आत्महत्येला कव्हर!
खरं सांगू का? तशा माझ्यापुढे समस्या खूप आहेत, पण माझी मुख्य समस्या ही आहे की, माझ्या समस्या कोणाला समजतच नाहीत. पहा, तुम्ही पण हसलात न मला? हसू नका हो! अगदी पोटतिडिकीने सांगतोय, माझी कोणतीच समस्या कोणालाच समजत नाही.खरंच का लोक एवढे बिनडोक असतात? की त्यांच्या बेपवाईमुळे असं घडतं? कोण जाणे! पण या काळातही माझा मनुष्यप्राण्यावरचा विश्वास टिकून आहे खरा! कदाचित, ...कदाचित मलाच माझ्या समस्या नीट सांगता येत नसाव्यात. तसा मी मुखदुर्बळच! म्हणजे, असं आई म्हणते लहानपणापासून; अर्थात माझ्या लहानपणापासून, तिच्या नव्हे. माझं हे असंच होतं, एक सांगायला जावं, तर त्यातून अर्थ वेगळाच निघणार! असो. तर काय?
मिसळपाव