Skip to main content

Near Death Experience.. अनुभवलाय कधी..?

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 08/06/2012 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
______________________________________ Dyatlov Pass आणि सध्याचे कांही धागे वाचून सुचलेला विषय.. ______________________________________ शनिवार, २७ मार्च २०१०, कोर्टयार्ड मॅरीयॉट, हिंजवडी. प्रत्येक महिन्यातून (पूर्ण) दोन दिवस चालणारी क्लायंट मिटींग नेहमीपणे सकाळी सुरू झाली. मागच्या महिन्याचा प्रोजेक्ट परफॉमन्स, रीजनल परफॉमन्स, पुढची टारगेट्स वगैरे नेहमीचे विषय रवंथ करत करत एकदाचे रात्रीचे आठ वाजले व मिटींग संपली. कॉकटेल / मॉकटेल प्रकार सुरू झाले. रंगलेल्या गप्पा ऐकत शांतपणे एखाद्या मॉकटेलचा आस्वाद घेण्यातला आनंद वेगळाच! अचानक टूम निघाली, ई स्क्वेयरला रात्री ११:३० च्या शो ला जायचे, बहुदा Terminator Salvation असावा. हो नाही करत ६ जण तयार झाले, एका उत्साही मॅनेजरने लगेचच बहुतेक फोनवरून बुकींग केले व आम्ही गडबडीने जेवणाकडे मोर्चा वळवला. जेवण आवरतानाच कसे जायचे व कुणाच्या गाड्या घ्यायच्या वगैरे बोलणे झाले. निष्कर्ष काय निघाला तर सहा जणांसाठी चार चारचाकी पळवायच्या.. माझी दुचाकी वेगळीच. रूमजवळच सोयीच्या ठिकाणी माझी गाडी पार्क करून मी एका कारमध्ये बसलो. आम्ही ५० / ६० च्या वेगाने चाललो होतो, पस्तीशीचा कलीग कार व्यवस्थीत चालवत होता. एका वळणावर अचानक काहीतरी चुकले आणि क्षणार्धात आम्ही समोरून वाहने येणार्‍या लेनमध्ये आलो.. सावरायचा वेळ मिळालाच नाही. टाटाची मोठ्ठी बस समोरून येत होती.. आमच्या दिशेने.. आमच्या इतक्याच वेगात. पुढचा क्षण अन् क्षण लख्ख आठवतो... पहिले दिसले दोन प्रखर हेडलाईट, रेडीएटर समोरची जा़ळी, ब्रेकचा कचकचाट, शेजारून कानावर आलेला फ* आणि मो S S S ठ्ठा आवाज. Head On क्रॅश. कारच्या सर्व संरक्षण उपकरणांनी वेळेवर व व्यवस्थीत काम करून आम्हाला ओरखडाही पडून दिला नव्हता. दोघेही ठणठणीत होतो. खाली उतरून आणखी एकदा खात्री करून घेतली. गाडीचे बरेच नुकसान झाले होते पण एका बाजूने धडक झाल्याने गाडी सुरू होत होती व गुरगुरत पुढे जावू शकत होती. बसवाला पळून गेला होता. पोलीस, पंचनामा वगैरे कटकट नको म्हणून आम्हीही गाडी जवळच एका सुरक्षीत ठिकाणी लावली, माझ्या दुचाकीपर्यंत पायपीट केली व तिथून ११:३० चा शो गाठला. आजही गाडीचा वेग वाढवताना ते दोन प्रखर हेडलाईट आठवतात. ______________________________________ तुमच्याही आयुष्यात असे काही अनुभव असतील तर येवूद्या, लिहीताना निगेटीव्ह वाटेल, Depressing वाटेल पण लिहा. त्यातून घेतलेल्या धड्यासकट लिहीले तर उत्तमच. ______________________________________
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10853
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

बाब्बौ!! मी एकदा चालत्या पीएमटीतुन डायव्हरने कचाक्कन ब्रेक मारल्याने चाकाजवळच पडले होते. पण कैच वाटलं नै बॉ! डायवर कंडक्टर हास्पिटलात नेउ म्हणले तर मी नको म्हणुन तशीच चालत घरी गेले. एवढाच काय तो आन्भव! नै म्हणायला मुंबईत लोकलने अन भरलेल्या बशीनी प्रचंड प्रवास केलेला आहे. आयुष्यच अळणी मेलं..म्हणुन मिपा जॉइन केलं.

भयानक .... मला स्कूटी चालवताना असाच भयानक मोठा ट्रक अगदि कानाच्याक्जवळुन गेल्याचं अजुन आठवतं ... भयान परिस्थिती होते ,नंतरचे १० मिनिट फक्त कानातुन गरम वाफा, छातीतलि धडधड आणी डोळ्यापूढे क्षणभरापूर्वी आपलाच आपल्याला दिसलेला शेवट .... तेव्हापासुन हायवेला चालवताना कधीच ट्रक , टेम्पो, बस ह्या वाहनाच्या मागे , पूढे , बाजुने गाडी चालवली नाहि . :(

एका नाईट ट्रेकच्यावेळी, विदाऊट रोप कड्यावरून चढायचा शहाणपणा केला होता, त्यावेळी दहा -बारा फूटावरून दगडावर पडलो होतो, पण शक्यता असूनही विशेष काही लागलं नाही, दहा मिनीट तसाच पडून राहिलो होतो, नंतर बोंब मारली :)

गाडी कोणती होती तेही लिहावे म्हणजे यापुढे मिपासदस्य तीच गाडी विकत घेतील व कोणती गाडी घेऊ यासारखे धागे येणार नाहीत. ;) पूर्वी एका 'थांबा' या लाल चिन्हाला न जुमानता आलेल्या डॉज ट्रकने माझ्या कारला धडक मारली होती. मेला बर्गर खात गाडी चालवत होता. नंतर माझी विचारपूस करायला उतरून आला होता. गाडी तर गेलीच पण त्याच्याशी भांडायला न मिळाल्याने धुमसत राहिले. घरापासून एकच चौक पुढे असल्याने नवर्‍याला फोनवून बोलावून घेतले. तोपर्यंत कोणीतरी ९११ डायल केल्याने पोलीस, फायरट्रक, अ‍ॅमब्युलन्स येऊन उभे राहिले. साधारण पाचेक मिनिटे थरथरत होते. आपल्या आईसाठी पोलीस गाडीवर दिवे लावून आलेत याचा मुलाला (त्यावेळच्या वयानुसार) फार अभिमान होता. पोलीसाचे काम झाल्यावर (व गाडी उचलून नेल्यावर) लगेच नवर्‍याची गाडी चालवायला सुरुवात केली. त्यावेळी तसे केले नसते तर पुढे बरेच दिवस भीती वाटत राहिली असती. नंतर प्रत्येकवेळी चौकातून जाताना मुलगा झाल्याप्रसंगाची आठवण करून द्यायचा. त्याला सांगितले की आईला असे ऐकून वाईट वाटते तर तू तसे बोलू नकोस. त्यानंतर त्याने त्याच ठिकाणाहून जाताना चारपाचवेळा , आई, इथून जाताना अ‍ॅक्सिडेंटची आठवण करून द्यायची नाही, तुला वाईट वाटते हे मला माहितिये." असे म्हणून झाले. दोन दिवसांनी जाऊन गाडीतल्या सगळ्या सिड्या, कारसीट, मुलाची काही खेळणी इ. घेऊन आले. येताना मात्र बरेच रडू आले. इंश्युरन्स कं. ने सगळे पैसे नीट दिले.

In reply to by रेवती

केस का ठोकली नै ?? :-o वन मिलियन चा दावा करायचाना .. आयुश्यात कधी बर्गर खाल्ला नसता त्या ' मेल्याने ' ;)

..त्यानंतर त्याने त्याच ठिकाणाहून जाताना चारपाचवेळा , आई, इथून जाताना अ‍ॅक्सिडेंटची आठवण करून द्यायची नाही, तुला वाईट वाटते हे मला माहितिये." असे म्हणून झाले.... मुलगा तुझ्यावर गेलाय ना रेवा?

>>त्यातून घेतलेल्या धड्यासकट लिहीले तर उत्तमच.>> आई शप्पथ ! मला धडे आजिबात नाही आवडत, मला कविता घडतात. ते राहु दे. तुमचा अनुभव एकदम भारी. काय असत, असल काही घडताना अंगाला खरचटही न पडता बाहेर निघण मुष्किल. पण तुम्ही बचावलात. आता त्या दिवशीच वाढदिवस करत जा.

Near Death Experience.. अनुभवलाय कधी..? होय. एकदा बायकोचा वाढदिवस विसरलो होतो. त्यातून घेतलेल्या धड्यासकट लिहीले तर उत्तमच. आता बायकोचा आणि लग्नाचा वाढदिवस ह्या दोन्ही तारखांचे, भ्रमणध्वनीमध्ये, गजर लाऊन ठेवले आहेत. असो. एकदा एक मार्गिका (सिंगल लेन) रस्त्यावर एका अवजड वाहनाला ओलांडून जाताना पुढच्या वळणावर माझ्या गाडीपेक्षा मोठ्ठी गाडी समोरून येताना दिसली. मी वेग वाढवायचा प्रयत्न केला पण माझी गाडी जुनी असल्याने जोर पकडेना. शेजारच्या अवजड वाहनाच्या चालकाच्या लक्षात माझी समस्या आल्याने त्याने ब्रेक लावून त्याचा वेग कमी केला पण दुर्दैवाने मी त्याच वेळी त्याला ओलांडायचा विचार सोडून, ब्रेक लावून, माझ्या गाडीचाही वेग कमी केला आणि दोन्ही गाड्या समांतरच राहील्या आणि मला मार्गिका बदलता येईना. इथे, माझ्या आणि समोरच्या गाडीतले अंतर झपाट्याने कमी होत होते परंतु, प्रसंगावधान राखुन शेजारच्या त्या अवजड वाहनाच्या चालकाने ताबडतोब त्याच्या वाहनाचा वेग वाढवून मला जागा करून दिली आणि मी झटकन पुन्हा माझ्या मार्गिकेत (लेन मध्ये) आलो. शेजारून ती, विरुद्ध दिशेने येणारी, गाडी झप्पकन निघून गेली. मी कशीबशी माझी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन उभी केली. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं पायात प्राण राहिले नाहीत असं वाटत होतं. मला धड उभंही राहता येईना. काही मिनिटांनंतर सावरलो. शेजारच्या आसनावर धर्मपत्नी बसली होती मागच्या आसनावर एकुलता एक मुलगा. अर्थात, त्या दोघांनीही किंचाळून व्यवस्थित गोंधळ घातला होताच पण 'त्या' अवजड वाहनाच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे, आज मिपावर हे टंकायला, वाचलो. नवशिकेपणाच्या काळातच ह्या प्रसंगाला सामोरे जावे लागले (आणि वाचलो) त्यामुळे आता समोरील वाहन ओलांडताना, तो प्रसंग आठवून, नेहमी जास्त काळजी घेतो.

In reply to by शिल्पा ब

त्याच्याही पुढचा प्रकार. ट्रेलर होता तो. मनाने चांगला आणि मुख्य म्हणजे 'अनुभवी' होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

असंच एक धाडस / मुर्खपणा केलेला आहे, आम्ही पुण्याकडुन साता-याकडे चाललो होतो, खंबाटकी घाट बंद असल्यानं, बोगद्यातुन दुहेरी वाहतुक केली होती. म्हणजे नेहमीच्या एकेरी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेनं. हा बोगदा एक तर कसाबसा अडीच लेनचा आहे. बोगद्यात कधीही ओव्हरटेक करु नये, हा साधा नियम. त्यात काही नविन नाही. पण बोगदा संपता संपता समोरच्या ट्रकला ओव्हरटेक करायला घेतला, वेग ६५ किमि, चवथा गिअर, दुसरी चुक, ओव्हरटेक करताना गिअर बदलला, तो मधला एक क्षण गाडी न्युट्रल मध्ये, आणि त्याच क्षणी बोगदा संपताना अशी अवस्था झाली होती, | /\_____/\ /\__/\ \/__\/ | ट्रक आम्ही इंडिगो बोगद्याची भिंत आणि ट्रक आणि माझ्या गाडीत १ इंचाचं अंतर होतं, तर गाड्या पास होताना, माझ्या अन इंडिगोचा आरसा एकमेकाला धडकला, तुटले नाही पण वाकडे झाले. बोगद्यातुन बाहेर पडलो, बहुधा इंडिगोवाला बोगद्याच्या भिंतीला धडकला असेल अशी भिती म्हणुन वेग कमी न करता पुढं निघुन आलो, जवळपास १४ किमि नंतर गाडी थांबवली. आई, बायकोच्या शिव्या खाल्या, पाणी पिलं. मला समोरुन येणारी गाडी दिसत होती आणि ती टाळायची होती, टाळेन याची खात्री होती. पण डाव्या बाजुला आई आणि बायको बसल्या होत्या, त्यांना फक्त ट्रकचे टायर दिसत असणार याची कल्पना करुन आज सुद्धा झोप येत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

खरतर हा माझ्यासाठी नव्हे तर माझ्या बरोबर त्या दिवशी गाडीत असलेल्यांचा अनुभव असेल. ३-४ वर्षांपुर्वी घरच्यांबरोबर गावी गेलो होतो तेव्हाची गोष्ट. गेल्यानंतर असच सर्वांना (आई, बाबा, मोठा भाउ, वहीनी आणी पुतण्या) घेवुन कुठेतरी निघालो होतो (आता आठवत नाही कुठे ते). रस्ता एकमार्गी होता आणी पुढे एक ट्रक चाललेला, मला त्याला ओव्हरटेक करायचा होता, शक्यतो मी वळणावर ओव्हरटेक करत नाही, पण त्या दिवशी करायला घेतला (कदाचीत त्या रस्त्यावर वर्द्ळ कमी होती म्हणुन). छोटसच वळण होत, पण ट्रकच्या अर्ध्यापर्यंत आलो तेव्हा समोरुन येणारी एसटी दिसली आणी ति खुपच जवळ आली होती. ट्रकच्या पुढे किंवा मागे येण जमणार नव्हत. तेव्हा अचानक एका मित्राचा सल्ला आठवला 'ओव्हरटेकच जजमेंट चुकल कि गाडी तिथल्या तिथ थांबवायची'. कच्चकचुन ब्रेक मारुन गाडी थांबवली. एसटी वाल्यानी पण ब्रेक मारला, आणी मला ठोकु नये म्हणुन त्याच्या बाजुन एसटी रस्त्याच्या खालती उतरवली. एसटी चालकाच दार माझ्या गाडीच्या मधल्या दरवाज्यापर्यंत आल होत, त्यानी दार उघडुन माझा उध्दार करायला सुरु केल आणि त्याच वेळी बाजुला बसलेल्या बाबांचा माझ्या कानाखाली द्यायला उठलेला हात कान सोडुन खांद्यावर आपटला. तोपर्यंत बाजुचा ट्रक गेला होता, पटकन पहिला गियर टाकला आणी निघालो तिथुन. नंतर बर्‍याच शिव्या पडल्या....

In reply to by टुकुल

तेव्हा अचानक एका मित्राचा सल्ला आठवला 'ओव्हरटेकच जजमेंट चुकल कि गाडी तिथल्या तिथ थांबवायची'. अत्यंत चुकीचा सल्ला आहे. त्या दिवशी नशिबाने वाचलात पण समोरुन भरधाव येणार्‍या वाहना समोर निश्चल उभे राहणे म्हणजे आत्महत्याच म्हणायची. ट्रकच्या पुढे किंवा मागे येण जमणार नव्हत. पुढे जाणं शक्य नसल्याचं समजू शकतं पण मागे येणं जमण्यासारखं का नव्हतं? ट्रकला पुढे जाऊ देऊन परत आपल्या मार्गिकेत येणे हेच सुरक्षित. ट्रकच्या मागे दुसरे वाहन असेल तर आपण इंडिकेटर टाकला की त्याला परिस्थितीचे भान येऊन तो आपल्याला जागा करून देतोच देतो. वळणावर एखादे वाहन ओलांडण्याचा प्रयत्न कधीच करू नका. रस्ता खात्रीशीररित्या रिकामा असला तरीही. मीही तीच चुक केली होती.

In reply to by टुकुल

तेव्हा अचानक एका मित्राचा सल्ला आठवला 'ओव्हरटेकच जजमेंट चुकल कि गाडी तिथल्या तिथ थांबवायची'. - भयाण मुर्खपणाचा सल्ला सल्ला, दहा पैकी नौ वेळा फक्त आत्महत्या आणि दुस-या दिवशी पेपरमध्ये बातमी यापेक्षा जास्त काही होत नाही असं केल्यानं. फक्त तुमचं नशीब म्हणुन वाचलात त्या दिवशी, लोकहितार्थ सांगतो, शक्य असेल तर गाडी रिव्हर्स करा आणि मागं घ्या पण ओव्हरटेक करताना, थांबणे कधीही करु नका.

In reply to by ५० फक्त

बरोबर आहे... एकदा माझेही ओव्हरटेकच जजमेंट चुकले होते. नवीन पल्सर हातात होती आणि रिकामा रस्ता समोर होता, मग काय... थोड्या अंतरानंतर समोर एक ऊस वाहतूकीची पूर्ण भरलेली बैलगाडी होती आणि.. सहसा करत नाही पण त्या दिवशी कानात वारे शिरल्यासारखा ब्लाईंड ओव्हरटेक करायला गेलो. गाडी लेनच्या बाहेर काढली, समोरे एका मागोमाग एक ८ ते १० बैलगाड्या.. काही कळेपर्यंत २ / ३ मागे पण पडल्या आणि धास्सकन एक टेंपो समोर आला. स्पीड गडबडीने कमी करून, एक बैल आणि त्याच्या पुढची गाडी यांच्यामध्ये कशीबशी माझी गाडी बसवली आणि वेळ मारून नेली. मागचा बैलगाडी वाला चाबूक उगारून दंगा करायला लागला होता. माझ्या गाढवपणाची शिक्षा मागे बसलेल्या मित्राला भोगावी लागेपर्यंत गाडी पुढे काढली. ;-) कंटेनरच्या मागे असलेल्या "Long Vehicle" च्या पाटीचे महत्व त्या दिवशी कळाले.

२-३ वेळा लोकल ट्रेन मधुन पडता पडता वाचलो होतो.

In reply to by सहज

सालं, पोरगं यड का खुळं म्हणायचं? लोकलच्या दरवाज्यावर एकदम माकडासारखं झाडावरून उड्या मारावं असं बागडतयं. हे असलं बघून अजुन ४-५ जणांनी हातपाय मोडून नाही घेतले म्हणजे मिळवलं.

आहेत सगळे अनुभव!!! म्हणूनच... दुचाकी असून, कामावर कंपनी बसनेच जातो. (घाबरट) सुमीत भातखंडे

मला भरपुर आहेत असे अनुभव..आठवून आठवून लिहावे लागतील एकदा. आणि मला तरी त्यात निगेटीव्ह वैग्रे काही वाटत नाही.

In reply to by गणामास्तर

मग लिहा की मास्तर... आणि फक्त अपघातच नव्हे, स्वत:चे किस्से नव्हे.. तर समोर घडलेली एखादी घटना ज्यामुळे आपली झोप उडाली असेही क्षण असतील तर येवूदेत.

मला असे बरेच अनुभव आहेत....म्हणे हातावर बर्याच रेषा आहेत . त्यामुळे पत्रिकेतच तसे आहे...काय ते देवालाच ठाऊक...

लहानपणी एकदा असाच 3D एक्शन चित्रपट बघण्यास गेलो होतो. कोणीतरी विमानातून मोठ्ठ मिसाईल सोडलं. वाटलं कि खपलोच आता. अंगावर आलं कि हो ते! धडा - 3D चित्रपट जास्त मनावर घेऊ नयेत

मोदका, तुला खाणे ( किंवा सारखे तुझे डोके खाणे ) कुणा तिच्या नशीबात आहे म्हणून तू वाचलास ! पेठकर काका, दुबईत आपले सुग्रास पदार्थ लोकानी खाऊन पैसे देऊन वर " अन्नदाता सुखी भव " म्हणावे म्हणून तुम्ही वाचलात ! पन्नास राव, जगातील सर्व हॉटेलाना " हुकमाचे" खाउ गिर्‍हाईक मिळावे म्हणून तुम्ही वाचलात! निष्कर्ष -- खाणे आणि जीव वाचणे याचा थेट व थोर संबध आहे. सबब वल्ली, गणामास्तर ,नादखुळा, पंकज क्षीरसागर या खादाडानी आपण वाचलो असल्याचे येथे कळवून आमच्या निष्कर्षास पाठबळ द्यावे .

In reply to by चौकटराजा

मी स्वतः कमीत कमी १० वेळा तरी वाचलो आहे. १) m80 वर वरंधा घाटातुन वरती येताना अचानक गाडीचा दिवा गेला आणि समोरुन अवजड वाहन येत होते आणि मला दिवा गेल्यामुळे समोरचे काही दिसले नाही आणि माझी गाडी कठड्यावर जाउन आदळली, जर १ मी. जरी पुढे गेलो असतो तर दरीतुन खाली जायचे नक्की होते. २) त्यानंतर सुध्दा वरंध घाटात किमान ३ वेळा वाचलो आहे. ३) एकदा मित्राच्या लग्नावरुन येत होतो अवसरी वरुन, मी आणि मित्रांनी गाडीची शर्यत लावली, साधारण रात्रीचे ९ वाजले असतील मी उजव्या बाजूने माझ्या प्रिया म८० वर साधारण ७० च्या वेगात चलो होतो आणि एका अवजड वाहनाला मागे टाकायचे म्हणून गाडी पुढे घातली आणि त्या वाहनाच्या निम्म्या पर्यंत पुढे आलो आणि समोरून एक गाडी येत होती आणि त्या गाडीचा एकाच बाजूचा दिवा लागला होता आणि माझ्या म८० च्या लक्ख प्रकाशामुळे मला ती पार जवळ आल्यावर दिसली त्या मूळे माझी जी काय फाटली होती ते माझे मलाच माहित.. ४) बाकी लिंगाणा किल्ला चढताना आणि उतरताना वाटलेली भीती हि सगळ्यात जास्त होती. ५)आजून म्हणजे चार धाम करताना आम्ही बद्रीनाथला चाललो होतो तेंव्हा बर्फ पडल्यामुळे गाडीची चाके सरकत होती, मध्ये रस्ता आणि दोन्ही बाजूला दरी त्यात कहर म्हणजे रस्त्यावर रहदारी पण कमी होती त्या मूळे जी काय भीती वाटत होती त्याची कल्पनाच करवत नाही................ सध्या एवढेच बास, बाकी नंतर कधी तरी..............

मिपा वाचताना रोज एक तरी एन.डी.इ चा अनुभव रोज येतो. माझ्या लेखनाने हाच अनुभव येतो अशी तक्रार आल्यामुळे लेखन बंद केल्या गेले आहे.

माझे काही... अनुभव १ खोबारला असताना, मुलीला शाळेत सोडून ऑफिसला जायचो आणि लंचमधे शाळेतून पिकप करून घरी सोडायचो. असाच एकदा तिला शाळेतून घ्यायला जात होतो. निघायला उशिर झाला होता. शाळा सुटली होती ऑलरेडी. म्हणुन मी वेगात जात होतो. अचानक लक्षात आले की समोरच्या गाड्या भराभर उजव्या बाजूच्या स्लो लेनमधे जात आहेत. माझ्या काही लक्षात यायच्या आत समोरच्या गाडीने ब्रेक मारला, मी ब्रेक मारेपर्यंत माझी गाडी त्या गाडीवर आपटलीसुद्धा. साधारण १२० / १३० च्या स्पीडला झालेली जोरदार धडक. धडक झाली तो क्षण आयुष्यात विसरू शकणार नाही, मात्र त्या नंतरची पाचेक सेकंद अजूनही आठवत नाहीत. :( ब्रह्मांड आपल्याभोवती फिरतं तसं काहीसं झालं त्या क्षणी. इंग्रजीतला स्टन शब्द काय आहे त्याची अनुभूती त्या पाचेक सेकंदात आली. मी भानावर होतो पण समजत काही नव्हतं. मात्र त्यानंतर पहिला विचार मनात आला तो हाच की पिल्लू शाळेत एकटं बसलं असेल, आधी ती व्यवस्था लावायला पाहिजे! मग बाकीचे विचार आले मनात. अनुभव २ हाही खोबारचाच प्रसंग. रात्री ११ वाजता कस्टमरचा कॉल आला की काही तरी लफडं झालंय आणि लगेच ये. मी निघालो. रस्त्यात एका कलिगला घेतलं बरोबर. काम आटपायला साडेतीन वाजले... झोप बोंबलली होतीच. साधारण ५० - ५५ किमी अंतर कापून घरी जायचं होतं. अर्ध्या रस्त्यात कलिगला घरी सोडलं त्याच्या आणि मी पुढे निघालो... हायवेवर स्पीड आपोआप वाढतो. तसंच झालं. बराच वेळ जागा होतो. आणि अचानक डोळा लागला! जास्त नाही.... २-४ सेकंदच, पण लागला. गाडी एका बाजूला गेली... त्या झटक्याने जाग आली एकदम. घरातले सगळेच डोळ्यासमोर आले एकदम! अनुभव ३ हे वाचल्यावर मेलोच होतो... http://www.misalpav.com/node/6332 अनुभव ४ हे वाचल्यावर जिवंत झालो... http://www.misalpav.com/node/7020 ;)

एकूण माझ्यासकट बर्‍याच जणांना निअर डेथ एक्स्प‍िरिअन्स आले आहेत, क्षणभरासाठीच. धीस इज नॉट दी वे - यू हॅव टू डाय, एक्स्प‍िरियन्स डेथ इच मोमेंट, अनटील यू डाय फॅक्चुअली, इन दी मीन टाईम जिलानेवाला अपनेआप जिंदा करता रहता है.

In reply to by विनायक प्रभू

मास्तर मरण आ्णि जन्म या गोष्‍टी एका माणसाच्या आयुष्यात फक्त दोनवेळा होत नाहीत. दर क्षणी होतात. हे जगातलं अल्टीमेट क्रिप्टीक आहे - करा सॉल्व्ह. आजवर लै क्रिप्टीक लिहून छळलंय तुम्ही पब्लिकला. :p

Near Death Experience.. अनुभवलाय कधी..? होय, माझ्या अतिशय गुंतागुंतीच्या ट्युमर सर्जरीच्या टायमाला..

लोकल मधून पडताना वाचलेय खूप वेळा. एकदा तर लोकलच्या दरवाज्यात मधल्या handle मध्ये हाताच बोट अडकल होत आणी केसांची वेणी दुसर्या मुलीच्या पर्स मध्ये अडकून मान खूप मागे आत खेचली गेली होती. तेव्हा तोंडातून शब्द फूटत न्हवता. अणी हे सगळ होत असताना लोकल चालू झाली होती.

माझा अपघात झाला होता...मी आणि माझा भाऊ..दोघांचे पण पाय मोडले..म्हंजे चांगले रॉड घालावा लागला...भाऊ बेशुध्द होता आणी मी २० मीनिटे तरमळत पडलो होतो...मग एका काळी पिवळी वाल्याने सरकारि हॉस्पिट्ल ला आणुन टाकले म्हणुन वाचलो...तब्ब्ल २ वर्ष कुबड्या वापर्ल्या मग कुठे स्वतःच्या पायावर चालाय्ला शिकलो..पण ते २० मि. म्ह्नजे Near Death Experience...

१. प्रगती एक्स. ने मुंबइला बर्‍याचदा जात असे. विद्याविहारला क्लायंटकडे. प्रगती कुर्ल्याला स्लो व्हायची. मग मी तिथे उतरुन घेत असे. उगा दादरला जाउन परतायचा वेळ वाचायचा. " त्या" दिवशी सुद्धा कुर्ला जवळ येतय बघून दरवाजात आलो. ट्रेन स्लो झाली पण प्लॅट्फॉर्म संपता संपता. आपण तरीही उतरु शकतो असे वाटल्याने उडी मारली, पण तोपर्यत ट्रेनने वेग पकडला. मी प्लॅट्फॉर्मवर फेकला गेलो. अगदी खांबाजवळ ४ इंचांवर डोक आलं. पाच मिन्टे तसाच निपचित पडून होतो. " गया गया " असा ओरडा कानावर आला. मग उठलो. सॉलिड खरचट्ल अंगभर. कपडे फाटले. लॅपटॉप फुट्ला. कुणीतरी धावत येउन उठवल, पाणी पाजून बसतं केलं . " क्या जान सस्ती हुइ क्य?" असा टीपीकल मुंबै स्टाइल समाचार घेतला. बाहेर जाउन नवीन कपडे घेतले. मृत्यू ४ इंचावर येउन थबकला होता. २. स्कूटरवरुन सिग्नल सुटला म्हणून निघालो, तर एक व्हॅनवाला आडवा घुसला त्याचा सिग्नल तोडून. स्कूटरचे पुढ्च्या चाकाला जबर्दस्त घासून गेला. हँड्ल हातात उलट फिरलं. मी थोडा आधी निघतो किंवा तो थोडा नंतर आला असता तर हे टंकायला शिल्लक उरलो नसतो. २-३ सेकंदाने मृत्यूला हुलकावणी दिली होती. तेव्हापासून आपल्या आधी सिग्नलवरुन एक दोघे गेल्याशिवाय मी निघत नाही. काय व्हायची ती घासाघाशी त्यांचे होउदे ! ३. दिल्लीतली एक हिवाळी सकाळ. भिकाजी कामाप्लेसकडे निघालो रिक्षेतून. रिक्षावाला भयानक वेगाने चालला होता. सर्वत्र धुकं तरीही हा दामटतो. त्याला जरा हळू म्हणून सांगतोय तोवर धुक्याने ओलसर झालेल्या रस्त्यावर रिक्षा सरकली. एक चाक त्याच स्पीड्मध्ये असताना रस्त्याच्या आणि फूटपाथच्या मधील छोटया नालीत सापड्ले. रिक्षातून मी बाहेर फेकला गेलो. दोन तीन गोलांट्या खाउन पलीकडे कसा थांबलो ते माहित नाही. पण तिथे फूट्पाथ संपला होता. खाली जवळपास १० -२० फूटावर खालचा रस्ता दिसत होता. मी कोकणकडा पोझमध्ये (डोकं फूटपाथच्या खाली )फूटपाथवर झोपलो होतो. ४. नॉयडात रात्री २ वाजता जांबिया दाखवून लुटायला दोघेजण आले. मला काय झालं कोणास ठावून पण त्याचे दोन्ही हात तसेच हातात घेतले. कुस्तीगीर हात हातात घेउन एकमेकाला रेटतात तसे. त्याच्या हातात नंगा जांबिया. माझ्याकडे लुट्ण्यासाठी भरपूर माल. तसाच त्याचे दोन्ही हात विरुद्ध बाजूंना फिरवले. एका क्षमतेपलीकडे माझी ताकद थिटी पडू लागली. हिरोगिरी आता जीवावर बेतणार असे लक्षात येताच हात सोडले , पाठीमागे समरसॉल्ट करुन जीवाच्या आकांताने धावत सुटलो. ते दोघे आता चीड खाउन धावत होते. हॉटेल तोथून जवळच होतं . कसाबसा हॉटेलपर्यत पोचलो. उर भात्यासारखा धपापत होता. वाचलो खरा.

श्रीलंकेत असताना एकदा धुक्याच्या मध्यरात्री बळचकर मस्ती म्हणून पुढच्या हेलीक्रॉप्टरला ओव्हरटेक करायला गेलो. तिकडे कंपलसरी डाव्या बाजूने ओव्हरटेक करायचा नियम असताना मी उजव्या बाजूने माझे टू सिटर विमान घातले. अचानक समोर एक भला मोठा पक्षी आला. आता हे आपले शेवटचे उड्डाण थेट वैकुंठात जाणार असेच वाटले होते. मनातल्या मनातच काय तर मोठ्यांदा सुद्धा 'हे राम' म्हणून घेतले मी. आश्चर्य म्हणजे काही न होता सुखरुप विमान पुढे गेले आणि तो पक्षी देखील अदृश्य झाला. काही सेकंदात धुके देखील नाहीसे झाल्या सारखे झाले. काही दिवसांनी तो पक्षी म्हणजे जटायूचा भटकणारा आत्मा आहे, आणि केवळ रामाचे नाव घेतल्याने मी वाचलो असे आमच्या गुरुदेवांनी सांगीतल्यावरती डोळ्यात अश्रु आणि अंगावरती रोमांच उभे राहीले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

=)))))))))))))))))))))))))))) आजपासून तुम्हीच आमचे गुरूदेव!!!!!!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

मी प्लँचेट वर बोलावलं होतं जटायू ला. तेव्हा त्याने सांगितलं..त्याची रावणाचे हात कापायची इच्छा अपूर्ण राहिली आहे. त्यामुळे तो प्रत्येक टू सिटर विमानात रावणाला आणि सीतामाईला शोधत असतो. नशीब तुझ्याबरोबर कोणी फुफाटा नव्हता नाहीतर आज हा प्रतिसाद टंकायला हात राहिले नसते. आज कबंधाला बोलावलं आहे. हिंदी चित्रपटवाले "कानून के हाथ बहोत लंबे है!" असं म्हणून त्याला चिडवतात अशी त्याची कंप्लेंट आहे.. -(मांडवलीबाज) एक

हे सगळे 'निअर डेथ अनुभव नाहीतच. तुम्हाला खूप लांब अंधार्‍या गुहेतून प्रवास करतोय असं दिसलं, त्या प्रवासाच्या शेवटी एक तेजस्वी पण शांत प्रकाश, जो तुमच्याशी शब्देविण संवाद साधतो आहे असं दृश्य दिसलं, तरच तो एनडीई बरं! शिवाय कधीकधी तुम्हाला तुमचेच शरीर, त्याभोवतालचे नातेवाईक हे सुद्धा दिसलंच पाहिजे.

आला की !! त्या रविवारी जुन्या बाजारात भटकून झालं त्यानंतर शन्वारवाड्यावर टैमपास करुन राजधानीत हादडायचा प्लान ठरला. बाईक चालवायची सवय अशी नाहीच. चालवायला शिकत होतो तीही वीकांताला घरी गेलो की. ठरल्या प्लान प्रमाणे मी आणि एक मित्र बाईकवरुन जुन्या बाजारातून शन्वारवाड्याकडे निघालो. रस्ता माहीत नव्हता त्यामुळे सोबतच्या एकाच्या गाडीच्या मागोमाग जायचं ठरलं. पुढे एका सिग्नलला आम्ही पुढे आणि ज्याला फॉलो करणार तो थोडा मागे राह्यला. काऊंटडाऊन सुरु झाला, बाईकवर माझ्या मागे बसलेल्या मित्राने सांगितलं, "तो बघ आता सिग्नल ग्रीन होईल थ्री टू वन्...सोड क्लच दे एक्सलेटर" बाईक व्यवस्थित निघाली पण ज्याला फॉलो करत होतो तो डावीकडे वळला. त्याने डावीकडे वळायची खूण केलेली ना मी पाह्यली, ना मागे बसलेल्या मित्राने. मागचा मित्र फक्त म्हणाला "अरे लेफ्ट लेफ्ट लेफ्ट " मी आहे त्या स्पीडमध्ये गाडी डावीकडे घेतली. समोरुन एक शेवरोले येत होती. वाटलं आता संपलं, आपण धडकणार. तेवढ्यात गाडी वाटेतल्या प्लास्टीक डिव्हायडर्स वर आदळली. डिव्हायडर्स उडाले आणि डिरेक्शन बदललं. थोडक्यात वाचलो.

मोदकाचा अनुभव भीतीदायक आहे तसे इतरांचे अनुभव पण भीतीदायक आहेत.

जेव्हा मि ३ मध्ये होतो तेव्हाचि गोश्ट आहे ही , आम्हि पोरानि गावाला विहिरि वर जायचा बेत आखला, सगळे भाउ पोहोन्यात पटाइत, विहिरिवर गेलो, आणि तो इतका मोठा खडडा पाहुन , माझ्या पोटात खड्डा पड्ला !!!! बर्याच कार्ट्यनी उड्या मारल्या, मी तसाच उभा होतो कठावर, आनी अचानक कोणी तरी मला धक्क दिला... मला पोहोतापन येत नाही..., ब्रम्हान्ड आठावले......

थोडे अनुभव माझे आहेत.. तर थोडे नातलगांचे.. त्यातलेच २ अनुभवः १. मी आठवीत होतो. शाळेत सायकलने जात असे. बसथांब्यावर एक बस उभी होती, म्हणून तिला ओलांडून पुढं जायला निघालो. तेवढ्यात समोरून एक बस वेगात आली. मी थांबलेल्या बसला जवळपास ओलांडलेलं होतं पण तेवढ्यात ती पण सुरू झाली. न पुढे जाऊ शकत न मागे होऊ शकत अशी वेळ. दोन्ही बसेस च्या मधे मी कसातरी तोल सांभाळून ती वेळ मारून नेली.. दोन्ही बसेस अगदी जवळून गेल्यानं पूर्ण वाट लागली होती. सायकल बाजूला घेऊन १० मिनिटं थां[बलो होतो. मग निघालो. ४-५ जणांनी उद्धार करून झाला तेवढ्यात.. २. काका अमरावतीहून नागपुरला येणार असं घरी कळलं होतं. आम्ही वाट बघतच होतो. ते आले तो रक्तानं माखूनच. सगळे भेदरून गेलेलो. पण तेव्हा म्हणाले की ते उडालेलं रक्त अहे.. त्यांना काहीही झालेलं नाही. त्यांनी सांगीतलं की एस.टी. नं ते निघाले. उजव्या बाजूच्या सीट वर बसले होतेत. कोंढाळीच्या पुढं बस आल्यावर अचानक त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, डाव्याबाजूला खिडकीची एक जागा रिकामी दिसली म्हणून तिकडे जाऊन बसले. पाचच मिनिटांनी, समोरून येणारा एक ट्रक अचानक उलटला अन् आडवा फेकल्या गेला. त्याच्यातून निघालेली एक लोखंडाची कांबी बसला ड्रायव्हरच्या बाजूनं चिरत गेली. उजव्या बाजूनं कुणीही वाचलं नाही. केवळ दैव बलवत्तर म्ह्णून काका वाचले. त्यांच्या अंगावर उडालेलं रक्त हे त्या भीषण अपघात मृत झालेल्या व्यक्तींचं होतं. राघव

खुप आधी माझ्याकडे एम८० होती. त्यावेळी मुंबई पुणे हायवे हा किरकोळ होता. निगडीहून पुण्यात येतांना आकुर्डीला बजाच्यासमोर मागाहून एक बस अगदी जवळून गेली व माझ्या गाडीची डिक्की घासली गेली. मी सरळ खाली पडलो. मागाहून वाहने येत होती. पण त्यांनी वेळीच थांबवल्याने मी वाचलो. चांगला धागा आहे. यातील अनुभव वाचून कुणीतरी शहाणा होवू शकतो.

सगळ्यांना रोड आक्षीडनमध्येच निअर डेथ एक्स्पीरियन्स कसे आले ब्वॉ? रस्त्यावर अपघात माझाही झालाय, पण निअर डेथवाला नाही, हां, सोबतच्या मित्राला मात्र काहीच कळलं नव्हतं. माझा गावाकडचाच लहानपणीचा मित्र आणि मी औरंगाबादहून गावाकडे निघालो होतो. सकाळची वेळ. शंभरेक कि.मी. शांततेत कापल्यानंतर एके ठिकाणी थांबून मस्त भजे वगैरे हाणले - पण ते करीत असताना बंद असलेल्या एका केस कापण्याच्या दुकानासमोर गाडी लावली होती हे आठवतंय. नाष्‍टा वगैरे करुन पुढे आणखी दहाबारा कि.मी. कापले, वेग 60-70 गाठला होता. अचानक जाणवलं की गाडीचं संतुलन गेलंय आणि पुढचं आणि मागचं चाक लै बेक्कार फिरुन गाडी गदागदा हालवतंय.. दोन-चार सेकंदात फाट्‍ट! असा मोठ्‍ठा आवाज झाला, गाडीचं बॅलन्स एकदाचं गेलं आणि ती सायलेन्सरच्या बाजूला झुकली, पण 60-70 कि.मी. चा वेग असल्यानं गाडी तशीच सायलेन्सरच्या बाजूने डांबरी रस्त्यावरुन घासत 50-60 फूट पुढे जाऊन पडली. मागे बसलेल्या मित्राला त्या दोन मिनिटात अपघात झालेला आहे हे पण कळलं नाही. पायावर पडलेला जळाल्याचा ताजा व्रण दाखवून तो म्हणे माझ्या पायाला काय पोळलंय? मागून आलेला एक लाँग व्हेईकल (ती भली मोठ्‍ठी ट्रक असते ना, ती ) वाल्याने हा अपघात पाहिला असावा - आम्ही जमिनीवरुन उठत असताना तो म्हणे - सब ठीक? म्हटलं हां, हां ठीक.. थोडीसी खरोंचें है बस.. माझाही उजवा शोल्डर डिसलोकेट झाला होता, पण ते पुढच्या पंधरा वीस मिनिटात कळलं उजवा हात सुजून आल्यानंतर. पुढे टायरचं ट्यूब बदलणारा म्हणे आप बच गये, इस रोड पर ऐसा ही होता है.. पण हा काही निअर डेथ एक्स्पीरिअन्स नव्हता.