Skip to main content

डस्ट इन द विंड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/08/2013 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.

प्रवासी

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 21/08/2013 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासी जीवन प्रवास गूढ, कोणी कसा केला कोणी हसत निभावले, रडून कोणी केला ll १ ll प्रवासी दिसले कोणी, चालता पथात एकलाच गेला कोणी, हात कोणी केला ll २ ll साथीदार कोणाचा, सोडूनी मधेच गेला संपले तिथेच कोणी, मार्गस्थ कोणी झाला ll ३ ll प्रवास दूरचा, निश्चय निघताना केला प्रारंभीच कोणी, शेवटी कोणी विसरला ll ४ ll प्रवास तत्व ठरले, खुणगाठ बांधलेला मोडले तत्व कोणाचे, प्रवास कुणाचा तुटला ll ५ ll कधी बिकट कधी सोपी, संमिश्र वाट होती थकला मधेच कोणी, कोणी खुणा सोडूनी गेला ll ६ ll प्रवास पूर्ण कोणाचा, हर्षोल्हास कोणा झाला नि:श्वास सोडला कोणी, साजरा कोणी केला ll ७ ll प्रवासी अनेक पंथी, द

विश्व स्वधर्मसूर्ये पाहो

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 21/08/2013 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत. ज्याकाळी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते, तेव्हा आपले पूर्वज उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वतापासून तर दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरापर्यंतच पृथ्वीचा सर्व विस्तार असल्याचे मानत असत.

पुर्वसुचना

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 20/08/2013 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या करण्यात आली . अत्यंत निषेधार्ह घटना . समाजाच्या सर्वच स्तरातुन ह्या घटनेचा जोरदार निषेध होत आहे . पण
ज्या विचारांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी आज डॉ.

डासाचे मनोगत

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी मंगळवार, 20/08/2013 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
उद्यानातील बाकावरती द्वन्शिले मी तुला मम द्व्नशाने व्याकूळ होता ,एकांत तुझा भंगला || अफाट जगती क्षुद्र तू मानव किती जाळसी म्येट नि कासव जीव भुकेला रक्ता वाचून झोपे मधुनी उठता तुजला बागेत गाठला ||१|| मारशील तू मजला कितीही वंश माझा टिकतो तरीही तव अस्त्रांची न मजला भीती तप्त तुझे ते रुधिर प्राशुनी गुण तव घेतला ||२||
काव्यरस

रक्षा बंधन स्पेशल...

लेखक पुष्कर जोशी यांनी मंगळवार, 20/08/2013 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी पा वर एकही लेख नाही असे कसे ..... त्यामुळेच ... आज रक्षा बंधन मराठीत राखी पौर्णिमा हो... भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण.. ज्याने घर्माची बंधने कधीच तोडली आहेत ... इतिहासात सापडेल.... मुख म्हणजे आज बहिणीने भावाला ओवाळायचे आणि भावाने तिला गिफ्ट द्यायचे... आणि म्हणायचे मी तुझी आजन्म रक्षा करेन असे आजचे आधुनिक स्वरूप... ह्याचाशीच मिळता जुळता सन म्हणजे भाऊबीज सेम म्हणजे ओवाळणी गिफ्ट वगैरे .... पण ... सद्याच्या परिस्थितीत मला काही प्रश्न पडलेत ... का फक्त भावानेच बहिणीस गिफ्ट द्यायचे असे का ?

रम्य " रामदरा "

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 20/08/2013 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारचा दिवस . नेमकी त्यादिवशी ईद. म्हण्जे सुटीचा दिवस. . चौ राला म्हण्जेच धागाकर्त्याला वाटले. चला नवीन स्कूटर घेतलीय. आज जरा मोठी चक्क्कर मारून येऊयात. आता म्हातारं कितीसं लांब जाणार ? उगीच भरकटू नये म्हणून सौ, चौ ला घेतले .( म्हणून पुणे परिसरातील एक रम्य ठिकाण नक्की केले.) " रामदरा" हे स्थान पुण्यापासून साधारण पणे २४ किमी वर आहे.मी चिंचवड, खडकी, येरवडा पूल, कोरेगाव पार्क, हडपसर ओव्हर ब्रीज या मार्गाने गेलो. हा मार्ग मिनयापोलीस, कॅरोलेना, मस्कत, दुबई, मुंबई डोंबिवली ठाकुरली या गावाकडून येणार्‍या यात्रेकरूना ही सोयीचा आहे. ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली समजणे) .

भ्रष्टाचाराचा उड्डानपुल

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 20/08/2013 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज लोकसत्तेत आलेल्या बातमीने माझे लक्ष वेधुन घेतले... ती बातमी पुढील प्रमाणे आहे :- कमकुवत ‘सांध्यां’मुळे ठाण्यातील उड्डाणपूल धोक्यात माझ्या लहानपणी मी या पुलाची प्रस्तावीत उड्डानपुल अशी शासकिय पाटी वाचल्याचे स्मरते ! त्या पुलाचे बांधकाम २००८ साली सुरु होणार होते. तो पुल अजुन पूर्ण होउ शकला नाही त्यातच या आजच्या बातमीची भर पडली ! २००९ साली 'एमएमआरडीए'च्या निधीतून ठाणे शहरात कापूरबावडी फ्लायओव्हर, घोडबंदर रोडवरील तीन फ्लायओव्हर आणि शहरातील तीन फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहेत.

आरोग्य पंचविशी- २ -- गंधार

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 20/08/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
गंधार पंचेन्द्रीयातील पहिले इंद्रिय आणि मानवाची आद्य संवेदना म्हणजे घ्राणेन्द्रीय शक्ती सर्वात आदिम प्राणी म्हणजे अमिबा सारखा एक पेशीय प्राणी सुद्धा आपल्या पेशीच्या भिंतीतून झिरपणार्या अणुरेणु ची रासायनिक तपासणी करून आजूबाजूच्या वातावरणाची माहिती काढत असतात. मुळ वासाची शक्ती म्हणजे वेगवेगळ्या रसायनाची संवेदना मेंदूला देणे. हि शक्ती अंधारात उन्ह पावसात रात्री बेरात्री सुद्धा काम करीत असते आणि प्राणी मात्रांना सभोवतालच्या वातावरणाची जाणीव करून देत असते. प्राण्यांच्या आहार निद्रा भय आणि मैथुन या चार मूलभूत अंतरप्रेरणा सुद्धा वासाच्या शक्तीवर अवलम्बून असतात.