Skip to main content

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा

लेखक विदेश यांनी बुधवार, 23/11/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा देवही ना जाणतो तो मुकुटचोरी जाहली मी सदा डोकावतो झोळीत माझ्या का असा मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला राव असता मान होता आदबीचा या बसा

वीर शिवाजी - कलर्स

लेखक सचिन यांनी मंगळवार, 22/11/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज चॅनेल सर्फिंग करता करता एक धक्कादायक अनुभव आला. मिपावाचकांना याविषयी सांगणे आवश्यक वाटले, किंबहुना सर्वांच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणून........... कलर्स चॅनेलवर "वीर शिवाजी" नावाची एक मालिका चालू आहे.रोज ८.३० ते ९.०० सायंकाळी. महाराजांच्या बद्दल आजपर्यंत कधीही वाचण्यात / ऐकण्यात न आलेल्या अशा अतर्क्य घटना त्यात दाखविल्या आहेत. माझ्या मते शिवचरित्राला अक्षरशः विटंबित करण्यात आले आहे. या चॅनेल द्वारे ही मालिका जगभरात प्रसारित होत असणार... उदाहरणादाखल : (१) मियां रहीम नावाच्या कुठल्याश्या खानाच्या गोटातील एक बाई शिवाजी राजांना मारायचा कट करते आहे.

अखेर

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 22/11/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी सांभाळ मुला रे सांगुन गेली आई ती प्राणपणाने लढली घन तिमिरात कष्टात गुंतली अथक राबली बाई मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही वाढता वाढता वय गढले संसारात मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... .............अज्ञात
काव्यरस

दिलीप प्रभावळकरांचा !

लेखक दिपोटी यांनी मंगळवार, 22/11/2011 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक आणि रंगभूमीला दिलेल्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार या दोन अत्यंत मानाच्या पुरस्कारांपाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते-लेखक श्री दिलीप प्रभावळकर यांना आता त्यांच्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी गेल्या सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या अभिनयकारकीर्दीचा घेतलेला हा धांडोळा ...

'पत्रिका'

लेखक किचेन यांनी मंगळवार, 22/11/2011 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
'पत्रिका' या विषयाने जेवढ माझ डोक खालालय तेवढ कोणाच खाल्लं नसणार. खर तर पत्रिका, गुणमिलन, शांती वगैरे गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही. या सर्व विषयाबद्दल माझ न्यान्ही तोकड्च आहे.पण माझ क्षेत्र अस आहे कि मला ह्याबाबत माहिती करून घ्यावी लागतीये. यात सगळ्यात जास्त वैताग आणतो तो मंगळ मंगळ,मंगळाचा प्रभाव, सौम्य मंगळ, मंगळाची शांती, आणि नागबली बद्दल मला माहिती हवी आहे. शांती केली किवा नागबळी दिला कि मंगळ जातो का? वैवाहिक जीवनात मंगळाचे दुष्परिणाम काय? मंगळ फक्त वैवाहिक बाबतीत त्रास देतो कि आणखीनही काही दुष्परिणाम आहेत? आपणास काही मंगळाचे चांगले -वाईट अनुभव आलेत काय?

धुडकी, धुडकी, धुडकी लागे...

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 22/11/2011 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
धडकी भरली ना शीर्षक वाचून? हे गाणं आहे 'मेरे ब्रदर की दुल्हन' या अविस्मरणीय चित्रपटातलं. परवा टीव्हीवर हा चित्रपट बघण्याचा योग आला. करण्यासारखे इतर काहीच नव्हते. ते तसेही कधीच नसते. म्हणजे वाटतं खूप, हे करावं, ते करावं, असं केलं तर खूप मजा येईल, तसं केलं तर जिंदगी बदल जायेगी वगैरे वगैरे पण ऐनवेळेस अस्मादिकांचा अवसानघातकी आळस आमच्या आवेशावर अगदी अलगदपणे ओकतो आणि मग आमचा अमूल्य वेळ आम्ही सोफ्यावर लोळत घालवतो. असाच मी आळसावत पडलो होतो आणि टीव्हीवर 'मेरे ब्रदर की दुल्हन' नुकताच सुरु होत असलेला पाहिला. हिट चित्रपट म्हणून बघायला सुरुवात केली.

बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय

लेखक सदानंद ठाकूर यांनी मंगळवार, 22/11/2011 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय नुकतेच रिझर्व्ह बँकेने बचत खात्यावरील व्याजाचा दर नियंत्रणमुक्त केलेला आहे, त्यानंतर यस बँकेसारख्या काही खाजगी बँकानी बचत खात्यावरील व्याज ६% पर्यंत वाढवले आहे मात्र राष्ट्रीयकृत व प्रमुख खाजगी बँकानी याबाबत काहीही धोरण जाहीर केलेले नाही. या बदलामुळे बँकांची नफाक्षमता कमी होणार असल्यामुळे या बँकानी कदाचीत वेट अँण्ड वॉच हे धोरण अवलंबलेले असावे. या बाबत या बँका निर्णय घेतील तेव्हा घेतील.