Skip to main content

कागा रे कागा रे

लेखक प्रशु यांनी बुधवार, 13/02/2013 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
मरणसन्न अवस्थेत 'ती' पडलीय, पतीसह सासरच्या मंडळीनी तीचा त्याग केलाय. का? असा काय गुन्हा केलाय तिने तर तीने प्रेम केलय ते सुद्धा पाटलाच्या पोरावर!!! आणी साधसुधा नाहि हा लोकविलक्षण प्रेम केलय. पण तो तीचा प्रेमी सुद्धा आज तिच्यापाशी नाही.

ती रात्र !

लेखक चाफा यांनी बुधवार, 13/02/2013 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
टप्प SSSSS. गालावर पडलेला पाण्याचा थेंब निल्याला दचकवायला पुरेसा होता. अं SS हं, घाबरल्यामुळे दचकला नव्हता तो, काहीतरी अनपेक्षित घडल्यावर होणारी ती एक सहज प्रतिक्रिया होती. नकळत त्याच्या तोंडून एक शिवी निघाली, ही सुद्धा एक सहज प्रतिक्रियाच. मुळात या असल्या वातावरणात एकट्याने एकच चाक असलेल्या बाइकची सोबत करत बसल्यावर कुणीही वैतागेलच. त्यात पंक्चर काढून आणायला गेलेला राक्या अजून परतला नव्हता. " साला, काय सगळे पंक्चर काढणारे आज संपावर गेले काय?" मनातल्या मनात बडबडून कंटाळलेला निल्या आता उघड संताप व्यक्त करत होता.

प्रश्न प्रश्न प्रश्न

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 13/02/2013 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी हल्ली मला अनेक प्रश्न पडत आहेत. (वय झाल्याचा परिणाम, नुसतेच प्रश्न पडतात उत्तरे मिळत नाहीत) तर अगदी लहानपणापासून कृष्णाने नरकासुराला, रामाने रावणाला मारल्याचा आनंद मी साजरा केला आहे. कॄष्णाने कंसाला, भीमाने जरासंधाला मारल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र हल्लीच असे करणे हे पातक असल्याचे जागतिक स्तरावर मानले जाते असे समजते. मला आता मोठे प्रश्न पडलेले आहेत. १)असा आनंद साजरा करणे हे योग्य की अयोग्य? २) योग्य असेल तर आनंद कसा साजरा करावा? ३) अयोग्य असेल तर त्याचे कारण काय? ४) १९ व्या शतकाने देवाचा मृत्यु पाहिला तर २० व्या शतकाने माणुसकीचा.

पाणी पुरी

लेखक स्मिता चौगुले यांनी बुधवार, 13/02/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पुरी अ) या आधीच्या पाकृमध्ये मी गोड चटणीची(खजूराची चटणी)कृती दिली आहे आता पुढील भाग ब)पाणी - पुऱीचे तिखट पाणी साहित्य: - १) १ कप पुदिना २) १/२ कप कोथिंबिर ३) १ इंच आले ४) ४-५ हिरव्या मिरच्या ५)चिंच ( आंबट चवीच्या आवडी प्रमाणे कमी -जास्त टाकू शकता) - मी साधारण १/४ कप टाकते -नॉर्मल चवीसाठी ६) जिरे पावडर १ चमचा ७) साधे मीठ / काळे मीठ चवीप्रमाणे (दोन्ही अर्धे-अर्धे टाकू शकता ) कृती:- १) चिंच जवळपास ४०-४५ minutes पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे चिंचेचा कोळ चांगला निघेल २) चिंचेचा कोळ काढून त्यात उरलेले सर्व साहित्य टाकून मिकसर मधून एकदम मऊ अशी पेस्ट करून घ्या (साधे मीठ आणि

उत्क्रांती- मोबाईलची.

लेखक नानबा यांनी बुधवार, 13/02/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आपल्या आयुष्यात अंतर्बाह्य बदल होतायत. इतके, की बहुतेक येत्या काही वर्षांमध्ये प्राथमिक शालेय पुस्तकांमधलं "अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत" हे विधान "अन्न, वस्त्र, निवारा या डिफॉल्ट गरजांसोबत काँप्युटर, हायस्पीड इंटरनेट आणि स्मार्ट्फोन या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत." असं बदललेलं दिसेल. या स्मार्टफोन्सच्या जगात वावरताना परवाच एका इसमाच्या हातात एक अत्यंत जुना, काळ्या रंगाचा, अँटेना असलेला वॉकीटॉकी सदृश्य मोबाईल फोन दिसला, आणि सहज डोक्यात आलं, या प्राण्याची (मोबाईलची) जन्मकथा काय असेल बरं?

जोरात उठते कळ....

लेखक अधिराज यांनी बुधवार, 13/02/2013 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आतल्या आत ढवळतं आणि ज्जोरात उठते कळ पण तिच्या मते आजकाल मला लागलाय कवी चळ.. मग, ती समोर असली की करतो थोडी वळवळ आतली वेदना लपविण्यासाठी आणतो उसनं बळ.. पण, ती ही अशी चलाख गाठतेच माझ्या मनाचा तळ म्हणते, बस्स झालं तुझं नाटक नाहीतर मी काढीन इथून पळ.. माझे उर्मी दाबून ठेवण्याचे प्रयत्न होतात निष्फळ तिच्या ओरडण्याने भानावर येतो पण जखम वाहत राहते भळभळ.. अरे, कविता म्हणजे नसते प्रत्येकाच्या हातचा मळ उगाच लिहावसं वाटलं म्हणून सोडायचे शब्दांचे नळ.. काही कामधंदा करू नको नुसत्याच भावना दळ हा रोग जडलाय तुला पण होतोय माझा छळ.. पण मी आता कोडगा होतोय ऐकून सोडून देतो सरळ पुन्हा आतमध्ये ढवळलं की शब्दांचीच

कर्करोग स्तनांचा

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 13/02/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ------------------------ हा एक महत्त्वाचा वाटणारा विषय मी मांडीत आहे.एक डॉक्टर म्हणून मला जे जे सांगायचे आहे ते.खालील लेख हा harrison's text book of medicine याचा संदर्भ घेऊन लिहिला आहे.हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांना सुद्धा आपल्या आई, बहिण बायको व मुलगी यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहित आहे.

अर्थ कोणी सांगेल का ? -अणुरेणिया थोकडा

लेखक प्रसाद१९७१ यांनी बुधवार, 13/02/2013 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
हा अभंग तर सर्वांनाच माहिती आहे. पण दुसर्‍या आणि तिसर्‍या कडव्याचा अर्थ कोणी सांगेल का? अणुरेणिया थोकडा अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥ गिळुन सांडिलें कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥३॥ तुका म्हणे आतां । उरलो उपकारापुरता ॥४॥

चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० )

लेखक प्रसाद१९७१ यांनी बुधवार, 13/02/2013 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
Internet वर सगळी माहिति उपलब्ध असल्यामुळे मी फक्त तोन्डओळख करुन द्यायच्या विचारात आहे. Patton ( 1970 ) हा चित्रपट Patton ह्या अमेरिकन General वर आहे. हा चित्रपट काही Patton ची Biography नाही. हे पण एक विषेश आहे. ह्याच्यात Melodrama नाही, युद्धावर असुन सुद्धा उगाचच शीरा ताणुन ओरडा आरडी नाही. महत्वाचे म्हणजे, वस्तुस्थितीची तोडफोड नाही. चित्रपटात १९४३ ते १९४५ एव्हडा कालखंड दाखवला आहे. George C Scott ह्या अभिनेत्यानी Patton ची भुमिका केली आहे. अभिनय म्हणजे काय त्याचा हा वस्तुपाठ आहे. ह्या भुमिके साठी त्याला ऑस्कर मिळाले. Karl Malden नी General Omar Bradley ची भुमिका केली आहे.

गहाणात ७/१२.....

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/02/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

मला अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे