Skip to main content

शब्दचित्र (व्हॅलेंटाईन डे स्पेश्शल!)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 14/02/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजही माझा तिचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न चालू होता अगदी नेहमीसारखेच आजही मी तसाच भांबावून नि:शब्द होतो अगदी नेहमीसारखेच कोणी किती गहरे असावे? किती अलंकार शोधावे उपमांसाठी किती वृत्ते धुंडाळावी लयीसाठी कुठून आणावे रंग तुझे भाव रंगवण्यासाठी कसे जमवावे शब्द तुला मांडण्यासाठी न कळे हे नेमके माझेचं असे कां व्हावे? दरवेळेस मी इरेला येतो तुला कागदावर उतरवायला सरसावतो लेखणीतून झरझरून हळवे शब्द पाझरतात क्षणाक्षणाला मी तुझे शब्दचित्र पूर्णत्वाकडे घेऊन जातो मनाचे समाधान होईतो रेखाटून घेतो अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो नेहमीसारखेच . . आता पुन्हा मी भांबावलेला पुन्हा नि:शब्द ना
काव्यरस

जॉर्ज फेरीसचा १५० वा स्मृतीदिन.

लेखक नानबा यांनी गुरुवार, 14/02/2013 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
अख्ख्या जगात १४ फेब्रुवारी हा वॅलेंटाईन दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस फेरीस व्हीलचा प्रणेता जॉर्ज वॉशिंग्टन गेल फेरीस जुनियर याचा जन्म दिवस आहे. jorge जॉर्जचा जन्म १४ फेब्रुवारी, १८५९ रोजी गेल्स्बर्ग, इलिनॉईस येथे जॉर्ज वॉशिंग्टन गेल फेरीस सिनियर आणि मार्था एडगर्टन हाईड यांच्या पोटी झाला. जॉर्ज ६ वर्षांचा असताना त्यांनी गेल्स्बर्ग सोडलं आणि ते नेव्हाडात स्थायिक झाले.

समजत नाही...

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 14/02/2013 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://www.misalpav.com/node/23918 क्रांतीतैची परवानगी घेउन हा प्रयत्न सादर करत आहे,मला गझलच काय कविता सुद्धा करता येत नाही,तरीसुद्धा पण हा एक प्रयत्न , मुड बदलाचा.
काव्यरस

हे रघुनाथ जाधव कोण? कोणी जास्तीची माहिती देऊ शकेल का?

लेखक प्रसाद१९७१ यांनी गुरुवार, 14/02/2013 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
आझाद नावाच्या १९५५ सालच्या सिनेमा मधे अण्णा चितळकरांनी चाल लावलेली "मरना भी मुहोब्बत मे कुछ काम ना आया" ही फार सुंदर कव्वाली आहे. खाली दिलेल्या लिंक वर ती बघता येईल. अण्णांनी नेहमीचीच कव्वाली कम मुजरा गीतांच्या चालीला एक सुंदर वळण दिलेले आहे. सिनेमा मधे दोन कलाकारांनी ती अतिशय प्रसन्न पणे सादर केली आहे. आंतर जाला वर बघितले तर ती एका "रघुनाथ जाधव" यांनी गायली आहे. कदाचित चित्रण पण त्यांच्यावरच झालेले असावे. http://www.youtube.com/watch?v=x58KzqeE54U मुद्द्याची गोष्ट म्हणजे रघुनाथ जाधव हे नाव मराठी असुन सुद्धा कधी ऐकले नव्हते.

पनीर - पिस्ता बहार...

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 14/02/2013 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळि, कालची गणेश जयंती आणि आजचा प्रेमदिवस हा दुहेरी संयोग साधुन खालील पाकॄ केली....बाप्पा आणि बायको दोघेहि खुश......अरे हाय काय नाय काय! सर्व मिपाकरांना प्रेमदिनाच्या हर्दिक शुभेच्छा! Paneer-Pista साहित्यः १. किसलेलं पनीर - २ वाटया २. पीठिसाखर - आवडिप्रमाणे कमी / जास्त ३. वेलची पुड - पाव चमचा ४. पिस्ता पुड - १ वाटि मध्यम ५. खायचा रंग - आवडिप्रमाणे कुठलाहि ६. बदाम काप - सजावटिसाठि कॄती: १. पनीर ताजं मिळालं तर उत्तम.

माहेरचा अहेर!

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 14/02/2013 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच. नुकतेच ह्या इटलीच्या एका हेलिकॉप्टर कंपनीने भारताला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वापराकरता डझनभर हेलिकॉप्टरे अफाट भावात विकली. त्यात मोठी लाचखोरी झाली अशा आरोपाखाली इटलीच्या सरकारने त्या कंपनीच्या प्रमुखाला अटक केली. ते झाल्यावर आपले धुतल्या तांदळासारखे स्वच्छ संरक्षण मंत्री व बाकी उच्चपदस्थ खडबडून जागे झाले. आता ते ह्या प्रकरणाची "सखोल" चौकशी करणार म्हणत आहेत. नेहमीच्या स्वच्छ परंपरेनुसार इथेही काळ्या पैशाचे आकडे डोळे पांढरे करणारे आहेत.

प्रेमात धड-पडायचंय

लेखक यसवायजी यांनी गुरुवार, 14/02/2013 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
frendz & girlfrindz of MipA.,हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे.. love भाईलोग्ज, वैसे अपुन जैसे टपोरिकु क्या मालुम, के प्रेम कशाबरोबर खातात ते? पण आपल्याला ट्राय मारायचाय राव एकदा.., 'ते' लै भारी असतय म्हणं..

अरुंधती रॉय वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा काय?

लेखक बाळकराम यांनी गुरुवार, 14/02/2013 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
भारताविरुद्ध सतत गरळ ओकणार्‍या अरुंधती रॉयनी ही मात्र कमालच केलीये. ह्या नतद्रष्ट बाईला देशद्रोहाच्या, किमान राज्यद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी इतका गंभीर आणि खळबळजनक गुन्हा तीने केला आहे. तुम्हाला काय वाटतं? संतप्त- बाळकराम

ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.

लेखक बॅटमॅन यांनी गुरुवार, 14/02/2013 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रोजन युद्ध पहिला भाग. ट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की. :) इलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका: अखेरीस ८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रीक आरमारी ताफा ट्रॉयला जाण्यासाठी सज्ज झाला. ट्रॉयला येऊन ९ वर्षेही उलटून गेली.