Skip to main content

((मिपा नवे लेखन आणि अन्य शोधतंत्र अद्याप मागासलेली का..?))

लेखक मी-सौरभ यांनी मंगळवार, 17/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपाच्या धोरणाचा थोडासा आधार घेत आम्ही खालील शंकानिरसन करून घेऊ इच्छितो आणि त्याबाबत थोडेफार साक्षर व माहीतगार होऊ इच्छितो. जाणकारांनी कृपया प्रतिसाद देत सदर चर्चेत अवश्य भाग घ्यावा व माहिती पुरवावी ही विनंती - आजच्या घडीला सामान्य माणुस आणि अन्य सदस्य मिपावर कार्यरत आहेत. त्यामुळे टाईम पास करण्याचे आपले बरेचसे काम सुकर झाले आहे हे नाकारता येणार नाही. समजा आपल्याला डोक्याला वैताग आलेला आहे काय करावे हे माहिती नाही; आणि म्हणून आपण मिपाच्या शोधयंत्रात वल्ली हा शब्द टंकीत केला तर क्षणार्धात काही धागे, छायाचित्रांची माहिती आपल्या पुढ्यात येते. यात जगभराच्या लेण्या, किल्ले, विडंबने इत्यादी नानाविध माहितीचा खजिना आपल्यापुढे उघडला जातो. परंतु हे झाले दिलेल्या वल्ली ह्या शब्दावरून माहिती पुरवण्याचे गुगलचे / मिपाचे कसब. परंतु आमचा प्रश्न निराळाच आहे. तो असा - मिपात असे चांगले लेखन शोधता येते त्याप्रमाणे टुकार धागे टाळण्याची सोय का नाही??? आम्ही आमचा मुद्दा वरीलप्रमाणे उदाहरणाद्वारे अजून थोडा स्पष्ट करू इच्छितो. समजा आमच्या नवे लेखन पेज वर सर्व लेख उपलब्ध आहेत. परंतु कोणता चांगला कोणता टुकार हे जर आम्हाला माहीत नसेल तर मग मिपाच्या शोधयंत्रात सदर (टुकार धागे काढणार्‍या) आयडीची माहिती चढवून 'वाजवा' या पर्यायावर कळ दाबता का येऊ नये? मिपा संमं नवे लेखन त्यानुसार त्या शब्दासंबंधी जमेल तितकी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे ते असे टुकार आय डी ओळखून त्यानुसार माहिती पुरवण्यास आजच्या घडीला असमर्थ का?, हा आमचा सवाल आहे. या अनुषंगाने काही स्वाभाविक प्रश्न - १) अशा टुकार सदस्यांचा शोध घेण्याचे तंत्र अद्याप विकसितच झालेले नाही? किंबहुना तसा अद्याप विचारच झालेला नाही? २) किंवा तसे प्रयत्न सुरू आहेत? ३) किंवा या संदर्भातील तांत्रिक आव्हानांना अद्याप सारे प्रयत्नशील तंत्रज्ञ अपुरे पडत आहेत/पडले आहेत..? कृपया या विषयाबाबत येथे विषयाला अनुसरूनच विस्तृत बाजार उठावा. सुसंबद्ध प्रतिसाद देणार्‍यांना आकाशातल्या ईश्वराने तूर्तास क्षमा करावी . ता. क. - सामान्य माणूस यांसारख्या सन्माननीय मिपा सभासदांनी स्वतंत्र लेखन केल्यास तो निश्चितच एक निखळ विरंगुळ्याचा धागा ठरावा, अशी आम्हाला आशा आहे.

वाचने 2277
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

हॅहॅहॅ. भारी विडंबन. त्यात आमच्या आयडीचा उल्लेख आल्यामुळे अंमळ आश्चर्य वाटल्या गेले. विचार असाच करत आहे की आम्ही महाराष्ट्रातल्या काहीच लेण्या पाहिल्या असल्या तरी जगभरच्या लेण्या आमच्या नावापुढे कशा काय दिसतात ब्वा. (गहन विचार करणार्‍या स्माइलीसाठी कॉलिंग अत्रुप्त आत्मा)

In reply to by प्रचेतस

विडंबन ही एक कला आहे .. म्हनुन कलादालनात हे विडंबन आल्यास आश्चर्य नक्कीच वाटले नसते.. बाकी वल्ली, काय माहित बॉ .. येत असतील .. ( गहने का विचार करणारी स्मायली.. कॉलींग आत्माची त्रुप्ती )

In reply to by गणेशा

@(गहने का विचार करणारी स्मायली.. कॉलींग आत्माची त्रुप्ती )>>> ही कोण बाबा त्रुप्ती..? मला कशी नै कळ्ळी आजपर्यंत..?

In reply to by प्रचेतस

(गहन विचार करणार्‍या स्माइलीसाठी कॉलिंग अत्रुप्त आत्मा)>>> >>> हि घ्या आणी लावा हवी तिथं--- आणी हा अजुन एक ऑप्शन---

तुम्हीच शोधा! आणि आमचं काम जरा सोपं करा. बक्षीस म्हणून "भावी संपादक" म्हणून तुमची शिफारस करण्यात येईल!! :D
(टुकार धागे काढणार्‍या) आयडीची माहिती चढवून 'वाजवा' या पर्यायावर कळ दाबता का येऊ नये?
फारच आवडलं.
१) अशा टुकार सदस्यांचा शोध घेण्याचे तंत्र अद्याप विकसितच झालेले नाही? किंबहुना तसा अद्याप विचारच झालेला नाही? २) किंवा तसे प्रयत्न सुरू आहेत? ३) किंवा या संदर्भातील तांत्रिक आव्हानांना अद्याप सारे प्रयत्नशील तंत्रज्ञ अपुरे पडत आहेत/पडले आहेत..?
अत्यंत संवेदनाशील विषय असल्याने गोपनीय माहिती उघड करता येणार नाही!!! :D

In reply to by पैसा

बक्षीस म्हणून "भावी संपादक" म्हणून तुमची शिफारस करण्यात येईल!!
आतापासून वाचनमात्र रहावे लागणार असे दिसतयं.....

मिपाचे शोधयंत्र गंडलेले आहे खरे! ते वापरून आजवर काही सापडलेलं नाही... (त्याने मला फारसा फरक पडला असं नाही पण वाहत्या गंगेत हात घुवून घेतले... बाकी विडंबन चालू द्या ;) )

खुप छान विडंबन आवडले आहे!