Skip to main content

बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली... :-(

लेखक केदारविदिवेकर यांनी शनिवार, 24/11/2012 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
चिरकालस्य मनी विराजिले जाणार ते म्हणुनी हृदयसम्राट कहविले गेले इति इहलोकीचा कालखंड संपवूनी गेले पण मनी एक मशाल धगधगती ठेवुनी गेले -- के डी ---------------------------------------------------- अनेकांचं काळीज आज, दूर कुठे हरवलं पाहूया, पुन्हा कधीतरी का ते सापडतं ? सापडेल कधी 'ताळ्यावर', याची शाश्वती नाही देव पुन्हा असा कोण पाठवेल याचा नेम नाही जयाने निर्मिले तयाने, बोलावणे आज पाठविले संपला कार्यभाग त्यांचा, मगच मृत्यूसर्प सरसावले प्राण निघून गेला त्यांचा, ज्योत मनात सदैव लावूनी गेले हृदय-सम्राट उगाच ना विराजीले, कर्तुत्व तैसेची दाविले -- के डी
काव्यरस

जोशीसर आणि महाले़खपाल आरोप

लेखक शकु गोवेकर यांनी शनिवार, 24/11/2012 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
टुजी स्पेक्त्रम साठी काग(CAG)ने सादर केलेल्या अहवालामध्ये लोकलेखा समितीचे अध्यक्ष व भाजप नेते डा.मुरली मनोहर जोशी यांनी फेरफार केला असा आरोप भुतपुर्व महालेखपाल श्री.आर्.पी.सिंह यांनी केला, श्री.सिंह यांचा आरोप - १ लाख ७६ हजार कोटी रुपये ही रक्कम कुठुन आली जोशी सरांनी त्यांना असा प्रतिसवाल केला की- तुम्हाला हा घोटाळा पुर्वी ठाउक होता तर पुर्वीच का बोलला नाहित मी कुठ्ल्याही पक्षाकडुन नाही पण मला डा.जोशींची भुमिका ठिक वाट्ते,मि पा करांना तसेच वाट्त आहे काय ?

हझारो ख्वाहिशे ऐसी...३

लेखक इष्टुर फाकडा यांनी शनिवार, 24/11/2012 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
भाग एक : http://www.misalpav.com/node/23033 भाग दोन : http://www.misalpav.com/node/23154 नर आणि मादी या हिशोबात विचार करायचं ठरवलं तर आपलं माणूस कोण असतं? ते जावूदे, पण मला एक सांगा कि, हि कथा ज्यांना आवडतिये/ आवडली आहे, त्या प्रत्येकाची एक कथा असेल... त्या प्रत्येकाची एक तार असेल, भूतकाळातली. कुठल्यातरी एका तानेवर या कथेतली एक एक ओळ समेवर येतेय आणि कोणाकोणाचे सूर जुळून जाताहेत. ती तुमची तान आहे, तिचा ठेका हे तुमच्या आठवणीतलं तुमच्यापुरत गाणं.

सुके मासे १) करंदी/सुकट्/अंबाड

लेखक जागु यांनी शुक्रवार, 23/11/2012 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः करंदी १ ते २ वाटे २ कांदे चिरुन १ वांग्याच्या फोडी २ छोट्या टोमॅटोच्या फोडी २ मिरच्या थोडी चिरलेली कोथिंबीर १ ते १ १/२ मसाला अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग चविनुसार मिठ २ पळ्या तेल

स्मारक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/11/2012 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
कै .बाळासाहेबांच्या स्मारका साठी शिवाजी पार्क असे सुचवले गेले पण त्याला मैदान बचाव समितीने विरोध दर्शवला .. मग कोहिनूर मिल असे सुचवले गेले व त्याला पर्याय म्हणून इंदू मिल चे नाव पुढे आले. इंदू मिल म्हणताच सारी आंबेडकरी जनता अस्वस्थ झाली.. दादर स्टेशन ला माननीय कै .बाळासाहेबांचे नाव देण्याचा प्रस्ताव कोन्ग्र्स कडून पुढे आला .. श्री.

रोजचाच प्रवास

लेखक शरद यांनी शुक्रवार, 23/11/2012 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचाच प्रवास (आज मात्र विचार करत करत ) डेक्कन क्वीन पुण्याहून मुंबईकडे जात आहे. रोजचाच प्रवास. आता असे सांगा डेक्कन क्वीनचा कोणचा भाग, रुळांच्या हिशेबाने, (relative to railroad track) पुण्याकडे जात आहे ? शरद

निवग-याचा सांबारा.

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी शुक्रवार, 23/11/2012 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
निवग-याचा सांबारा. दिवाळीचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय म्हणून हा वेगळा पदार्थ देत आहे. मागच्या पाककृतित फ़ोटो नाहीत असे सगळ्यांनी विचारले पण तो कॅमेरा वगैरे हाताळायचे मला कुठले जमायला! या ही वेळी फ़ोटॊ नाहीत. तरी गोड मानून घ्यावे (खावे). येथे वाचून कुणी हा पदार्थ केल्यास त्याचे फ़ोटो अवश्य द्यावेत. हा पटकन होणारा व पोटभरीचा ब्रेकफ़ास्टला करायचा पदार्थ आहे. साहित्य: तांदुळाची पिठी दोन वाट्या, सांबारासाठी साहित्य: सांबार मसाला, धने व जिरे पुड, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, सांबारात घालण्यासाठी लाल भोपळ्याच्या फ़ोडी, फ़रसबीचे तुकडे, मिळाल्यास शेवग्याच्या शेंगा, बारीक चिरलेला कांदा.

यमन

लेखक चेतन माने यांनी शुक्रवार, 23/11/2012 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली संध्यकाळी मस्त गार वारे सुटतायत. असच अचानक त्या दिवशी ते सूर पुन्हा मनात घुमू लागले. आतल्या आवाजामुळे त्या संध्येचे रंग अजून खुलू लागले. मला संगीतातलं शास्त्र खरच कळत नाही पण हि सुरावट माझ्या मनात एकदम पक्कं घर करून राहिलिये. शाळा-कॉलेज च्या वयात असताना फिल्मी गाणी, खास करून हिंदी ऐकायची खूप सवय पण फार तर फार समजले तर शब्द कळणार. आणखी गाण्यात काय ऐकण्यासारखं असत? असं मला वाटायचं . आता एक-दोन वर्षापूर्वी थोडी थोडी मराठी गाणी ऐकायला लागलो . मराठी वाहिनीवर आलेल्या एका प्रसिद्ध स्पर्धेत तर अजून बरीच गाणी ऐकायला मिळाली.