Skip to main content

स्वर्गमंडप...........खिद्रापूर !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 14/01/2012 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदीर बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्‍या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली.

फार झोप येते राव.

लेखक वारा यांनी शनिवार, 14/01/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल फार झोप येते राव. ऑफीसात आल्यावरचे पहीले दोन अडीच तास कसे तरी जातात. मग लंच टाईमची वाट बघत बसाव लागत. ईतर लोक फोन वर बरच काहीतरी बोलत असतात. मार्केटींग वाले कस्ट्मर ना पिडुन पिडुन ऑर्डर ओढायचा प्रयत्न करतात. यांची पर्सेंटेजची गणित.......आग आई आई आई.......(जांभई)... रिकव्हरीवाले पेमेंट्साठी क्लायंटला पिडतात. सपोर्ट वाले सारखे साईट वर पळत असतात . साईट वर जाऊन काय करतात काय माहीत? .. बरच मटेरीयल पाठीवर असत त्यांच्या....अरे बापरे आज चहावाला जरा लेटच आलाय....

प्राणी, पक्षी आणि निसर्ग..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 13/01/2012 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम-राम मंडळी.. म्हटलं मिपावर जरा मी काढलेले काही फोटो डकवावेत. ही छायाचित्रे वेगवेगळ्या ठीकाणी काढलेली आहेत. तसेच पिकासामध्ये एडीट करुन छायाचित्रांमध्ये थोडी छाया (शॅडो) टाकलेली आहे.. (हॅ हॅ, उगाच आपला पाचकळ इनोद..) सुरुवात करतो काझिरंगातील गेंड्यांपासुन.. थोड्या रोमँटीक मुडमध्ये होते हे सकाळी सकाळी. रात का नशा असेल.. त्यांच्या जवळच्या पाण्याकडे बरोबर पाहीलतं, तर तुम्हाला पुरुष-प्राण्यांचा रोमान्सबद्दलचा अ‍ॅटीट्युड कळून येईल..

अलिस्टर परेरा

लेखक पारा यांनी शुक्रवार, 13/01/2012 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजच वर्तमानपत्रात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. दारू पिऊन गाडी चालवून पदपथावरील ७ लोकांना मारल्याबद्दल अलिस्टर परेरा या व्यक्तीस दिलेल्या ३ वर्षांच्या शिक्षेबाबत बातमी होती. ही आणि आणि अश्या अनेक बातम्या दर महिन्याकाठी आपण वाचत असतो. म्हणजे कोण्या मोठ्या व्यक्तीच्या हातून असा काही घडलं की त्याची बातमी पहिल्या पानावर असते, बाकीच्या अश्या दुसऱ्या/तिसऱ्या पानावर येतात. लेखाचा विषय असा की ह्या माणसावर (आणि पूर्वी सलमान खानवर) जो आरोप केलेला आहे त्यात मनुष्यवधाचाही समावेश होतो. 'Culpable homicide' म्हणजे सदोष मनुष्यवध. ह्याला थोडासा आक्षेप घ्यावासा वाटतो.

" एका ठाणेकराच्या बुद्धीच ( ? ) सुट्लेल ग्रहण " ;)

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 13/01/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
( सदर धागा हा केवळ निखळ मनोरंजनासाठी आहे :) ) चू.भू.दे.घे. " एका ठाणेकराच्या बुद्धीच ( ? ) सुट्लेल ग्रहण " ;) *************** मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत. नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या.. मग कोणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते.. त्यांनी लिफ्ट उघडली तेंव्हा तू खाली पडलेला होतास.. आणि तुझ्या अंगावर ३, ४ काळी मांजर होती.. ती नंतर जिन्यातून पळून गेली . मी मान खाली घालून बसून राहिलो..

एका कल्पनेतलं जग

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 13/01/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी रात्री संगीतावर आधारलेला तो चित्रपट अगदी रंगतदार अवस्थेत होता. शाळेच्या आणि शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरची कथा असलेल्या चित्रपटातल्या त्या भागात एकूणच बदललेला काळ आणि त्या काळातली शालेय मुलांची बदललेली अभिरूची दाखवणारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता. नेहमीप्रमाणेच मी चित्रपटाचा अगदी गंभीरपणे आस्वाद घेत होतो आणि तेवढ्यात बदललेली सांगीतिक अभिरूची दर्शवताना पार्श्वभूमीवर एक गाणं वाजू लागलं आणि ते ऐकताच काळजात कुठेतरी लक्कन् हललं. तो प्रसंग आणि चित्रपट पुढे सरकला पण ते गाणं काही माझा पिच्छा सोडत नव्हतं.

(खा घास हा)

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 13/01/2012 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन हा प्रकार तसा मला जास्त आवडत नाहि .. एक चुकुन विडंबन केले होते 'खेळ मांडला' याचे.. पण करुन विडंबन नसतेच असे ऐकुन घेवुन विडंबनातील काही कळत नाही म्हनुन गप्प होतो.. आज काल श्री वल्ली महाराज चिंचवडकर यांच्या प्रेरणेने आम्हास मनाच्या विरुद्ध जावुन विडंबन करायचे सुचले आहे, त्यात सकाळीच स्पा ने एक मोरपिस फिरवल्याने लिहायला घेतले .. आता दारु न पाजता विडंबन कसे करायचे हे मात्र वल्ली महाराजांकडुन शिकले नसल्याने आम्ही भातच खायला घातला आहे.. गोड माणुन घ्या ...
काव्यरस

नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो, बेक्ड वेज अ‍ॅण्ड रोज वाइन

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 13/01/2012 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
पल्या गणपाने नुकतीच नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन नावाची एक पाककृती प्रकाशित केली होती. त्यातल्या पेप्पे चिकनला फाटा देउन त्या रेसिपीला थोडा ट्वीस्ट देउन एक 'ईंप्रोवाइज्ड' डीश मागच्या रविवारी ट्राय केली. ती डीश एकदम हीट झाली होती म्हणून शेयर करतो आहे.