Skip to main content

वितंडगड (तिकोना) - भाग १

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 08/06/2012 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
लोहगडावरून नेहमी खुणवणारा तिकोना मागच्या वर्षी राहून गेला होता, पण काल योग होता, अगदी मागच्याच रवीवारी राजमाचीची सफर झाली असल्यामुळे शरीर जरी थकलेले होते तरी तिकोना म्हणाल्या म्हणाल्या परत शरीरात उत्साह संचारला व सकाळ सकाळीच स्वामी व मी बाईक वरून तिकोनाकडे वाटचाल चालू केली. इ.स.१६५७ मध्ये शिवाजीराजेंनी हा गड आपल्या साम्राज्यात घेतला, व नेताजी पालकर (इ.स.१६६०) येथील सर्वेसर्वा होते. या गडाची निर्मिती व त्याचा गतकाळासंबधात काहीच माहीती उपलब्ध नाही असे दिसते आहे. समोर तुंग तर, उजवीकडे दिसणारे लोहगड आणि विसापूर! व मध्ये पवनाचा भलामोठा जलाशय!

शैक्षणिक कर्जाविषयी एक अनुभव

लेखक जोयबोय यांनी शुक्रवार, 08/06/2012 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी इंजिनीअरींग प्रवेश घेतानची गोष्ट आहे. त्यावेळी शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मी सरकारी बँकेत शैक्षणिक कर्जाविषयी माहिती घेण्याकरिता गेलो. बँकेच्या कर्ज प्रतिनीधीने मला कर्ज देनार नाही असे सांगितले. कारण विचारले असता त्याने एक वाक्य सांगितले की जे आजही मनवरती बिंबुन आहे. तो म्हनाला "शेतकर्याच्या मुलाला आम्ही कर्ज देउ शकत नाही" हा आमचा अलिखीत ठराव आहे मी सदर अधीकारयाची तक्रार मॅनेजरला केली . पुन्हा तेच पालूपद. शेवटी जमीन गहाण ठेउन सावकाराकडुन कर्ज काढले आणि शिक्षण पूर्ण केले. याला काही उपाय आहेत का की ज्याने या लोकाना काही धडा शिकवता येईल?

Near Death Experience.. अनुभवलाय कधी..?

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 08/06/2012 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
______________________________________ Dyatlov Pass आणि सध्याचे कांही धागे वाचून सुचलेला विषय.. ______________________________________ शनिवार, २७ मार्च २०१०, कोर्टयार्ड मॅरीयॉट, हिंजवडी. प्रत्येक महिन्यातून (पूर्ण) दोन दिवस चालणारी क्लायंट मिटींग नेहमीपणे सकाळी सुरू झाली. मागच्या महिन्याचा प्रोजेक्ट परफॉमन्स, रीजनल परफॉमन्स, पुढची टारगेट्स वगैरे नेहमीचे विषय रवंथ करत करत एकदाचे रात्रीचे आठ वाजले व मिटींग संपली. कॉकटेल / मॉकटेल प्रकार सुरू झाले.

गणेश गुणाकार (वैदिक गणितातील दोन संख्यांचा गुणाकार करायची एक सोपी पद्धत)

लेखक Pearl यांनी शुक्रवार, 08/06/2012 02:41 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी, शाळेत असताना एक शिक्षक आम्हाला वैदिक गणित शिकवायचे. त्यात गणित सोडवायच्या सोप्या सोप्या पद्धती दिल्या असायच्या. इंटरेस्टिंग होतं वैदिक गणित. तर मला त्यातली दोन संख्यांचा गुणाकार करण्याची एक पद्धत आवडायची. त्याचं नाव आहे 'गणेश गुणाकार'. दोन कितीही आकडी संख्यांचा गुणाकार या खूप सोप्या पद्धतीने खूप जलद करता येतो. तर पाहूया कसा करायचा हा गणेश गुणाकार. (माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

मुक्त मी!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 08/06/2012 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
"जग म्हणजे तुमचा शिंपला आहे! प्रयत्न कराल तर तुम्हाला हवे तसे मोती तुम्ही त्यातून काढू शकाल." शाळेच्या दीक्षान्त समारंभाच्या वेळी आमच्या मुख्याध्यापिका हे वाक्य म्हणाल्या, असं की जणू काही हे शेक्सपियरचं नव्हे, त्यांचं स्वत:चं वाक्य होतं. तिथे बसून ते ऐकतांना मला त्यांची कीव वाटली. पण आजकाल मला त्यांची कीव नाही येत, माझी स्वत:ची येते, माझं जग माझा शिंपला नाही झालं. आयुष्य खेकड्यासारखं झालंय, थोडं चुकीच्या दिशेने पकडलं की चावतंय, आणि मग खूप ठणकून दुखतं. ते दीक्षान्त समारंभाचं भाषण वर्षापूर्वी झालं.

<'पोचलेला' गुरू कोणता घ्यावा?>

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 07/06/2012 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
यावेळेस दोन दोन कच्चे माल आहेत!!! क्या बात है!! सर्व संबंधितांना ह. घ्या ही विनंती... :) तर, 'पोचलेला' गुरू कोणता घ्यावा? कुंडालिनीची वळवळ आणि उर्ध्वरेतन ही फंक्शन नीट चालावीत. बाकी योगासने-नौलीचा फारसा वापर होणार नाही. (आमचं वय लक्षात घेता) गांजाची धुनी मात्र धुमसती हवी.. मराठी संस्थळांवर बरेच रिव्हू वाचले, श्रामो-बिकांना विचारले.... त्यानी सांगितले, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ! (आता हे आपल्याला कुठले मिळायला?

भिकार शिणेमे आणि त्यांचे निष्टावंत प्रेक्षक

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी गुरुवार, 07/06/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
@जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं तुमच्यासारखी अनेक तरुण ह्या सिनेमांचे प्रमुख ग्राहक आहेत.( म्हणजे निर्मात्याच्या पैसा वसूल होण्यासाठी खारीचा वाटा उचलणारे ) बोर झाल्यावर आजूबाजूच्या जमावाला क दर्जाचे लेहून आपण मिपावर लिहितो बहुदा ह्या एका निकषावर स्वतःला उच्च अ दर्जाचे समजायचे. व मग रावडी राठोड सारखा शिणेमा रीतसर पहायचा. मग आमच्यावर उपकार केल्याच्या थाटात तो शिणेमा किती म्हणजे किती वाईट आहे. ह्याबद्दल समीक्षा करायची. तुम्ही तुमच्या सारखे अनेक जण कार्यालयात पकतात.