Skip to main content

(तू)

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 29/04/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
बोटांवर चिकटलेल्या फेविक्विकच्या थेंबासारखा तू . पापण्यांच्या कोपर्‍यांवर साठणार्‍या घाणीसारखा तू . रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन भरकटलेल्या बेवड्यासारखा तू . हवा मारुन मारुन न पेटणार्‍या रॉकेल संपलेल्या स्टोव्हसारखा तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखा तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या घामाच्या धारेसारखा तू . सूर्यास्ताच्या वेळी हटकून नेहमीच्या जागी पाय वळणारा तू . तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्‍या विखारी जखमेसारखा तू .... तू, तू आणि तू ... सांग रे नालायका, हो तूच तू कुठे चचला आहेस?

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 29/04/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट ( Tikona Point) ----------------------------------------------------------------------------------------------------- हा लेख महिन्यापूर्वीच मीच प्रकाशित केला होता पण त्यात फोटो नव्हते. आता फोटो डकवणे जमले असल्याने परत प्रकाशित केलाय :) ----------------------------------------------------------------------------------------------------- शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात.

सबलीकरण

लेखक आतिवास यांनी सोमवार, 29/04/2013 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते. मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत. मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत. मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही. मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही. माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही. मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत. मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही. मी इंग्रजी बोलते, त्या बोलायचे तर लांबच,

तू

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 29/04/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
ओठांवर चिकटलेल्या मधाच्या थेंबासारखी तू . पापण्यांच्या काठावर तरळणार्‍या पाण्यासारखी तू . पहाटेच्या वेळी झाडावरुन घरंगळलेल्या प्राजक्तासारखी तू . कमळाच्या पानावरुन नुकतेच गळालेल्या दवथेंबासारखी तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखी तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या थंड वार्‍याच्या झुळकीसारखी तू . सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू . मनातल्या शेवटच्या कप्प्यातल्या लपवलेल्या सोनगुपितासारखी तू .... तू, तू आणि तू ... सांग गं सखे, हो तूच तू कुठे नाहीस? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२८/०४/२०१३)

जीवनाचे कोडे

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 28/04/2013 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी , घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट, अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा , आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि, आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे, लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा, करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा, उलगडले मज जीवनाचे कोडे,सोडून संसार पळती जन का हिमालया कडे
काव्यरस

मामाचं गाव (इसावअज्जा) - भाग-२

लेखक दशानन यांनी रविवार, 28/04/2013 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे!
भाग -१ इसावअज्जा मला शेतात घेऊन जेव्हा जात असे तेव्हा खरी मज्जा येत असे. मी विचारलेल्या एक आणि एक प्रश्नाला खरी-खोटी जशी समजतील तशी इसावअज्जा उत्तर देत असे. मग पेरु हिरवाच का? प्रश्नाचे उत्तर पानांचा रंग लागतो ना म्हणून हिरवा. विहीर गोल का?

अ‍ॅलर्जी कशी टाळावी?

लेखक प्यारे१ यांनी रविवार, 28/04/2013 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सहा महिन्यापासून मुख्यत्वे डाळ, पनीर, पालक, शेंगदाणे, काजू, असे पदार्थ खाल्ले की किंवा इतर वेळी देखील नि/अथवा नायलॉन ची गादी वापरल्यावर अंगावर कुठेही गांधीलमाशी चावल्यावर, सुरवंट लागल्यावर खाज सुटून सूज येते तशी सूज येते आहे. अर्धा तास राहते नि जाते. हाताची बोटे सुजतात. एक दोन वेळा खांद्याजवळ साधारण छोट्या वाटी एवढं वर्तुळ सूज आली होती. आठ दिवस गोळ्या खाऊन २ वेळा कमी झालं. गोळ्या संपल्या की पुन्हा सुरु. (जास्त गोळ्या खाऊन भविष्यात हाडं ठिसूळ होण्याचा संभव आहे असं ऐकिव आहे) काय क्रावं ब्रं? मिपाकर काही उपाय सुचवतील का?

ओले अंजीर आणि बेळगावी कुंदा...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 28/04/2013 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहजच अण्णांना भेटायला कलाश्रीमध्ये गेलो होतो. बाहेरच्या खोलीत अण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे पानाचा डबा होता.. इब्राहमी तंबाखूवाला.. "काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाण्याहून.." असे जुजबी प्रश्न अण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे वत्सलाताई आल्या. वत्सलाताई जोशी. माहेरच्या वत्सला मुधोळकर. भाग्यश्री या कानडी नाटकांच्या तालमीदरम्यान त्यांचं आणि अण्णांचं जमलं. स्वतः वत्सलाताई चांगल्या गात असत.

एक सिगारेट पिणारी मुलगी

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 28/04/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी.. ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत.. वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच.

याद हमारी मिटा न देना...!

लेखक सस्नेह यांनी रविवार, 28/04/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली ते सातवी सकाळची शाळा असायची. दप्तर सांभाळत शाळेच्या रस्त्यावरून जाताना घरोघरी सिलोन रेडिओवर ‘पुरानी फिल्मोंके गीत’ वाजत असायचे. लतादीदी आशा यांच्या सुरेल गीतांच्या मध्येच एक वेगळाच खडा सूर ठेक्यात कानाची पकड घेई अन नकळत पाय त्या स्वरांच्या तालावर झूम उठत. ..’बूझ मेरा क्या नाव रे नदी किनारे गाव रे.. पिपल झुमे मोरे आंगना ठंडी ठंडी छाव रे ...’ ..सुरुवाती-सुरुवातीला बाई गातेय का पुरुष असा प्रश्न पडायचा.