Skip to main content

मरणे कठीण झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 30/04/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला

दृष्टी दोष

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
बदलली नजर तुझी लेन्स लावूनी, हसत होतीस त्या आधी मला बघोनी, नयनात तुझ्या सदा मी होतो आधी , जडली कशी तुज नजरेची व्याधी लावलास जसा तू कॉनट्याक्त लेन्स नजरेत तुझ्या झालो मी नोन्सेन्स . ,
काव्यरस

एकलम खाजा, धोबी राजा.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 30/04/2013 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली च्यामारी गोटे कुठेच मिळत नाहीत.. आमच्या लहानपणी गोटे मिळायचे.. गोट्या नव्हेत.. गोटे. छानसे सिमेन्टने बनवलेले गोल, गु़ळगुळीत गोटे..त्यांना 'ढप' असेही म्हणत..आम्ही सताठ जण मग रोज गोटे खेळायचो.. मातीतच गोट्याच्या आकाराची आणि तेवढीच खोल अशी लहानशी गोलाकार खळी खणायची. त्याला गल किंवा गली म्हणत.. मग सर्वांनी एका ठराविक अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचं.. ज्याचा गोटा गलीच्या जास्ती जवळ जाईल त्याची पहिली पाळी.. सुरवातीची एकलम खाजाची गल कंपलसरी.. एकलम करण्यापूर्वी वीतेला परवानगी नाही..एकलम झाल्यानंतर मग वीत घेऊन गोटा मारायला परवानगी.. त्यातदेखील वीत ढापणं हा प्रकार असे.

ओले काजु आणि मॅन्गो मार्गारीटा

लेखक स्पा यांनी मंगळवार, 30/04/2013 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहजच पराण्णांना भेटायला सौंदर्य फुफाट्यात गेलो होतो. बाहेरच्या खोलीत पराण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे कि बोर्ड दाबत मिपावर कुणाची तरी खेचत होते .. "काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाकुर्लीहून.." असे जुजबी प्रश्न पराण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे सोत्री आले. सोकाजीराव त्रिलोकेकर. पूर्वीचे मुंबईकर . पुण्यातल्या मिपा कट्ट्या मध्ये पराण्णा आणि त्यांची ओळख झाली स्वतः सोत्री मद्याचे भोक्ते.

ट्रेफिक सेन्स

लेखक राजा सोव्नी यांनी सोमवार, 29/04/2013 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
सखे पाहून तुज साडीत लाल, थांबलो,जाहलो मी बेहाल, पाहून तनास हळद पिवळी, सावरलो नजर झाली बावळी , पाहून हातात चुडा हिरवा, भासलीस मज तू ट्रेफिक सिग्नलच नवा, चाललो पुढे मी आधार शोधण्या नवा

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 29/04/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रहो, आजपासून युद्धकथेच्या मालिकेत सातवे पुष्प गुंफत आहे...............हा लेख बराच मोठा असणार आहे कारण पर्ल हार्बरची पूर्ण कहाणी सांगायचा विचार आहे....आपल्या शंकांना मी उत्तरे सगळ्यात शेवटी देईन-अर्थात मला माहीत असली तर......आजचा भाग छोटा आहे कारण बाण सुटला आहे............त्या बाणाच्या प्रवासाची ही कहाणी मला तरी रोमांचकारक वाटली......आपल्यालाही ती तशी वाटेल अशी आशा आहे..........

काळ्या वाटाण्यांची उसळ

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 29/04/2013 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
Kale-Vatane-Usal साहित्यः काळे वाटाणे - २ वाट्या तिखट - १ लहान चमचा (टी स्पून) आख्खे धणे - १ मोठा चमचा (टेबल स्पून) काळी मिरी - ५ नग लवंग - ३ नग दालचिनी - १ इंच खसखस - १ लहान चमचा जायपत्री - १ फूल हळद - १/४ लहान चमचा खवलेला नारळ - अर्धा आमसुले - ३ नग कांदा - १ मध्यम, उभा चिरुन. मीठ - चवीनुसार तेल - अर्धी वाटी. काळे वाटाणे रात्रभर भरपूर पाण्यात भिजत टाकून सका

अननसाचा मुरांबा

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 29/04/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवसापूर्वीच माहेरी जाणं झालं, आणि तिकडे सुंदर अननस मिळाले. अननस पाहिल्यावर आठवलं, खूप दिवसात मुरांबा केलाच नाही! Ananas साहित्य: थोडा कमी तयार अननस, साखर, लवंग, वेलची दाणे. कॄती: अननसाचे साल आणि मधला कडक भाग काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्याव्या. अननसाच्या फोडी कुकरला एक शिटी करून वाफवून घ्याव्या. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.

प्रिय नाना पाटेकर,

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 29/04/2013 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच बदलापूरच्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होता.. नाना म्हणतो की मुंबै माझी नाही...मुंबैत मुखवटे घातलेली माणसं वावरतात..ती म्हणे वाचता येत नाहीत म्हणून नाना म्हणतो की खेड्यात रहाणं त्याला आवडतं.. हा नान्यासुद्धा लेकाचा शेफारलाय अलीकडे.. लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..? मुंबैतली माणसं वाचता येत नाही म्हणतोस..? नान्या, खेड्यात कुठेसं फार्महाऊस बांधलंस..त्याकरता पैसा मुंबैतच कमावलास ना..???? नान्या, तू म्हणतोस त्याप्रमाणे नरीमन पॉइंट..कफ परेड..

अथातो धर्मजिज्ञासा - महावीराची वर्धमान अहिंसा

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 29/04/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
अथातो धर्मजिज्ञासा - महावीराची वर्धमान अहिंसा ********************************************************************************* अथातो धर्मजिज्ञासा - महावीराची वर्धमान अहिंसा ********************************************************************************* संदर्भ : १) आकलन (नरहर कुरुंदकर ). २) भारतीय तत्वज्ञान (श्रीनिवास दीक्षित ) जैन आणि बौद्ध हे वैदिक नसलेले भारतीय धर्म आहेत . त्यांची परंपरा म्हणजे श्रमण परंपरा . या परंपरेत अहिंसेचे स्थान फार मोठे आहे. हि अहिंसा पुढे सर्वच भारतीयांनी निदान तत्व म्हणुन तरी मान्य केली आहे .