Skip to main content

पाऊस

लेखक पद्मश्री चित्रे यांनी सोमवार, 15/07/2013 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे लाजत मुरकत, बरसून गेला पाउस नवथर तहानलेल्या धरतीला या स्पर्शून गेली एक खुळी सर मातीवरती हलकी नक्षी, पानांवरती रंग ओलसर मिटलेल्या पंखात अजूनही नाजूक ओली हळवी थरथर पागोळ्यांचे पैंजण छुन छुन, टपटपणार्‍या ओल्या वेली हिरवाईची खूण जागवीत पाऊस येई सोनपावली मेघ अजूनही विस्कटलेले, चंद्रकोर ही ओली अजुनी अन्कुरातले स्वप्न फुलविते हसरी गंधित मोहक अवनी

माझे चाट जीवन २

लेखक देवांग यांनी सोमवार, 15/07/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे चाट जीवन १ मी कट्ट्यावर जावून तुषार आणि विवेकला जॉईन झालो. मी एक cutting आणि एक मोठी गोल्ड घेतली… गप्पा चालू झाल्या. तुषार "अंड्या कंपनी कशी आहे? आमची eningeering मुळे पार लागली आहे. submission करून जीव जातो आहे कधी अभ्यास करणार? साल्या तुझे बरे आहे" मी "काय घंटा बरे आहे, मरणाचे काम असते . २४ तास पुरत नाहीत." मी पण दिली ठेवून. तसे हि त्यांना काही माहित नव्हते. त्या मुले टाका टाकीला फुल chance होता. विवेक "हो अंड्या म्हणतो ते खरे आहे, माझा मामे भाऊ पण मार्केटिंग मध्ये आहे.

बारीक

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 15/07/2013 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
बारीक गेला. उणेपुरे ३२ वर्षे म्हणजे काही जाण्याचे वय नव्हते तरी गेला. दुपारी साडेतीन ला मीत्याच्याशी बोललो आणि साडेपाचला बारीक गेलाही होता. त्याच्या जाण्याचे दु:ख आहेच पण याचे जास्त दु:ख आहे की जगातुन एका चांगल्या माणसाने कायमची एक्झिट घेतली. वयाची ६० - ७० वर्षे जगाला ओरबाडुन झाल्यावर कॅन्सर होउन सुद्धा नको ती माणसे दशक २ दशक आरामात ओढतात आणि कोणाच्या अध्यातमध्यात नसणारा एक सामान्य माणूस २ तासात इहलोक सोडतो.

योग्य कि अयोग्य?

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 15/07/2013 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग अगदि छोटासाच पण विचार करत बसलो. काल काहि कामाकरता सीटि मधे जाणं झालं. एकटा असलो कि मी मुद्दाम बसने जातो. तर्‍हेतर्‍हेची माणसं/त्यांच्या सवयी/लकबी पहायला मिळतात.....स्टॉप येईपर्यत छान वेळ जातो. बस मधे तशी फारशी गर्दि नव्हती. तिकिट काढुन जागेवर बसलो. माझ्या पुढे एक २/४ सीट सोडुन एक माणुस बसलेला. सवयीने त्याच्या बाजुची सीट रीकामी असल्याने त्याचं खायचं सामान त्या जागेवर होतं (बहुतेक रोजा सोडायचं होतं). पण साहेब पाय पुढे करुन झोपा काढत होते त्यामुळे कोणाला त्याला क्रॉस करुन त्याच्या बाजुच्या सीट्वर जाता येत नव्हतं पण त्याचबरोबर बसायला मिळत नाहिये म्हणुन चुळबुळत होते.

राते- हिंदी रचना आणि भावानुवाद

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 15/07/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमरः जिंदगी जम चुकी है च्या वेळेस झाला तसा गोंधळ होऊ न देता या वेळेस मी सरळ चाणक्यलाच गळ घातली. म्हटले बाबा रे, ते अनुवाद, भावानुवाद काय मला जमत नाही ते तूच कर, तुला ते भन्नाट जमते. आणि त्याने माझ्या प्रेमाखातर केले त्यासाठी त्याला धन्यवाद देऊन त्याचा अपमान कसा करु?
काव्यरस

आकाश

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 15/07/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
.. तर हे थेट तुझ्यापासून माझ्यापर्यंत पसरलेले आपले आकाश .. त्यात पुन्हा तुझ्या बाजूने आपल्या दोघांचे आकाश वेगळे ; आणि माझ्या बाजूने वेगळे ! त्यातही आपल्या आकाशातील केवळ तुझे आणि केवळ माझे आकाश आणखीन वेगळे .. ..चल, आता हे सारे तुकडे एक करून टाकू ! - डॉ. सुनील अहिरराव

163 वर्षांचा प्रदिर्घ इतिहास

लेखक लीलाधर यांनी सोमवार, 15/07/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
असणारी तारसेवा म्हणजेच टेलिग्राफ सेवा आज दिनांक 15/07/2013 रोजी सेवेतुन निव्रुत्त झाली आहे त्यामुळे अत्यंत खेद होत आहे. आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात तारेचे महत्व अबाधित आहे म्हणुनच या सेवेचा लाभ आपण सार्र्यांनिच घेतला आहे आपले अनूभव मांडुया.

मुंबईच आगळ रुप पाहताना

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/07/2013 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण मुंबईत एका बांधकाम पूर्णत्वाला आलेल्या इमारतीमध्ये अगदी थेट गच्चीवर जायची संधी मिळाली. मुळात वर जाणे हासुद्धा एक थरारक अनुभव होता - अजुन काम बरेच बाकी असल्याने उद्वाहन कार्यरत झाने नवह्ते. इमारतीच्या बाहेरुन लोखंडी मनोरा बांधुन त्यात तात्पुरते उद्वाहन म्हणजे चक्क एक पिंजरा बसविला होता. एखाद्या हॉटेलच्या बाहेरुन लावलेल्या कॅपसूल लिफ्ट मधुन बाहेर पाहणे वेगळे. इथे फट फट फट फट आवाज करत सरळ्सोट वर चढत जाणार्‍या पिंजर्‍यातुन लहान होत जाणार्‍या इमारती आणि आपण केवळ एका कप्पीवर आहोत ही धास्ती क्षणभर का होईना पण जाणवली.

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०३ : पूर्वतयारी - आपले मार्गदर्शक

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 14/07/2013 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...