र्य नाहीये मुलिंना आणि ते बरोबर काम करणार्‍या शिकलेल्या उत्तम जॉब करणार्‍या मुलींनाही घरी नवराच काय वडिल / भाऊ आणि आई / सासू यांच्याकडून होणारे अन्यायात्मक निर्णय आणि अनुभव स्वीकारावे लागतात. पण म्हणून गैरफायदा घेणार्‍या / काम टाळणार्‍या / घोकंपट्टी पद्धतीने बारावी पार पाडून कॉलेजात अळं टळं करुन लग्न करून आराम करणार्‍यांची संख्या नाकारण्याइतकी नक्कीच कमी नाही... त्यामध्ये ज्यांना घरची जबाबदारी आहे अशा मुलांच्या जागा जातात (काही वेळा) हेही खरं आहे.. दुसरा मुद्दा एम बी ए चा -- एक 3 idiots पाहून यावर मत प्रदर्शन करण्यात काहीच अर्थ नाही की इंजिनिअरिंग करुन लोक एम बी ए का करतात? पहिली पदवी अमुकच असावी याचं एम बी ए ला बंधन नाही. विविध प्रकारचे पर्याय मॅनेजमेंट मध्ये उपलब्ध असतात. इंजिनिअरिंगचं शिक्षण हे अगदी विशिष्ट तांत्रिक ज्ञानापेक्षाही जो aptitude देउ शकते त्यामुळे बरेचदा असे लोक पुढे उत्तम काम करतात. याच मुद्द्यावर राहायचं तर इतर कुठलिही non-computer / non -IT पदवी असलेल्यांनी तथाकथित आय टी मध्ये अजिबात काम करू नये. पण अशी सुरुवात केली तर भारतीय आय टीला गाशा गुंडाळावा लागेल. हा अतिशय वेगळा मुद्दा आहे आणि त्याला वरच्या इंटरेस्ट आणि तयारी नसताना पदवी घेऊन नोकरी करायची नाही असे लक्ख सांगण्याच्या पद्धतिशी जोडू नये...

In reply to by ५० फक्त

@ ५० फकत ,आत्म्शुन्य शिक्षणाशी इमान ठेवुन नोकरी / व्यवसाय करतात.' करत असलेल्या नोकरी / व्यवसायात इमानदारी ही मुलीच जास्त दाखवतात हे १००% सत्य आहे चला हे तर मान्य आहे तुम्हाला :) पण वर जे बोल्ड केलंय त्याबद्दल काय. वर किचेननं तिचंच उदाहरण दिलंय. तीने जर तिच्याबद्द्ल किन्वा तिच्या पाह्न्यातल्या कुनाबद्द्ल हे मत बनवल असेल तर ते एकतर्फी म्हनता येइल :) इंजिनियरिंग करुन जर घरी बसायचं असेल किंवा नंतर एम्बिए करुन ओफिस जॉब करायचा असेल तर मग कशाला एका मुलाची इंजिनियरिंगची सीट घालवता, घरी बसणं किंवा एम्बिए करणं हे बाकीच्या पदवी अभ्यासानंतर सुद्धा करता आलं असतं ना. घरी बसन्याला कोन कारनीभुत आहे त्यावर डीपेण्ड आहे ते , जर एखाद्या मुलिच लग्न झाल्यावर जर तिच्या सासरच्या लोकानी नोकरिला/करियरला विरोध दर्शवला असेल तर ती काय करनारे मग? जिथे स्त्री - पुरुष समानताचे धडे गिरवत आहेत तिथे आपण्च आपल्या बायकोने नोकरी करुन मुलान्चा अभ्यास्,स्वयपाक , इतर कामे व्यवस्थित साम्भाळावित असा अट्ट्हास असेल तर कशाला कोन झक मारायला करेन नोकरि ;) तुम्ही कमवा अन पोसा मग आम्ही करतो M.D.B,S :)

स्वतःला सुशिक्षीत म्हणवणार्‍यांची विचारसरणी पाहुन सखेद आश्चर्य वाटले.

In reply to by गणपा

स्वतःला सुशिक्षीत म्हणवणार्‍यांची विचारसरणी पाहुन सखेद आश्चर्य वाटले पुर्णत: सहमत. याच बरोबर मला या सुशिक्षीतांची लाज देखिल वाटली.....

स्वतःला सुशिक्षीत म्हणवणार्‍यांची विचारसरणी पाहुन सखेद आश्चर्य वाटले. असंच मलाही वाटतं. भारतात स्त्रियांना नोकरी करण्यावर कायद्याने बंदी आणली पाहीजे हा फारच टोकाचा विचार वाटतो.

In reply to by तिमा

उडवून लावा असले प्रतिगामी लेख!
मुळीच नको. तुम्हाला लोकांचा टाईमपास झालेला पाहवत नाही काय? ;) एक छान वाक्य आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय... तमाशाने महाराष्ट्र बिघडला नाही आणि किर्तनाने तो सुधरला नाही. :)

In reply to by तिमा

असा कसा लेख उडवणार? मी एक सदस्या म्हणून प्रतिसाद दिला तरी त्याकडे पाहणारे एक संपादिकेने प्रतिसाद दिलाय असंच पाहणार असतील तर आता दुसरा आयडी घ्यावा लागणार.;)

स्त्री-पुरूष भेदभाव अधोरेखित करून मुद्दाम भांडणे लावून जास्तीतजास्त प्रतिसाद मिळवल्याच्या बेगडी समाधानासाठी काढलेला हा धागा वाटतो आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण आज पूरूष हक्क दिन आहे ते धाग्यामूळच कळालं. मग म्हटलं फारच सूनंसूनं वाटतयं, तेव्हां हक्क बजावून बघूया अजून काय वाजतय का ते ? म्हणून मग प्रतिसाद प्रपंच केला. :)

एवढं शिकून सवरून तुम्हाला मुलीला एवढं समजावता येऊ नये म्हणजे कमाल आहे. प्रथम एकेका शब्दाचे अर्थ बघू- सासू- ज्या पुरुषाशी एखाद्या स्त्रीचे लग्न होते त्याची आई. नाना- हिंदीत बहुतेकवेळा आईचे बाबा, पण मराठीत बाबा,काका, मोठा भाऊ ,सासरे इ. कोणतीही आदरणीय किंवा नात्याने मोठी पुरूष व्यक्ती. टांग- पाय . कमरेच्या खुब्यापासूनचा पुढचा पायाचा भाग . थोडक्यात नवर्‍याच्या आदरणिय आईच्या एखाद्या आदरणीय पुरूष नातेवाईकाचेही पाय धरून वंदन करायला ती मुलगी तयार आहे असे दिसते. वाहवा, किती उच्च संस्कार. अर्थात जिची वेणी आईने घालावी लागते अशा मोठे केस असणार्‍या सालस मुलीवर असेच संस्कार असणार म्हणा. मालिकेत आपल्य मुलीचा बॉबकट,बॉयकट ब्लोअरने सेट किंवा पर्म करणारी "मम्मी" दाखवली नाहीय्ये यातच सगळं आलं म्हणा. अत्यंत उच्च संस्कार देणारि मालिका असणार ही. तुम्हीही पहा आणि मुलीलाही रोज दाखवा बरं. आठवीत म्हणजे बरीच मोठी आहे मुलगी. चौदा वर्षांची तरी असणार. पुरूषांच्या शिक्षणाच्या आणि नोकरीधंद्यांच्या संधी जाऊ नये या विचाराने तिला थोडंफार शिक्षण देऊन चारपाच वर्षांत लग्नकार्य जमवावं लागेल. आत्तापासून वडिलधार्‍यांना आदर देण्याचे संस्कार झालेच पाहिजेत तिच्यावर. बाकी जागतिक पुरूषदिनाच्या तुम्हला शुभेच्छा! केवळ आजचा दिवसच नाही तर हा महिनाही पुरूषांसाठी,त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मोव्हेंबर किंवा मुश्टॅक-नोव्हेंबर चळवळीविषयी ऐकलंच असेल तुम्ही. तर तुम्हाला नोव्हेंबराच्या सॉरी, मोव्हेंबराच्याही शुभेच्छा.

In reply to by साती

    | सासू- ज्या पुरुषाशी एखाद्या स्त्रीचे लग्न होते त्याची आई. पुरुषांनादेखील सासू असते. ------------------------------ बाकी प्रतिक्रियेस +१ !

In reply to by साती

सासूच्या नानाची टांग!
वाह्ह !! व्वाह्ह !! काय एक्स्प्लेनेशन दिलंय.... युयुत्सु, अशाच अजुन शिव्यांचे कलेक्शन येउ द्यात..... त्यांचेही एक्स्प्लेनेशन होउन जाउ द्या..... काय म्हंता मंडळी....

In reply to by साती

सासू- ज्या पुरुषाशी एखाद्या स्त्रीचे लग्न होते त्याची आई. असे काही नाही. स्त्री चे स्त्रीशी लग्न झाले तर जिच्याशी लग्न झाले तिची आई ही सुद्धा सासूच नव्हे का? अशी अर्धवट माहिती नका देत जाउ ब्वा.

>>पण महाराष्ट्रातल्या बर्‍याच मुलीना "सासूच्या नानाची टांग".म्हणजे काय याचे उत्तर नक्की माहिती >>असेल. अगदी. अगदी. आम्हाला आमच्या वडिलांनी अगदी नीट समजावून सांगितले होते, लहानपणीच सासूच्या नानाची टांग म्हणजे काय ते.

स्त्री ही स्त्रीचीच नव्हे तर पुरुषाचीही शत्रू असते आणि केवळ पवित्र बायबलमध्ये म्हटले आहे, की 'शत्रूवरही प्रेम करा' म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम करायचे इतकेच. एरवी पुरुषांनी स्त्रियांशी कसलाही संबंध ठेऊ नये आणि हेच तत्त्व आपण आपल्या मुलांवर आणि त्यांनी त्यांच्या मुलांवर बिंबवले पाहिजे.

In reply to by योगप्रभू

पुरुषांनी स्त्रियांशी कसलाही संबंध ठेऊ नये आणि हेच तत्त्व आपण आपल्या मुलांवर आणि त्यांनी त्यांच्या मुलांवर बिंबवले पाहिजे. हा:...हा:...हा:..कसलाही संबंध ठेवला नाही तर मुले कशी व्हावी? हे तत्त्व मुलांपर्यंत आणि त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचविणे शक्यच होणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर, मुले स्वतः काढलेल्या चित्राखाली जसे इतरांना समजण्यासाठी 'ही गाय आहे' असे लिहितात तसे आता मला प्रतिसादासमवेत कंसात (हा विनोद आहे) असे लिहावेसे वाटू लागले आहे. :) असो, 'कसलाही संबंध ठेवला नाही तर मुले कशी व्हावी?' असा प्रश्न/शंका आपण विचारताय. अहो, आमच्याकडे अशक्य असे काहीच नाही. हे घ्या स्पष्ट पुरावे.. १) मारुतीचा घाम मगरीने गिळला आणि तिला मकरध्वज नावाचा मुलगा झाला. (संदर्भ - रामायण) २) पूर्वीच्या काळी पुत्रकामेष्टि नावाचा यज्ञ केला, की अग्निदेवता पायस (खीर) घेऊन येत असे. ती खाल्ल्यावर राण्यांना मुले होत. नंतर तर नऊ महिन्याचा काळही जाचक ठरु लागला (पुरुषांना, की स्त्रियांना ते ठाऊक नाही) म्हणून लोक अग्निदेवतेला म्हणाले, 'डायरेक्ट मूलच दे रे बाबा.' आणि काय आश्चर्य! तीपण सुविधा उपलब्ध झाली (संदर्भ - द्रौपदी आणि धृष्ट्द्युम्न जन्म) दुसरीकडे बायकाही काही कमी वस्ताद नाहीत. त्यांनाही पुरुषांशी संबंध न ठेवता मुले होऊ शकतात. १) कुंतीने सहा देवांचे मंत्र म्हणले आणि तिला सहा पोरे झाली. (संदर्भ - महाभारत) २) पार्वतीने मातीपासून बालक बनवून त्याला सजीव केले (संदर्भ - गिरीजात्मज हा तिने बनवला पुतळा मातीचा, ही गाण्याची ओळ) ३) सती अनसूयेने तर तीन देवांचे एकाच बालकात कॉम्बिनेशन केले (संदर्भ - दत्तजन्म)

In reply to by योगप्रभू

असं आहे का? काय करणार तेवढी विनोद बुद्धी मज पामराजवळ नाही. माझं सामान्यज्ञान, संतती प्राप्ती स्त्री-पुरुष, नर-मादी ह्यांच्या परस्पर साहाय्याशिवाय शक्य नाही, ह्यापलीकडे जात नाही. 'पुराणातील वानगी पुराणात' ह्या उक्तीवरूनही आता विश्वास उडू लागला आहे. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

'पुराणातील वानगी पुराणात' ह्या उक्तीवरूनही आता विश्वास उडू लागला आहे.
इथे "वांगी" शब्द न वापरण्यासाठी धन्यवाद काका. :)

सर्व पुरुषांना शुभेच्छा. पुरुषमुक्तीच्या चळवळीने जोम धरण्याची गरज आहे हे जागोजाग दिसून येतं आहे. एक काळ असा होता की पुरुषांची स्त्रियांवर हुकुमत होती. 'पायातली वहाण कशी पायातच हवी' असं ते ठामपणे जाहीर करू शकत असत. खरी मर्दुमकी होती राव त्यांच्याकडे! आताच्या पुरषांमध्ये ही हिम्मत गेलेली दिसते. त्यामुळे कणखरपणे सांगण्याऐवजी भ्याडासारखं 'त्याचं काय आहे, मुलीने इंजिनियरिंग केलं तर एका गरीब बिचाऱ्या मुलाला इंजिनियरिंग शिकण्याची संधी जाते.' आयला, आपण या शर्यतीत मुलींकडनं हरलो हे कबूल करायचं आणि वर मुळूमुळू रडायचं! आणि आम्हाला झेपत नाही म्हणून सरकारने बंदीच आणली पाहिजे वगैरे म्हणायचं. काय वेळ आली आहे आजकालच्या पुरुषांवर! बिच्चाऱ्यांची (अशा बांगड्या भरण्यापासून) मुक्ती झालीच पाहिजे. अंडरवेअरी पेटवा म्हणावं... मग होईल मुक्ती.