Skip to main content

स्वरकिंचित

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 18/01/2012 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द एक पडला कानी उठल्या कुठल्या लहरी रानी चाळवले रुधिरामधले रण अमृतमय झाले पाणी कंठ कोरडा गहिवरला ओघळले यमुनाजळ नयनी वात कोंडला उरी हुंदका फुटला श्वासामधुनी भिजले काजळस्वप्न लोचनी उत्सव काहुर मन सदनी भेट दाट घडली स्वरकिंचित बहर पावली अवनी ............................अज्ञात
काव्यरस

कडेगावची भानामती : दुसरी बाजू

लेखक खेडूत यांनी बुधवार, 18/01/2012 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी मागच्या वीकांताला मनात विचार आला की मिपा वर काही लिहावे. पहिल्यांदा सुचलेल्या काही विषयांमध्ये हाही एक होताच पण आता तो कालबाह्य झाला असे वाटून टाळला होता, तोच......(असो!) त्यावेळी मी पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजात शिकायला असल्याने खडे प्रकरण प्रत्यक्ष पाहिले नाही पण सुट्टीत गावी आल्यावर चर्चेतून नंतर पूर्ण माहिती मिळाली. या लेखावर अर्थातच माझी मते आहेत कारण ही माझ्याच गावातली घटना आहे . सदर खडे येण्याचा प्रकार अशास्त्रीय वाटल्याने सुरुवातीला नेत्ररोग तज्ञ आणि लगेचच शंका असल्याने अंनिस लाही बोलावले गेले.

प्रेमरस

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 18/01/2012 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे पायी, गळे अभिमान इथेच निधान, कैवल्याच शब्दही निमाले, अश्रु ओघळले कैसे हे उमाळे, अंतर्यामी कारुण्य वात्सल्य, सखे तुझे प्रति प्रिती की आसक्ती, ठाव नाही एक मज ठाव, अंतरी जो भाव त्याचे नाव गाव, पुसू नको हृदयाची भाषा, न जाणे मस्तक मौन मात्र एक, प्रकटन असा हा ईश्वरीय , अनुभव सारा प्रेममरस धारा, चिंब चिंब
काव्यरस

((मिपा नवे लेखन आणि अन्य शोधतंत्र अद्याप मागासलेली का..?))

लेखक मी-सौरभ यांनी मंगळवार, 17/01/2012 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपाच्या धोरणाचा थोडासा आधार घेत आम्ही खालील शंकानिरसन करून घेऊ इच्छितो आणि त्याबाबत थोडेफार साक्षर व माहीतगार होऊ इच्छितो. जाणकारांनी कृपया प्रतिसाद देत सदर चर्चेत अवश्य भाग घ्यावा व माहिती पुरवावी ही विनंती - आजच्या घडीला सामान्य माणुस आणि अन्य सदस्य मिपावर कार्यरत आहेत. त्यामुळे टाईम पास करण्याचे आपले बरेचसे काम सुकर झाले आहे हे नाकारता येणार नाही. समजा आपल्याला डोक्याला वैताग आलेला आहे काय करावे हे माहिती नाही; आणि म्हणून आपण मिपाच्या शोधयंत्रात वल्ली हा शब्द टंकीत केला तर क्षणार्धात काही धागे, छायाचित्रांची माहिती आपल्या पुढ्यात येते.

नाती गोची

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 17/01/2012 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्या कुठे आहेस"? विरार, का ग? "अरे अनिकेत भाउजींचा साठावा वाढदिवस आहे ना. आमंत्रण आहे". किती वाजता? "आठ वाजता. स्पेशल पाणी पुरी चा कार्यक्रम आहे" येउन पोचतो. पण तु आधी जा. "गिफ्ट काय घेउ"? मला माहीत नाही. "अरे सुचव ना" घरात एक ग्लेन फिडीच आहे ना. ती देउ. "शी. साठाव्या वाढदिवसाला दारु" मग तुला काय आवडते ते दे. "येताना एक बुके घेउन ये. कार्यक्रमात मिळलेच ना. विकतचा आणु नकोस. तेवढेच वाचले. स्पेशल पाणीपुरी म्हणजे काय रे"? पाणी पुरीच्या पाण्यात थोडीशी व्होडका आणि लिम्का टाकले की झाली स्पेशल पाणी पुरी.

मसाजसेंटरसंबंधी ,माहिती हवी होती..

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 17/01/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, परिकथीय राज्यघटनेनुसार कलम ४२० (६९) डी - to feel freely allover the body चा आधार घेत नजिकच्या काळात आमचे काही कामानिमित्त मसाजसेंटरला जाणे होणार आहे. तसे पाहता खिशात पुरेसे पैसे असले म्हणजे कोणत्याही मसाजसेंटरला मसाज-रेकीची सोय होऊ शकते, परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे, या हेतूने आम्ही हा चौकशी-धागा लिहीत आहोत. चौकशी क्र १) सदाशिव पेठ रिक्षा स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या मसाजसेंटरसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे 'हिटर' मिळाल्यास बरे होईल.

मन मौज कराया उडते....

लेखक मनमौजी यांनी मंगळवार, 17/01/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी इथे नवीन आहे. हि माझी पहिलीच कविता आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा करतो... मन मौज कराया उडते.... भिरभिरणारा वारा होते... खळखळणारा ओढा होते.. दाटल्या मेघामधुनी... झरझरणार्‍या धारा होते... मन मौज कराया उडते.. किलकिलणारी पहाट होते.. सळसळणारे पाते होते... घनदाट वनराई मधले.. किलबिलणारे पक्षी होते... मन मौज कराया उडते..

गुगल, गुरुजी आणि अन्य शोधयंत्र अद्याप मागासलेली का..?

लेखक कॉमन मॅन यांनी मंगळवार, 17/01/2012 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, भारतीय संविधानाच्या कलम २१-अ - Right to education चा थोडासा आधार घेत आम्ही खालील शंकानिरसन करून घेऊ इच्छितो आणि त्याबाबत थोडेफार साक्षर व माहीतगार होऊ इच्छितो. जाणकारांनी कृपया प्रतिसाद देत सदर चर्चेत अवश्य भाग घ्यावा व माहिती पुरवावी ही विनंती - आजच्या घडीला गुगल, गुरुजी आणि अन्य अनेक शोधयंत्र आंतरजालावर कार्यरत आहेत. त्यामुळे माहिती मिळवण्याचे आपले बरेचसे काम सुकर झाले आहे हे नाकारता येणार नाही.

भक्ती........

लेखक निशदे यांनी मंगळवार, 17/01/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग, सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो || नाव घेती कोणी, कोणी धुंद होता कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो || दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी हातातील नाणी, उगीच मोजतो || पोटाचेच जिथे, रोजचे सायास कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो || उडवती नाणी, ओवाळिती नोटा सारे त्या भगवंता, लाच दाखविती || येई कोणी शेट, मागाहून पुढे देवाहून जास्ती, सलाम ठोकिती || हा परी इथे, खातो शिळेपाके, देवाच्या वाटी, साधा नमस्कार || भक्ती मनी दाटे, परी भूक लागे, पोटापुढे नसतो, मनाचा विचार || कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र कोणी आरोग्य, आयुही मागिती || सारी असली जरी, देवाचीच पोरं, एक दुजियाचा, नाशही मागिती || देव येई निघुनी,
काव्यरस

आय. एन.एस कुकरी

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 17/01/2012 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, हा लेख ९ डिसेंबरलाच लिहिला होता आणि त्या दिवशी टाकायचा विसरलो, तो आत्ता टाकत आहे.. बरोबर याच दिवशी १९७१ साली...... समुद्रात सभोवताल मृत्यूचे तांडव चालले होते. जहाज बुडताना पाण्यात ज्या मोठ्या लाटा व भोवरे उठतात त्यात माणसे गंटागळ्या खात होती. अनेक वस्तू पाण्यात भरकटत होत्या, बुडून वर येत होत्या.