प्रसंग अगदि छोटासाच पण विचार करत बसलो. काल काहि कामाकरता सीटि मधे जाणं झालं. एकटा असलो कि मी मुद्दाम बसने जातो. तर्हेतर्हेची माणसं/त्यांच्या सवयी/लकबी पहायला मिळतात.....स्टॉप येईपर्यत छान वेळ जातो.
बस मधे तशी फारशी गर्दि नव्हती. तिकिट काढुन जागेवर बसलो. माझ्या पुढे एक २/४ सीट सोडुन एक माणुस बसलेला. सवयीने त्याच्या बाजुची सीट रीकामी असल्याने त्याचं खायचं सामान त्या जागेवर होतं (बहुतेक रोजा सोडायचं होतं). पण साहेब पाय पुढे करुन झोपा काढत होते त्यामुळे कोणाला त्याला क्रॉस करुन त्याच्या बाजुच्या सीट्वर जाता येत नव्हतं पण त्याचबरोबर बसायला मिळत नाहिये म्हणुन चुळबुळत होते. शेवटि एकाने त्याला उठवलच तर त्याने सांगीतलन कि बाजुच सामान त्याचं नाहिच आणि परत झोपी गेला. बरं सामान खाली ठेवुन बसावं तर हा पाय अडवुन झोपलेला विचारणारा माणुस 'विचित्र/तर्हेव्हाईक' दॄष्टि़क्षेप टाकित मागे आला. हेच बसमधे नविन चढणार्यांच्या बाबतीत होत होतं. शेवटपर्यत कोणालाहि बसु न देता यथावकाश त्या माणसाचा स्टॉप आल्यावर तो दोन तिकिट दाखवत उतरुन गेला.
तर बाजुच्या सीटचं तिकिट खरेदि करुन जागा रिझर्व करणं हे योग्य कि तिकिट घेतल्यामुळे त्या जागेवर आपलं सामान ठेवुन (काहि ठिकाणी तर जागा रीकामी ठेवतानाहि पाहिलय) ईतरांना उभं ठेवणं/ त्यांची अडवणुक करणं हे अयोग्य?
शेवटि योग्य/अयोग्यच्या व्याख्या ह्या आपण आपल्या सोईनुसार बदलतो/ठरवतो का?
वाचने
2366
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सीट रिकामी ठेवुन उभ्या असणार्या
भारतात २ काय १ ति़किट नाही काढले तरी चालते
शेवटि योग्य/अयोग्यच्या
योग्य - अयोग्य
योग्य्/अयोग्य व्यक्तिसापेक्ष असते
१) बसचा कंडक्टर कुठे होता?
In reply to योग्य्/अयोग्य व्यक्तिसापेक्ष असते by पैसा
आपल्याकडेही अशी सोय पाहिजे
रत्नागिरी-पुणे घाटगेपाटील बस
स्थल काल सापेक्ष