Skip to main content

ती

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 29/03/2012 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांचे मला माहीत नाही, पण मला ती फारच हवीहवीशी वाटते. तिच्यात काय आहे एवढे? अहो, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडली पाहिजे असे कुठे आहे? मला मात्र ती आवडते. विशिष्ट वेळ झाली, संकेत झाला की मला तिच्या येण्याचे वेध लागतात. मन अनावर होते. शरीर बंड करू लागते. अर्थात, मी काही तिला मोबाईल उचलून हाक घालत नाही. केवळ तशी प्रथा नाही म्हणून. एरव्ही तेही आवडले असते. तिचे वर्णनच करायचे झाले तर फार बहारीचे होईल. मात्र हल्ली इंग्लिशमध्ये जर वर्णन केले नाही तर त्याला फारशी 'व्हॅल्यू' नसते.

व्युत्क्रमी परिकर्म

लेखक निनाद यांनी गुरुवार, 29/03/2012 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
व्युत्क्रमी परिकर्म स्वयं-संतुलन कच्चीजप्ती शंकुचाचणी अवसीदन। मिथ्या शस्त्रक्रिया स्व-विमोची रूपद बीजगुणन॥ दुय्यम उघाड दोलनलेखी मळसूत्रउत्परिवर्तन। वालुकाश्मी भित्ति बीज चाचणी अपवाहचक्रन॥ वैतनिकपद व्युत्क्रमी परिकर्म सदापदावर्तन। स्थूनांकन दोष अपवाह गुणांक वनसंशोधन॥ प्रतिवेदक अधिकारीसंचय वायु पुनर्मूल्यन। लालसावर प्रारणप्रतिक्षेप परिपथ प्रत्यावर्तन॥

दाबेली

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 29/03/2012 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य दाबेली मसाला: ४ बटाटे उकडून , कुस्करून घेणे १-१/२ कांदा बारीक चिरून १ टीस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) एक ते दीड टेस्पून दाबेली मसाला (बाजारात सहज उपलब्ध आहे , नाही मिळाल्यास : २-३ लाल-सुक्या मिरच्या + २-३ दालचिनीच्या काड्या + ३-४ लवंगा + १ /२ चमचा धणे + १/२ चमचा बडीशेप + १/२ चमचा काळीमिरी + १ चक्रीफुल + १ तमालपत्र , सगळं कोरडचं भाजून मिक्सरवर वाटून बारीक पावडर करावी.)

नजरा

लेखक रेशा यांनी बुधवार, 28/03/2012 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
तो झोपेतच यंत्रवत पावले टाकणारा, तेल लावून चापून पाडलेला भांग, गळ्यात अडकवलेली water bag , आईच्या खांद्यावर त्याचे दप्तर , बेफिकीरपणे आई बरोबर पडणार्‍या पावलांत बूट, अंगात uniform , गळ्याला टाय.. आणि रोजचाच प्रश्न आज डब्याला काय? ,... बस stop वर तो आई बरोबर उभा !! आणि तो बस stop च्या समोरच्या parking lot वर, अंगात half pant , आणि फाटलेला बनियन, चपला वैगरे चैन त्याला परवडण्यातली नव्हतीच, हातात फडका, लोकांच्या कार पुसत तो एकटा उभा ,... त्यांची नजरा नजर होते: एक नजर बेफिकीर, झोपाळू,घाबरी आणि शाळेत सकाळी जायचे म्हणून काहीशी वैतागलेली,,..

माझी अधुरी कविता

लेखक रसप यांनी बुधवार, 28/03/2012 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी जपली जीवनभर जी वसने सारी ती विरली ओसाड शून्य नजरेच्या स्वप्नांची चौकट झिजली भुरभुर कापूस धुक्याचा चौफेर पसरला आता रस्ताही संपुन गेला ह्या वळणावरती येता काजळल्या क्षितिजापाशी नि:शब्द गुंतली किरणे श्वासांना अवजड झाले श्वासांचे ओझे बनणे माझ्यामागे शब्दांचे उद्विग्न उसासे काही त्या शेवटच्या पानावर गवसेल सांडली शाई तू नकोस माझ्यासाठी थेंबातुन वाहुन जाऊ माझ्या अधुऱ्या कवितेने तू नकोस भारुन जाऊ ....रसप.... http://www.ranjeetparadkar.com/2012/01/blog-post_30.html
काव्यरस

कृष्ण आणि कर्ण

लेखक स्वानंद वागळे यांनी बुधवार, 28/03/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही. याच कादंबरीने लोकांना महाभारत ये एका महान ग्रंथाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पहाण्यास प्रवृत्त केले. कर्ण किती महान होता हे याच पुस्तकामुळे लोकांना कळू शकले. आयुष्यभर अवहेलना सोसणाऱ्या कर्णासाठी, वाचताना नकळतच एक आदराची जागा आपल्या मनात बनते. एवढा दानशूर असूनदेखील भगवंत कृष्ण त्याचाशी एवढे निर्दयीपणे का वागले? नको नको म्हणत असताना देखील त्यांनी अर्जुनाला नि:शस्त्र कर्णावर बाण चालवण्यावस का भाग पाडले असेल? पु. ल.

दु:खचा महाकवी ग्रेस

लेखक स्वानंद वागळे यांनी बुधवार, 28/03/2012 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेत काव्य प्रकारात विपुल साहित्या निर्मिती झाली आहे. गेली २०-२५ वर्षात जे कवी झाले किंवा आधीपासून होते त्यांना आपण ढोबळ मानाने २ प्रकारात वीभागु शकतो. एक मुख्य प्रवाहातले आणि दुसरे मुख्य प्रवाहातून वेगळे असलेले. या दुसर्‍या प्रकारच्या कवींना फार प्रसिद्धी लाभली नाही पण जे त्यांचे चाहते आहेत ते अत्यंत निस्सीम आणि निष्ठावान चाहते आणि रसिक आहेत.

बीज अंकुरे अंकुरे.... (अष्टाक्षरी)

लेखक वेणू यांनी बुधवार, 28/03/2012 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
बीज अंकुरे अंकुरे रुपं नव्हाळ मातीला, गर्भारता देह तिचा रंग केतकी कांतीला! बीज अंकुरे अंकुरे माझे स्वप्न तुझ्या डोळा, सूर ल्याले रे तुझे मी शब्द शब्द झाला खुळा... बीज अंकुरे अंकुरे जमिनीला लागे ध्यास, वाढ वाढावे गं रोप नको आभास आभास... बीज अंकुरे अंकुरे आता स्वप्नांना आकार, उद्या उमलेल पातं घरी बहार बहार.. बीज अंकुरे अंकुरे म्हणे करा तपासणी, जर देशी वंशा दिवा आकाशास गवसणी! बीज अंकुरे अंकुरे, का हा वणवा पेटला? नवा जन्म रुजताना कुणी गळा गं घोटिला? -बागेश्री ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : http://venusahitya.blogspot.com/

प्रोफाईल

लेखक रसप यांनी बुधवार, 28/03/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
ती नाहीये.. माहितेय.. पण मला तिच्या प्रोफाईलला फ्रेंड म्हणून ॲड करायचंय ती काहीच बोलणार नाहीये, लिहिणार नाहीये मला माहितेय पण मला तिच्या शांततेला 'लाईक' करायचंय ती येणार नाही..
काव्यरस