मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पनीर - पिस्ता बहार...

दिपक.कुवेत · · पाककृती
नमस्कार मंडळि, कालची गणेश जयंती आणि आजचा प्रेमदिवस हा दुहेरी संयोग साधुन खालील पाकॄ केली....बाप्पा आणि बायको दोघेहि खुश......अरे हाय काय नाय काय! सर्व मिपाकरांना प्रेमदिनाच्या हर्दिक शुभेच्छा! Paneer-Pista साहित्यः १. किसलेलं पनीर - २ वाटया २. पीठिसाखर - आवडिप्रमाणे कमी / जास्त ३. वेलची पुड - पाव चमचा ४. पिस्ता पुड - १ वाटि मध्यम ५. खायचा रंग - आवडिप्रमाणे कुठलाहि ६. बदाम काप - सजावटिसाठि कॄती: १. पनीर ताजं मिळालं तर उत्तम. मी अमुलचे फ्रोजन क्युब्स वापरले. फ्रोजन क्युब्स वापरणार असाल तर ते थोडया वेळ गरम पाण्यात ठेवा म्हणजे मउ होतील. मउ झाले कि किसुन घ्या किंवा हातानी कुस्करुन घ्या. २. आता एका भांडयात/बाउल मधे किसलेल पनीर घ्या आणि हळुवार हातानी रगडत रहा.....अगदि पार त्याचा (पनीरचा) पॄष्ठभाग स्मुथ/गुळगुळित होईस्त.....एक साधारण १०-१२ मि. ३. आता त्यात आवडिप्रमाणे पिठिसाखर घालुन परत एकदा मळा. एक ५-७ मि. मिश्रणाचा गोळा होईल ४. आता त्याचे दोन भाग करा. एक भाग पांढरा ठेवा आणि दुस~या भागात आवडता रंग घाला. मी दोन प्रकार केले. प्रकार १: १. पिवळ्या पनीरच्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करा. आता पांढ~या पनीरचा थोडा मोठा गोळा हातावर घेउन पसरा. त्यात अलगद पिवळा गोळा ठेवा. बाजुच्या सर्व कडा एकत्र करुन गोलाकार वळा. पिस्त्याच्या पुड मधे हा गोळा घोळवुन बाजुला ठेवा प्रकार २: १. एका वाटित २ मोठे चमचे पिस्त्याची पुड, चवीप्रमाणे पिठिसाखर, वेलची पुड एकत्र करा. त्यात अगदि गरजेप्रमाणे दुध घालुन गोळा करा (दुध अगदि १ ते १.५ चमचा पुरलं) २. आता पिवळ्या पनीरचा गोळा हातावर घेउन पसरा. त्यात अलगद पिस्त्याचा गोळा ठेवा. बाजुच्या सर्व कडा एकत्र करुन गोलाकार वळा. ५. वरिल दोन्हि प्रकार फ्रिज मधे जरा सेट होण्यासाठि ठेवा म्हणजे पनीर थोडं घट्ट होईल. लगेच सर्व करणार असाल तर जास्त वेळ ठेउ नका नाहितर पनीर खुप कडक होईल. पण दुस~या दिवशी खाणार असाल तर सर्व करण्याआधी एक १०-१५ सेकंद मायक्रोव्हेव मधे गरम करा. ६. एक १५-२० मि. सेट झाले कि बदामाचे काप घालुन सर्व करा :)

वाचन 6859 प्रतिक्रिया 0